' ही अशी चित्रं आणि त्यांच्या किंमती पाहून तुम्हाला जोरदार शॉक लागेल! – InMarathi

ही अशी चित्रं आणि त्यांच्या किंमती पाहून तुम्हाला जोरदार शॉक लागेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चित्र हे मनुष्याच्या भावना, त्याची संस्कृती आणि त्याचे प्रेम दर्शवते. चित्र काढण्याची कला अवगत करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

कधी – कधी चित्र काढण्याचे कितीही क्लास जरी लावले, तरी काहींना नीट चित्र काढता येत नाही. चित्र काढण्यासाठी ते मनातून जगावे लागते.

थोर चित्रकार नेहमी आपल्या चित्राच्या विश्वामध्येच रमलेले असतात. ते त्यांच्या चित्रामधून वेगवेगळ्या भावना आणि नवनवीन विषय लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात.

 

painting inmarathi

काही चित्रे तर एवढी अप्रतिम असतात, की ती पाहिल्यावर त्या कलाकृती जिवंत असल्यासारख्या वाटतात.

तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची चित्रे पाहिली असतील, त्यांची भरभरून स्तुतीदेखील केली असेल. पण काही चित्रे समजण्याच्या पलीकडे असतात, कितीही तर्क लावण्याचा प्रयत्न आपण केला तरी ती आपल्याला समजत नाहीत.

चित्रकाराला त्या चित्रात नेमके काय दाखवून द्यायचे आहे, याच विचारात आपण असतो. पण शेवटी आपल्याला त्याचे उत्तर काही मिळत नाही.

महान नावजलेल्या चित्रकारांच्या चित्रांची मोठी प्रदर्शने भरवली जातात आणि त्यांच्या चित्रांचा लिलाव देखील केला जातो. या चित्रांच्या लिलावात लावण्यात आलेली बोली शेकडो – हजारात नाही, बहुतेकवेळा लाखात आणि कोटीमध्येच असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पण आज आम्ही तुम्हाला काही अश्याच प्रकारच्या चित्रांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या विक्री किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ते चित्र पाहून विचार कराल, की, यात नेमके असे काय आहे, ज्यामुळे त्याला एवढी किंमत दिली गेली आहे. चला मग पाहूयात ही चित्रे..

 

१. गेर्हार्ड रिफ्टर (Gerhard Richter) यांचे ब्लड रेड मिरर हे चित्र १.१ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza

 

यामध्ये चित्र शोधत असाल, तर हेच चित्र आहे.

ज्यांनी हे चित्र खरेदी केलं, त्यात त्यांचा नेमका काय उद्देश होता, हे कुणालाही ठाऊक नाही. मात्र त्यासाठी एवढी किंमत मात्र त्यांनी मोजली आणि ते देखील स्वेच्छेने.

 

२. लुसीओ फाँटाना (Lucio Fontana) यांचे Concetto spaziale हे चित्र १.५ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza1

 

या चित्राचा नेमका अर्थ कुणाला सांगता येईल का. मात्र हा अर्थ आपल्याला कळला नसला, तरी जगात अशीही व्यक्ती आहे, जिने हे चित्र खरेदी करण्यासाठी तब्बल दीड मिलियन डॉलर एवढी रक्कम खर्च केली आहे.

 

३. एल्सवर्थ केली (Ellsworth Kelly) यांचे ग्रीन व्हाईट हे चित्र १.६ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza2

 

४. जोन मिरो (Joan Miro) यांचे पेंचर (ले चेन) हे चित्र २.२ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza3

 

५. बार्नेट न्यूमॅन (Barnett Newman) यांचे व्हाईट फायर हे चित्र ३.८ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza4

 

६. एल्सवर्थ केली (Ellsworth Kelly) यांचे काऊबॉय हे चित्र १.७ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza5Ridiculous expensive paintings.marathipizza5

 

७. क्रिस्तोफर वूल (Christopher Wool) यांचे ब्लू फूल हे चित्र ५ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza6

 

८. क्रिस्तोफर वूल (Christopher Wool) यांचे रीवोट (१९९०) हे चित्र २९.९ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza7

 

९. बार्नेट न्यूमॅन (Barnett Newman) यांचे वनमेंट वी (Onement Vi) हे चित्र ४३.८ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza8

 

१०. बार्नेट न्यूमॅन (Barnett Newman) यांचे ब्लॅक फायर १ हे चित्र ८४.२ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza9

 

११. मार्क रोथको (Mark Rothko) यांचे ऑरेंज, रेड, येलो हे चित्र ८६.९ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza10

 

१२. बार्नेट न्यूमॅन (Barnett Newman) यांचे आना’स लाईट (Anna’s Light) हे चित्र १०५.७ मिलियन डॉलरना विकले गेले.

 

Ridiculous expensive paintings.marathipizza11

 

अशी ही चित्रे एवढी जास्त रक्कम मोजून लोकांनी विकत घेतली. मग आता तुम्हीच ठरवा, या किंमती या चित्रांसाठी योग्य आहेत की नाहीत ते… 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?