' दबंग सलमान, चक्क जुहीच्या वडिलांकडे ‘लग्नाचं प्रपोजल’ घेऊन गेला होता… – InMarathi

दबंग सलमान, चक्क जुहीच्या वडिलांकडे ‘लग्नाचं प्रपोजल’ घेऊन गेला होता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लवकरच सलमान खानचा अंतिम सिनेमा प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊनमध्ये प्रदर्शित झालेल्या राधे चित्रपटाच्या अपयशानंतर सलमानचे फॅन्स आत्ता अंतिम या सिनेमाची वाट पाहत आहेत.

इंडस्ट्रीमध्ये दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानच्या चित्रपटांसोबतच प्रेम प्रकरणांवरही वरचेवर चर्चा होत असते. सलमान जेव्हा-जेव्हा प्रेमात पडला आहे, तेव्हा ती बातमी ‘मोठी आणि व्हायरल न्यूज’ झाली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सलमान खानच्या आयुष्यात सोमी अलीपासून ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी, कतरिना कैफपर्यंत अनेक मुली आल्या, तरीही तो अजूनही बॅचलर आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी सुद्धा तो बॅचलर आहे याचे अनेकांना कुतुहल आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का, की सलमान खान बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाच्या देखील प्रेमात पडला होता?

 

juhi chawla inmarathi

 

फिल्मी प्रेम…

जुहीसोबत लग्न करणं हे सलमानचं स्वप्न होतं, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. १९९२ मध्ये सलमान खान, आमिर खान, जुही चावला, रवीना टंडन आणि दिव्या भारतीसोबत व्हँकुव्हरमध्ये फिरायला गेले होते. एका मुलाखतीत सलमानने त्याच्या विनोदी शैलीत हे सांगितलं होतं, की त्याला जुही चावलाशी लग्न करायचं होतं. फिल्मी भाषेत म्हणायचं, तर जुहीला पाहून त्याचं हृदय धडधडत असे.

भारतीय महसूल सेवेत नोकरी करणाऱ्या जुहीच्या वडिलांकडे सलमान त्याच्या आणि जुहीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेला होता. जेव्हा तो जुहीच्या वडिलांकडे या लग्नाचा प्रस्ताव घेऊन पोहोचला, तेव्हा त्यांनी थेट नकार दिला.

 

sad salman khan inmarathi

 

जेव्हा मुलाखतकाराने त्याला विचारले, की त्याचा लग्नाचा प्रस्ताव का नाकारला गेला, तेव्हा सलमान म्हणाला होता की, त्याच्या अंदाजानुसार त्यांना असे वाटले, की सलमान तिच्यासाठी योग्य मुलगा नाहीये.

एकत्र काम केलंय…

सलमान खान तरुणपणी काऊबॉय कॅप आणि डेनिम जीन्समध्ये डॅशिंग दिसायचा. सलमान खान आणि जुही चावला यांनी ‘अंदाज अपना अपना’, ‘दीवाना मस्ताना’ आणि ‘सलाम-ए-इश्क’ यासह विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली होती.

सलमानला असंही विचारण्यात आलं होतं, की त्याने जुहीसोबत फार जास्त चित्रपटात काम का केलं नाही? तेव्हा सलमानचं उत्तर थक्क करणारं होतं. तो म्हणाला जुहीला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं. सलमानची जुही सोबतच्या लग्नाची इच्छा पूर्ण झाली नसली तरी, १९९७ मध्ये आलेल्या दिवाना मस्ताना या चित्रपटात सलमान आणि जुहीच्या कोर्ट मॅरेजचा सीन नक्कीच पाहायला मिळाला होता.

 

juhi and salman inmarathi

 

जूही चावलाने तिच्या करिअरच्या शिखरावर असताना एका छोट्या समारंभात जय मेहता सोबत लग्न केलं. त्यांना दोन मुले आहेत – ज्यात मुलीचे नाव जान्हवी व मुलाचे नाव अर्जुन आहे. एका मुलाखतीत जूही चावला म्हणाली होती, की तिने तिच्या लग्नाची बातमी लपवून ठेवली होती कारण तिला “लग्नाच्या बातमीमुळे तिचे करिअर खराब होण्याची भीती वाटत होती”.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?