Site icon InMarathi

जाणून घ्या, तिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं नेमकं काय करतात!

Donated Hair InMararhi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तिरुपती बालाजी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.

देवळाच्या श्रीमंतीची झलक केवळ मंदिराच्या परिसरात दिसत नाही तर तिरुपती शहराची भरभराट बघून ह्या ऐश्वर्याची, मंदिराला येणाऱ्या भक्तांच्या संख्येची चुणूक दिसते.

एवढंच कशाला, दरवर्षी मंदिरात भक्तांनी केलेलं दान सर्वत्र चर्चेत येत असतं.

कुणी नोटांची बंडलं टाकतं तर कुणी सोन्याच्या विटा-दागिने इत्यादी.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भक्त हे निनावी टाकतात. तिरुपती संस्थानच्या प्रसिद्ध “हुंडी” मध्ये अश्या अनेक सामग्रीचं दान अर्पण होत असतं.

 

 

तिरुपती संस्थानच्या ह्या हुंडीबद्दल अनेक कथा आहेत. त्या हुंडीतील नोटा मोजण्यासाठीची यंत्रणा अचाट करणारी आहे. कित्येक लोक वेगवेगळ्या चाळण्या घेऊन नोटा मोजत असतात…!

 

 

असो – आपला विषय मात्र जरा वेगळा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की तिरुपती बालाजी मंदिरात भगवान बालाजीला आपल्या डोक्याचं मुंडण करून केस अर्पण करण्याची प्रथा आहे. आजही तिरुपती मंदिरात जाणारे भक्त मोठ्या हौसेने मुंडण करवून घेतात.

केवळ प्रथा म्हणून नव्हे तर अनेक भाविक आवर्जून भक्तीभावाने आपले केस येथे अर्पण करतात. अर्पण केलेल्या केसांचा खच मंदिरात पडलेला असतो. मात्र मंदिरात केस का अर्पण होतात आणि त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो ही बाब अनेकांना ठाऊक नसते.

मंदिर प्रशासन ह्या सर्व केसांचं काय करतं हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

 

या अर्पण करण्यात येणाऱ्या केसांचा पुढे लिलाव केला जातो…!

काही वर्षांपूर्वी भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचा लिलाव करण्यात आला होता.

Guess करा, लिलावात या केसांना किती किंमत मिळाली असेल?

तब्बल १.८२ करोड रुपये!

 

 

क्षुल्लक केस विकून एवढी रक्कम मिळवणार तिरुपती बालाजी मंदिर हे एकमेव ठिकाण भूतलावर असावं असं म्हटलं तर वावग ठरू नये!

दरवेळी प्रत्येक लिलावात होणा-या नफ्याचे आकडे वाढतच जाणारे आहेत.

बरं या विकत घेतलेल्या केसांचं पुढे काय होतं? हा प्रश्न हमखास पडतो.

उत्तर आहे – कृत्रिम केस बनवले जातात

विदेशात केसांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. Wigs बनवण्यासाठी आणि सेलिब्रिटी फॅडच्या Hair Extensions साठी या केसांचा वापर केला जातो.

 

 

ह्या पैश्यांचा वापर करून काही लाख लिटर दुध खरेदी करण्याचा निर्णय संस्थानाकडून घेण्यात आला होता. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसोबत लहान मुलांना देखील हे दुध देण्यात आल्याचे तिरुमाला तिरुपती देवस्थानचे चेअरमन चांदालवाडा कृष्णमूर्ती यांनी सांगितले होते.

याशिवाय गायीचे तूप खरेदी करून त्यांचेही वाटप करण्यात आले होते.

 

 

२००० वर्षे जुन्या या मंदिरात, दर वर्षी जवळपास १ कोटी भाविक आपले केस अर्पण करतात हे विशेष!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version