जय भीमबरोबरच जातीवादावर भाष्य करणारे हे ७ ज्वलंत चित्रपट तुम्ही पाहायला हवेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या सोशल मीडियावर दोनच सिनेमांची चर्चा होताना दिसत आहे. एक म्हणजे सूर्यवंशी जो महामारीच्या काळानंतर रिलीज झालेला बिग बजेट सुपरहिट सिनेमा ठरला. तर दूसरा ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘जय भीम’ या सिनेमालासुद्धा चांगलंच यश प्राप्त झालं.
सामान्य प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून या सिनेमावर स्तुतिसुमनं उधळली जात आहेत. थिएटरमध्ये रिलीज झाला नसला तरी देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत हा सिनेमा पोचला असून, त्यामध्ये केलेल्या भाष्यावरसुद्धा सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
एकंदरच जातीवादावर भाष्य करणारा आणि बहुजन लोकांच्या समस्यांना वाचा फोडणारा आणि जस्टीस के.चंद्रू यांच्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे.
मेनस्ट्रीम सिनेमातून असं परखड भाष्य फार कमी केलं जातं, बॉलीवूडमध्ये तर ते फार क्वचित बघायला मिळतं आणि जरी केलं गेलं तरी ते पॉलिटिकली करेक्ट करण्याच्या प्रयत्नात असतात, पण गेल्या काही महिन्यांपासून साऊथच्या सिनेमातून असं परखड भाष्य बऱ्याच सिनेमातून होताना आपण बघत आहोत.
आज या लेखातून आपण अशाच काही सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यातून जातीवादावर भाष्य करण्याचं धाडस दिग्दर्शकाने केलं आणि प्रेक्षकांनीसुद्धा अशा प्रयत्नांना मनापासून दाद दिली.
१. असुरन :
वेत्रीमारन आणि सुपरस्टार धनुषचा असुरन कुणीच विसरू शकणार नाही. तामिळनाडूमधलं एक दलित कुटुंबच स्वतःच्या अस्तित्वासाठी कसं सवर्ण समाजाशी दोन हात करतं, हे दाखवताना दिग्दर्शकाने कुठेही हात आखडता घेतला नसून, खूप परखड भाष्य या कथेतून केलं गेलं आहे.
या सिनेमात दाखवलेलं वास्तव बघताना खरंच काही ठिकाणी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. धनुषसारखा मोठा स्टार या सिनेमात असूनसुद्धा सिनेमा कुठेही भरकटत नाही.
२. अंकुर :
–
- बहुजनांचा आवाज बनून ९६००० प्रकरणांत न्यायदान करणारा पडद्यामागील ‘जय भीम’!
- नागपूरच्या २०० दलित महिलांनी चक्क भर कोर्टात एका नराधमाला यमसदनी धाडलं!
–
श्याम बेनेगल यांची पहिली फिचर फिल्म आणि शबाना आजमीचा पहिला सिनेमा ‘अंकुर’ हा सुद्धा त्याकाळचा बोल्ड सिनेमाच होता. एक विवाहित पुरुष एका खालच्या जातीच्या महिलेच्या प्रेमात पडतो आणि नंतर त्यामुळे गावात सगळीकडेच चर्चा होते.
त्यानंतर २ महिलांमध्ये निर्माण होणारा तणाव, सामाजिक विषमता आणि लोकांची मानसिकता दाखवण्यात बेनेगल यांना यश मिळालं, आजच्या काळाशीही सुसंगत असा सिनेमा देणाऱ्या शाम बेनेगल यांचे यासाठी आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
३. सैराट :
मराठी चित्रपटसृष्टीत क्रांति घडवणारा चित्रपट कोणता तर पहिले नाव येतं ते सैराटचं. सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केलीच पण बॉलीवूडलासुद्धा या सिनेमाचा रिमेक करायचा मोह आवरला नाही.
सामाजिक विषमता आणि त्यामुळे निर्माण होणारी ऑनर किलिंगची समस्या ही नागराज मंजुळेने ज्या पद्धतीने दाखवली आहे तसं आजवर कोणत्याच सिनेमातून समोर आलेलं नाही.
लव्हस्टोरीमध्ये छान झुरवत हा सिनेमा तुम्हाला धाडकन जमिनीवर आदळतो आणि समाजातलं भीषण वास्तव दाखवतो तेव्हा आपण सगळेच सुन्न होतो!
४. आर्टिकल १५ :

उत्तर प्रदेशच्या बदाऊन गॅंगरेप प्रकरणावर बेतलेला अनुभव सिन्हाच्या या सिनेमाचीसुद्धा चांगलीच चर्चा झाली होती. सिनेमा खूप डार्क होता आणि आयुष्मानसारख्या अभिनेत्याचा अप्रतिम अभिनय आणि इतर कलाकारांची साथ यामुळेच हा सिनेमा लोकांच्या लक्षात राहिला.
जातीमुळे एका मुलीवर अनन्वित अत्याचार होतात आणि त्यानंतर त्यांच्या समाजाचा लढा देतो आणि पोलिस यंत्रणेतल्या त्रुटी अशा बऱ्याच गोष्टी या सिनेमात अधोरेखित केल्या गेल्या!
५. मसान :
घाटावर अंतिम संस्कार पार पडणाऱ्या कुटुंबातला एक मुलगा आणि चांगल्या उच्चभ्रू घरातली मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्याच कहाणीला समांतर जाणारी एका तरुणीची कहाणी असलेला मसान या सिनेमाला लोकांनी पसंती दर्शवली.
स्त्रीकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन आणि जातिभेद या गोष्टी सिनेमातून खूप प्रभावीपणे दाखवल्या गेल्या. विकी कौशल, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, रिचा, संजय मिश्रा यांच्या लाजवाब अभिनयाने नटलेला हा सिनेमासुद्धा आपल्याला बरंच काही शिकवून जातो.
६. मांझी – द माऊंटेन मॅन :
दशरथ मांझी ज्यांनी एक भला मोठा पर्वत फोडून गावातल्या लोकांसाठी रस्ता तयार केला त्यांच्यावर आधारीत या सिनेमातसुद्धा जातीवादावर टीका केली गेली.
पत्नीच्या मृत्यूनंतर दशरथ यांच्या संघर्षाला या सिनेमात अधोरेखित केलं आहे. नवाजुद्दीन आणि राधिका आपटे यांनी या सिनेमात खूप अप्रतिम काम केलं आहे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
७. आरक्षण :
सिनेमाच्या नावावरून आपल्याला समजलं असेल की तो कशावर भाष्य करणार आहे. सध्याची शिक्षण पद्धती, कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट आणि शिक्षणासाठी दिलं जाणारं आरक्षण यावर भाष्य करणारा प्रकाश झा यांच्या या सिनेमालासुद्धा लोकांनी पसंती दर्शवली.
सिनेमाने स्वतःचा असा स्टँड घेतला नसला तरी काही गोष्टी स्पष्टपणे मांडण्यात सिनेमा कुठेच कमी पडलेला नाही. अमिताभ बच्चन, दीपिका पदूकोण, मनोज बाजपेयी आणि सैफ अली खानसारखे मातब्बर कलाकार यात असल्यावर सिनेमा उत्कृष्टच असणार यात वादच नाही.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.