Site icon InMarathi

“ड्रीम ११ सारखे फँटसी गेम्स म्हणजे निव्वळ सट्टेबाजी”, समज की गैरसमज?

Fantasy cricket IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संकल्पना आणि विचार: हिमांशू वाढवणकर

शब्दांकन: ईशान घमंडे

===

फक्त क्रिकेटच नाही, जगभरातील जवळपास सगळ्याच खेळांचे फँटसी स्पोर्ट्स अस्तित्वात आहेत. भारतीयांना क्रिकेट अधिक प्रिय असल्यामुळे, आपल्याला मात्र ड्रीम ११, एमपीएलसारख्या काही मोजक्या फॅन्टसी स्पोर्ट्सबद्दल ठाऊक असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अशा प्रकारच्या फँटसी स्पोर्ट्समध्ये भाग घेणारे खेळाडू, आपली स्वतःची अशी एक व्हर्चुअल टीम तयार करतात. या टीममध्ये असणाऱ्या खेळाडूंनी ‘मैदानावर’ केलेली कामगिरी, आणि त्यानुसार खेळाडूंना मिळालेले पॉईंट्स, यानुसार फँटसी स्पोर्ट्समधील मॅचेसचा विजेता ठरवला जातो.

कधी अशा अॅप्सकडून मिळणारे ‘व्हर्चुअल’ पैसे, तर कधी स्वतःच्या खिशातून घातलेले खरे पैसे यांचा वापर करून असे स्पोर्ट्स खेळले जातात, हे तुमच्यापैकी अनेकांना ठाऊक असेल. भारतात असणारी क्रिकेटची लोकप्रियता आणि क्रिकेटमध्ये खेळाडूंना पॉईंट्स देण्यासाठी उपलब्ध असणारी संधी, यामुळे भारतात क्रिकेटच्या फँटसी स्पोर्ट्सची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते.

 

 

अर्थात, हे फँटसी स्पोर्ट्स खेळत असताना, कुठल्याही संघावर किंवा खेळाडूवर थेट पैसा लावला जात नाही. याशिवाय खेळात घडलेल्या आधीच्या गोष्टी, खेळपट्टी आणि मैदानाची परिस्थिती या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं असतं. सट्टेबाजी किंवा बेटिंग यात मात्र असं काहीही नसतं. यात थेट एखाद्या संघावर किंवा खेळाडूवर पैसा लावण्यात येतो. तिथे कामगिरी बिघडली की पैसे बुडालेच म्हणून समजा.

धिस इज बिझनेस…

फँटसी स्पोर्ट्समध्ये होणाऱ्या मॅचेस, त्यात दिला जाणारा पैसा म्हणजे दुसरं-तिसरं काहीही नसून फक्त एक धंदा आहे.

उदाहरणच द्यायचं झालं, तर असं समजा की १ रुपया एंट्री फी असणाऱ्या एखाद्या मॅचमध्ये १ करोड रुपयांचं पहिलं बक्षीस आहे. आता ही अशी लालूच दाखवल्यावर करोडोच्या संख्येने लोक यात भाग घेतील. ४ करोड लोकांनी यात भाग घेतला, तर अॅपला ४ करोड रुपये मिळणार आहेत. यातून पहिलं बक्षीस १ करोड, दुसरं ५० लाख आणि तिसरं २५ लाखांचं असेल, तरीही हे पावणेदोन लाख वजा जाता, उरलेली रक्कम हा अॅपचा निव्वळ नफा झाला.

म्हणजेच अनेक जणांच्या खिशातून १-१ रुपया घेऊन त्यातल्या काही जणांना आर्थिक फायदा मिळवून द्यायचा आणि बक्कळ रक्कम आपल्याही खिशात घालायची असा साधा, सोपा फंडा असतो.

 

‘फुकट’ मॅचेसमधून झाली आहे फँटसी स्पोर्ट्सची सुरुवात

तुम्ही म्हणाल यातही, पैसा दाव्यावर लागलाच की! पण, हे पैसे गुंतवताना आपण टीममध्ये घेत असलेले खेळाडू कसे खेळतील, मैदानाची परिस्थिती किंवा तत्सम गोष्टींचा अभ्यास यासाठी करावा लागतो. मात्र तुम्हाला ही गंमत माहित आहे का? की या अशाप्रकारच्या फँटसी गेम्सची सुरुवात पैसे न लावता खेळण्याच्या स्पर्धेतून झाली आहे.

एखादा कार्यक्रम किती लोक बघतात आणि किती काळ बघतात, त्यानुसार त्या कार्यक्रमादरम्यान जाहिराती लागतात. त्यानुसार या जाहिरातींचे दर ठरतात. मग अधिकाधिक लोकांनी हे खेळांचे सामने पाहावेत यासाठी फँटसी स्पोर्ट्सची शक्कल लढवण्यात आली होती.

कुठल्याही प्रकारची एंट्री फी न देता तुम्हाला फँटसी स्पोर्ट्समधली मॅच खेळता येणार असेल आणि ती जिंकलात तर आकर्षक बक्षीसं मिळणार असतील, तर तुम्ही स्पर्धा खेळालचा ना! आत ही स्पर्धा खेळायची असेल, तर खेळाडूंची कामगिरी कशी होतेय, हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सामने बघणार. पर्यायाने त्यांचा प्रेक्षकवर्ग वाढणार आणि जाहिरातींसाठी अधिक पैसा मिळणार…

 

 

हे अशाप्रकारचं गणित अनेक खेळांमधील फँटसी स्पोर्ट्समध्ये वापरलं जातं. अगदी साधं, सोपं आणि शंभर टक्के खात्रीने नफा मिळवून देणारं गणित!

क्रिकेट व्यतिरिक्त, फुटबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल आणि अशा अनेक खेळांमध्ये या संघटनाच स्वतःच्या पुढाकाराने फँटसी स्पोर्ट्सची निर्मिती करतात. जाहिरातीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी केलेली ही युक्ती असते.

अशाप्रकारच्या खेळामध्ये भारतीय अधिक ‘वेडे’ आहेत असं म्हणायला हवं. कारण जगभरातील फँटसी खेळाडूंपैकी जवळपास २० ते २५ टक्के खेळाडू हे भारतीय आहेत. आता तुम्हीच बघा हा आकडा किती मोठा असेल. भारतात क्रिकेटचं वेड अधिक असल्याने, भारतात क्रिकेट फँटसी अॅप्स जरा अधिकच आहेत.

चटक लागण्याची शक्यता…

अशा प्रकारच्या खेळांची चटक लागण्याची शक्यता असतेच, यात काहीच शंका नाही. मात्र हे अशा प्रकारचे खेळ खेळण्यासाठी खेळाडूंची कामगिरी, मैदानांची स्थिती, संघबांधणी, या सगळ्यांच्या स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच, नशिबावर अवलंबून राहावं लागत असलं, तरी तुमचा अभ्यास हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

म्हणजेच सट्टेबाजी/बेटिंग आणि फँटसी स्पोर्ट्स यांच्यात एक अगदी पुसटशी रेषा आहे, असं म्हटलं तरी ते अगदीच चुकीचं ठरत नाही.

 

 

फँटसी स्पोर्ट्समध्ये पैसा मिळत गेला, तर अधिकाधिक पैसा गुंतवण्याची इच्छा होऊ शकते. नेहमीच या स्पर्धा तुम्ही जिंकाल याची खात्री नक्कीच देता येणार नाही. तुम्ही कितीही अभ्यास करून तुमची टीम बनवली असेल, तरीही तुमच्यापेक्षा अधिक स्मार्ट कुणीतरी त्या मॅचमध्ये असू शकतो, आणि तो स्पर्धा जिंकू शकतो.

एक खेळ म्हणून, गंमत म्हणून किंवा चांगला अभ्यास असेल, तर पैसे मिळवण्याची संधी म्हणून सुद्धा फँटसी स्पोर्ट्सकडे बघायला हरकत नाही. पण, अशा गोष्टींमध्ये आपल्या मनावर आपला ताबा असायला हवा हे मात्र खरं…

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version