Site icon InMarathi

प्रदूषण वाढतच चाललंय; सर्वात शुद्ध हवा असलेली जगातील १० ठिकाणे!

bangor maine inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फिरायला जायला कोणाला आवडणार नाही?? जगातील उत्तमोत्तम ठिकाणांना भेट देणं, तेथील परंपरा, संस्कृती, विशेषता जाणून घेणं, निसर्गाचं सौंदर्य अनुभवणं हे सगळ्यांचंच स्वप्न असतं. नेहमीच आपण छान आणि उत्तम जागांच्या शोधात असतो. पण फिरायला जाताना किंवा ट्रीप ठरवताना ते ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे का? याचा विचार खूप कमी प्रमाणात केला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपण भटकायला जातो ती जागा जर सुंदर असण्यासोबताच शुद्ध, स्वच्छ हवा आणि आरोग्यदायी असेल, तर दुधात साखर म्हणायला हवे नाही का?? आपल्या देशात अशी खूप ठिकाणं आहेत, जिथे प्रामुख्याने शुद्ध आणि नैसर्गिक हवा मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि त्याची अंमलबावणीही होते.

 

 

१. Reykjavik, island

हे एक राजधानी असलेले मोठे शहर आहे. हे शहर कलेचे शहर म्हणून ओळखले जाते. मागच्या वर्षातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून या शहराचे नाव घेतले जाते. कारण हे शहर मानवजातीला लागणारी स्वच्छ आणि नैसर्गिक हवा देते. या शहरात आपण काही ठिकाणी नैसर्गिक, स्वच्छ आणि प्रदूषण विरहित पाणी पिऊ शकतो.

 

 

२. होनोलुलु, हवाई

होनोलुलु ही हवाईची राजधानी आहे. या शहराचे वैशिष्ट्य असे की इथे खूप नैसर्गिक सौदर्य आणि खूप समुद्रकिनारे पहायला मिळतात. ज्यांना पाण्यातले स्पोर्ट्स आवडतात, जसे की पोहणे, बोटिंग, किंवा समुद्रकिनारी बसून मिळणारा आनंद अनुभवायला आवडतं, अशा लोकांसाठी हे एक स्वप्नातील फिरण्याचं ठिकाण आहे. इथे शंख, शिंपले तसेच बरेच प्राणीसुद्धा पहायला मिळतात.

 

 

हे हवाईमधील खूप मोठे शहर असून फिरण्यासाठी उत्तम आहे. US मधील अतिशय शुद्ध हवेचे ठिकाण असून पॅसिफिक बिझनेस जर्नलनुसार येथे हवा प्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी आहे.

३. वेलिंग्टन, न्यूझीलंड

वेलिंग्टन हे जगातील खूप मोठे शहर असून न्यूझीलंडची राजधानी आहे. प्रदूषण नसणारे शहर म्हणून हे प्रसिद्ध आहे. एकदातरी अवश्य भेट द्यावी असे हे सुंदर ठिकाण आहे. जगातील स्वच्छ शहरांपैकी एक असे या शहराला घोषित करण्यात आले आहे.

 

 

४. कॅल्गरी, कॅनडा

कॅल्गरी हे अल्बर्टमधील खूप मोठे शहर आहे. या शहराची विशेषता म्हणजे येथे कॅनडामधील सगळ्यात मोठी नगरपालिका आहे.

हे शहर त्यांच्या समृध्द परंपरा, साजरे होणारे विविध सण आणि तेलाच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. हे जगातील अतिशय सुंदर आणि स्वच्छ हवा देणारे शहर म्हणून ओळखले जाते.

 

५. हेलसिंकी, फिनलंड

हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी आहे. या शहराची खासियत म्हणजे हे मोठ्या लोकसंख्येचे शहर असून राजकारणाचे मुख्य ठिकाण आहे. तसेच देशाच्या परंपरेसाठी आणि संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. या शहराच्या जवळच्या शहरांमध्ये स्वीडन, सेंट पीटर्स बर्ग यांचा समावेश होतो.

 

 

६. बंगोर, मैने

हे मैने मधील छोटे शहर आहे. गुन्हेगारीचे प्रमाण कमी असण्यासाठी हे प्रामुख्याने ओळखले जाते. तसेच ह्रदयासंबंधी विकाराचा दवाखाना आणि खरेदीची उत्तम जागा हे सुद्धा या शहराचे वैशिष्ट्य सांगता येतील.

 

 

उत्तम कलादालन हे अजून एक वैशिष्ट्य तसेच कल्पक लोकांसाठी संगीत सुद्धा आहे. आताच्या अमेरिकन अहवालानुसार अतिशय स्वच्छ आणि आरोग्यदायी हवा असलेले हे शहर आहे.

७. अॅडलेड,ऑस्ट्रेलिया

जगातील अतिशय सुंदर आणि उत्तम जागा असलेले हे शहर आहे. जर तुम्ही या शहराला भेट द्या तर या जागेच्या प्रेमात पडल्या शिवाय राहणार नाही इतके निसर्गसौंदर्य आणि निरोगी हवा लाभलेले हे शहर आहे.

 

 

८. झुरिक, स्वित्झर्लंड

हे जगातील अतिशय सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाते. उच्च प्रतीचे राहणीमान हे येथील वैशिष्ट्य म्हणता येईल. पण हे शहर अतिशय महागडे आहे. ज्यांचे खिसे भरलेले आहेत अशाच लोकांसाठी हे शहर फिरायला जाण्या योग्य आहे.

 

 

९. हलिफॅक्स, कॅनडा

हे शहर नोवा स्कोटियाची राजधानी आहे. या शहराची खासियत म्हणजे येथे अर्थशास्त्रचे मोठे सेंटर असून सरकारी तसेच खाजगी नोकऱ्या पुरवल्या जातात. या शहरात प्रदूषण विरहित हवा देण्यासाठी विविध उपक्रम राबवतात आणि त्याची गांभीर्याने अंमलबजवणी करतात.

 

 

१०. हॅम्बर्ग, जर्मनी

हे जगातील अतिशय स्वच्छ हवा असणारे शहर आहे. हॅम्बर्ग हे जगातील पहिले शहर आहे ज्याने स्वच्छ हवा राहण्यासाठी जुने डिझेल फ्युएल इंजिनची जागा बंद केली आहे. या शहराची स्वच्छ हवा ही ५०० मिलियन अंतरापर्यंत शुद्ध आणि नैसर्गिक असते. जर्मनीमधील हे सर्वात मोठे शहर असून मोठे वाहनतळ आहे.

 

 

वाढते प्रदूषण आणि अशुद्ध हवा या आताच्या काळातील खूप मोठ्या समस्या आहेत. वाढते शहरीकरण, लोकसंख्या, पेट्रोल डिझेलचा वाढता वापर अशी अनेक कारणे यासाठी जबाबदार आहेत.

अशा वेळी शुद्ध आणि नैसर्गिक हवा मिळणे हे स्वप्नच राहते की काय अशी भीती निर्माण होत असताना जगातील या सुंदर, देखण्या, निसर्गाची देणगी लाभलेल्या, शुद्ध आणि आरोग्यदायी हवा देणाऱ्या या शहरांना जाऊन भेट देण्याचा आनंद काही निराळाच म्हणायला हवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version