Site icon InMarathi

काश्मीरमध्ये दक्ष असलेल्या जवानांच्या टोपीची ही खास बाब वाचून थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सैनिकांना त्यांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घ्यावी लागते. त्यासाठी त्यांना बुलेटप्रुफ जॅकेट, रायफल हे सोबत ठेवावं लागेलं. कारण त्यांच्यावर नेहेमी शत्रूंची नजर असते.

 

 

त्यामुळे त्यांचावर नेहेमी संकट असते. कारण कधी कुठून शत्रूची गोळी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नेहेमी सीमेची रक्षा करणाऱ्या जवानांकडे सर्व सुविधा उपलब्ध असतात.

 

 

पण बुलेटप्रुफ जॅकेट, रायफल आणि हेल्मेट असं सर्व बघतो पण ह्याव्यतिरिक्त देखील आणखी एक आगळावेगळा प्रकार बघायला मिळतो. त्याला पटका म्हणतात. हे हेल्मेट मुख्यकरून काश्मिरातील सैनिकांच्या सुरक्षिततेकरिता बनविला जातो.

 

newindianexpress.com

 

पटका हेल्मेटला विशेषकरून शीख सैनिकांसाठी बनविण्यात आले होते ज्यांना सेनेतील मॉडल १९७४ चा हेल्मेट घालायला अडचण येत होती. पण सध्या काश्मीर येथे कर्तव्यावर असणारे सर्व जवान हेल्मेट व्यतिरिक्त हा पटका वापरतात.

पटका ह्याची विशेषता म्हणजे हे हेल्मेट सेनेच्या स्टॅण्डर्ड हेल्मेटच्या तुलनेत हलके आणि आरामदायी आहे.

 

topyaps.com

 

पटका खूप वेळ घालून राहिल्यावर देखील थकवा जाणवत नाही, जो स्टॅण्डर्ड हेल्मेटमध्ये जाणवतो. ह्याच्या फ्लॅप्सना मान, गळ आणि डोळे वाचविण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. पटका हा आतून अतिशय मऊ वस्तूपासून बनला असतो, जे घातल्याने त्रास होत नाही.

पटका हा अतिशय थंड हवामान असणाऱ्या ठिकाणी देखील वापरला जाऊ शकतो. कारण हा आतून उबदार असतो. शीख जवान हा पटका अगदी सहजपणे आपल्या पगडीवर घालू शकतात.

 

topyaps.com

 

एवढचं काय तर हा पटका एके-47 च्या हल्ल्यापासून देखील रक्षा करण्यात सक्षम असतो. जवळून जरी हल्ला झाला तरी हा सुरक्षा करण्यात सक्षम आहे. कारण ह्याला तसेच बनविल्या गेले आहे की, एके-47 च्या गतिमान गोळ्या देखील भेदू शकणार नाही.

कारण काश्मीर खोऱ्यात असणारे आतंकवादी हे जास्त करून एके-47 ह्या बंदुकीचा वापर करतात.

 

hindustantimes.com

 

त्यासोबतच हा पटका आधुनिक संचार उपकरण, दुर्बीण, रेंजफिडर आणि नाईट व्हिजन उपकरणांसोबत देखील वापरता वापरता येतात. ह्याला एवढ्या सामान्य तर्हेने डिझाईन करण्यात आले आहे की, कुठलेही उपकरण अगदी सहजपणे ह्यासोबत अॅडजस्ट होऊन जाते.

सद्यस्थितीत पटका हेल्मेट हे राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि काश्मीरमध्ये असणाऱ्या पॅरा स्पेशल जवान वापरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version