' शेवटी बायकोला होणारा त्रास समजला नवऱ्याला, आणि त्याने लावला हा शोध… – InMarathi

शेवटी बायकोला होणारा त्रास समजला नवऱ्याला, आणि त्याने लावला हा शोध…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गरज ही शोधाची जननी असते. आजवर लागलेल्या अनेक छोट्या मोठ्या शोधांनी हे सिध्दही केलेलं आहे. आज तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलेलं बॅण्ड एड हे देखील असं गरजेतून निर्माण झालेलं उत्पादन आहे. या शोधामागे केवळ गरजच आहे असं नाही तर एका नवर्‍याचं बायकोवरचं प्रेम देखील या शोधासाठी कारणीभूत आहे-

अगदी मोठ मोठ्या वैज्ञानिक शोधांपासून ते रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या असंख्य गोष्टींच्या शोधानं माणसाचं रोजचं जगणं अधिक सुखकर बनवलं आहे. आज आपण अनेक गोष्टी अगदी सहज येता जाता वापरतो मात्र काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या अस्तित्वातही नव्हत्या.

 

The-Invention-of-Penicillin-inmarathi
oldpikz.com

 

कोणाच्या तरी डोक्यात कल्पना येते आणि मग एखाच्या गोष्टीची निर्मिती होते. मग ते विकतचं दही असो की एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेणारं वाहन असो. असाच एक बघायला गेलं तर छोटीशी वाटणार्‍या गोष्टीचा शोध.

 

 

आपल्या सगळ्यांच्याच घरात प्रथमोपचाराच्या डब्यात हमखास असणारी अशी ही गोष्ट. आज तिचं असणं अगदी स्वाभाविक वाटत असलं तरीही तिच्या शोधाची गोष्ट मात्र गंमतीची आहे. ही गोष्ट आहे किरकोळ जखमांवर लावायची तयार बॅण्डेज. मुलं खेळता खेळता धडपडतात,

स्वयंपाक घरात भाज्यांची चिराचिरी करत असताना कापलं जातं या किंवा अशा अनेक किरकोळ स्वरूपातील छोट्या जखमांवर आपण पटकन बॅण्ड एड लावून टाकतो. पूर्वी एक काळ असा होता जेंव्हा अशा छोट्या जखमांसाठी बॅण्डेज करणं इतकं सुलभ नसायचं. त्या काळात या अशा किरकोळ जखमाही तापदायक वाटत असत.

 

adobe inmarathi
adobe stock

जोसेफ़ाईन डिक्सन ही धडपडी बाई बॅण्डेजच्या शोधाचं कारण बनली. त्याचं झालं असं की, जोसेफ़ाईनला स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना सतत छोट्या मोठ्या दुखापती होत असत. कितीही काळजीपूर्वक काम केलंतरीही सतत काही न काही कापलं जात असे, कुठेतरी जखम होत असे.

आता या किरकोळ जखमांचं काही कौतुक नसलं तरीही लक्षात घ्या जोसेफाईनचा काळ होता, १९२० चा. त्या काळात कुटुंबंही आजच्यासारखी आटोपशिर नव्हती. एकत्र कुटुंबं आणि सतत येणारे जाणारे पाहुणे रावळे यांनी घरं गजबजलेली असत. त्यामुळे स्वयंपाक करताना कापलं तर त्याचं कौतुक करत बसायलाही घरच्या स्त्रीला वेळ नसे.

काही कापलं, खुपलं तर चिंधी बांधून काम पुढे नेलं जात असे. त्याकाळात अशा जखमांना बॅण्डेज करण्याची सोपी, सुटसुटीत सोय तर नव्हतीच मात्र घरगुती कापडाच्या चिंध्या ओल्या जखमेवर बांधल्यांनं सतत संसर्ग होत असत. त्याचप्रमाणे त्या काळात ॲण्टिबायोटिक्सचा शोधही लागलेला नसल्यानं बरेचदा या सुरवातीला किरकोळ वाटणार्‍या या जखमा पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करत असत.

 

handcut inamarathi

 

इतर अनेक गृहिणींप्रमाणेच जोसेफाईनही असं काही लागलं खुपलं तर जखम स्वच्छ धुवून घरातल्या कापडाची चिंधी बांधून टाकत असे. मात्र तिला सतत काही न काही लागत असल्यानं या जखमा दुखतही असत. तिनं एकदा बोलता बोलता तिच्या नवर्‍याला म्हणजे, अर्ले डिक्सनला आपली ही व्यथा बोलून दाखविली.

अर्ले जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या कंपनीत कामाला होता आणि तो कंपनीसाठी कापूस खरेदी करत असे. जोसेफाईनची तक्रार ऐकून तो काळजी आणि विचारात पडला. विचार करता करता त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की समजा तो जर जखमेवर बांधण्यायोग्य अशी बॅण्डेज बनवून तयार ठेवू शकला तर जोसेफ़ाईनचं काम सोपं तर होणार होतंच शिवाय जखमेवर होणारा संसर्गही टाळला जाणं शक्य होतं.

 

jj inmarathi

 

हा विचार कृतित आणताना अर्लेनं बॅण्डजचं डिझाईन तयार केलं आणि त्यानुसार तो अण्टीसेप्टिक कॉटन गॉज आणि जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या निर्जंतुकीकरण शस्त्रक्रिया उत्पादनाचा भाग असणारा सर्जिकल ॲधेसिव्ह टेप घेऊन आला. त्याने १८ इंच लांब आइ ३ इंच रुंद अशी टेपची पट्टी घेतली आणि मधभागी कापसाचा एक छोटासा तुकडा घातला. यानंतर त्यानं ही टेप क्रिनोलिन फ़ॅब्रिकनं झाकून ठेवली जेणेकरून याचा एक रोल बनवून ठेवता येईल आणि चिकटपट्टी स्वत:लाच चिकटणार नाही. अशा रेडिमेड पट्ट्या तयार करून ठेवल्यानं जोसेफाईनचं काम सोपं झालं.

 

jj 1 inmarathi

आपण लावलेला हा शोध अर्लेनं कंपनीत सहकार्‍यांना सांगितला आणि त्या काळात ही एक अभिनव कल्पना असल्यानं ती लगेचच उचलून धरली गेली. अर्लेच्या बॉसच्या कानावरही ही गोष्ट गेली आणि अर्लेच्या बॅण्डेजमधे व्यावसायिक उत्पादनाची क्षमता असल्याचं त्यानं ताडलं. अशा रीतीने जगातलं पहिलं बॅण्ड एड जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीनं बाजारपेठेत आणलं जे आजतागायत जगभरातल्या जवळपास प्रत्येक घरात वापरलं जातं असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?