Site icon InMarathi

बेशुद्ध माणसाला खांद्यावर हॉस्पिटलमध्ये नेऊन जीव वाचवणारी “लेडी सिंघम”!

raj final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केला. खरं तर दोन वर्ष रखडलेलय या सिनेमाने दोनदा आपली प्रदर्शनाची तारीख बदलली, दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील थिएटर्स पुन्हा एकदा सुरु झाल्याने पहिलाच बिग बजेट सिनेमा रिलीज झाला तो म्हणजे  सूर्यवंशी.

सिंघम पासून ही पोलिस कॉप परंपरा सुरु झाली, सिंघम त्यानंतर सिम्बा आता सूर्यवंशी, बॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्ये पोलीस मुख्यतः भ्रष्ट किंवा गुन्हेगारांनाच मदत करणारे दाखवले आहेत, मात्र रोहित शेट्टी या दिग्दर्शकाने कायमच पोलिसांची प्रतिमा चांगली दाखवली आहे.

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

पोलिस म्हंटलं की आज अनेकजणांना धडकी भरते, मात्र तेच पोलीस अधिकारी खरं तर आपल्याच मदतीसाठी असतात, याचं एक मूर्तिमंत उदाहरण चेन्नईमध्ये पहायला मिळाले, कोण आहे तो अधिकारी चला तर जाणून घेऊयात…

 

 

काही दिवसांपासून चेन्नईमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, अतिवृष्टीमुळे रस्त्यांमध्ये झाडे पडलीआहेत, अनेक भागात पाणी साचले आहे, अशाच वेळी एक लेडी सिंघम लोकांच्या मदतीला धावून आली.

एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावर साहजिकच जवानांची मदत घ्यावी लागते मात्र इथे एक स्थानिक पोलीस अधिकारी असलेल्या राजेश्वरी यांनी आपली भूमिका चोखपणे पार पडली आहे, विशेष म्हणजे अशा कामांसाठी त्या ओळखल्या जातात.

 

deccanherald.com

 

नेमकं काय घडलं?

स्मशानभूमीत पडलेल्या झाडाखाली एक मृतदेह पडला आहे अशी माहिती स्थानिक पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली यामध्ये राजेश्वरी देखील होत्या, जेव्हा झाड बाजूला करण्यात आले तेव्हा असे लक्षात आले की तो माणूस जिवंत आहे कारण त्याची श्वास घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

लेडी सिंघम राजेश्वरी यांनी कोणताही विचार न करता किंवा आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी न टाकता, बचाव कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजेश्वरी यांनी त्या व्यक्तीला थेट खांदयावर उचलून घेतले, आणि सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी वाहन शोधायला निघाल्या,आणि त्यांना एका रिक्षावाला देखील दिसला. लगेचच राजेश्वरी यांनी त्या व्यक्तीला रिक्षात बसवले आणि बचाव कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याला त्या व्यक्तीसोबत पाठवले.

 

 

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, आज सगळ्या स्तरातून या लेडी सिंघमच कौतुक केले जात आहे. राजेश्वरी यांनी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की त्या स्वतः ऍथलेटिक्स आहेत, जेव्हा जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती उदभवते तेव्हा त्या कुठला ही मागचा पुढचा विचार करत नाही.

 

राजेश्वरी यांना ओळखणारे जे आहेत अधिकारी ते सुद्धा त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात, ते असं म्हणतात की राजेश्वरी या कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी पोलीस अधिकारी आहेत. ड्रग्स माफियांची प्रकरणं असो किंवा लैंगिक अत्याचाराची प्रकरण तितक्याच सचोटीने त्या हाताळतात.

 

 

आज अनेकांच्या मनात पोलिसांबद्दलची प्रतिमा खराब असताना, अशा धडकेबाज लेडी सिंघमच्या आतली माणुसकी जेव्हा जागी होती तेव्हा खरोखरच त्यांना एक खडक सॅल्यूट द्यावासा वाटतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version