Site icon InMarathi

लाल किल्ल्यावर युनियन जॅक काढून तिथे तिरंगा फडकवणारे शाहरुखचे आजोबा…

shah nawaz 3 featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बलिदान देणार्‍या अनेक देशभक्तांची गाथा इतिहासात अदृश्य झाली आहे. काही जण तर ‘अनाम वीर’ अर्थात अनसंग हीरो ठरले आहेत.

आज आपण एका अशा योध्याची कहाणी पहाणार आहोत जो आपल्या देशप्रेमाच्या भावनेशी ठाम राहिला आणि फाळणीची जखम होवून परिवारापासून दुरावला पण त्याने देश सोडला नाही. तो हीरो आहे ‘शहानवाज खान’.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आता तुम्ही म्हणाल देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले मग शाहनवाज खान यांचे वेगळेपण काय तर शाहनवाज यांचे वेगळेपण हे की त्यांचे कुटुंब फाळणी नंतर पाकिस्तानात असताना हा पठ्ठ्या तिकडून इकडे परत आला. इतकेच नाही तर उर्वरित आयुष्य त्याने भारतामध्येच व्यतीत केले.

असे म्हंटले जाते की अभिनेता शाहरुख खान याची आई ‘शहानवाज खान यांची दत्तक मुलगी होती.

 

 

आझाद हिंद फौजेची आणि त्याच्याशी संबंधित शौर्यगाथा हा असाच एक प्रसंग आहे. आझाद हिंद फौजेचे मेजर जनरल शाहनवाज खान हे महान देशभक्त, शूर सैनिक आणि सुभाषचंद्र बोस यांच्या अगदी जवळचे होते.

निडर सैनिकासोबतच ते एक सच्चे समाजसेवक आणि द्रष्टे राजकारणीही होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी संसदीय राजकारणातही आपली खोल छाप सोडली.

शाहनवाज खान यांचा जन्म ब्रिटीश काळात २४ जानेवारी १९१४ रोजी रावळपिंडी जिल्हा (आता पाकिस्तान) या मातौर गावात सरदार टिका खान यांच्या घरी झाला.

 

 

लष्करी कुटुंबात जन्मलेल्या शाहनवाजने आपल्या वडिलांच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पाकिस्तानात झाले. त्यांनी पुढील शिक्षण प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून येथे पूर्ण केले. १९४० मध्ये ते ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले.

जेव्हा ते ब्रिटीश सैन्यात सामील झाले तेव्हा पहिले महायुद्ध चालू होते आणि त्यांची पोस्टिंग सिंगापूरमध्ये झाली होती. शेकडो ब्रिटिश सैनिकांना जपानी सैन्याने कैद केले होते. सुभाषचंद्र बोस १९४३ मध्ये सिंगापूरला आले.

आझाद हिंद फौजेच्या मदतीने या बंदिवान सैनिकांची सुटका करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. नेताजींच्या बोलक्या आवाजाने आणि ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन’ या उत्कट घोषणांनी प्रभावित होऊन शेकडो सैनिक जनरल शाहनवाझसह आझाद हिंद फौजेत सामील झाले.

 

 

ब्रिटीश सैन्याने १९४५ मध्ये झालेल्या लढाईत जनरल शाहनवाज आणि त्यांच्या टीमला बर्मामध्ये पकडले.

नोव्हेंबर १९४६ मध्ये फिरंगी सरकारने दिल्लीतील लाल किल्ल्यावर मेजर जनरल शाहनवाज खान, कर्नल प्रेम सहगल आणि कर्नल गुरबक्ष सिंग यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला. पण प्रचंड सार्वजनिक दबाव आणि पाठिंब्यामुळे ब्रिटिश सैन्याच्या जनरल अचनिलेक यांना आझाद हिंद फौजेच्या अधिकाऱ्यांना दंड आकारून सोडून द्यावे लागले.

लाल किल्ल्यावर झालेल्या या तारखेच्या सुनावणीत सर तेज बहादूर सप्रू, जवाहरलाल नेहरू, असफ अली, भुलाभाई देसाई आणि कैलाश नाथ काटजू यांनी जनरल शाहनवाझ खान आणि आझाद हिंद फौजेच्या इतर अधिकाऱ्यांचा बचाव केला होता.

स्वतंत्र भारतात लाल किल्ल्यावर ब्रिटिश राजवटीचा झेंडा उतरवून तिरंगा फडकवणारे जनरल शाहनवाज हे एकमेव होते. देशाच्या पहिल्या तीन पंतप्रधानांनी जनरल शाहनवाज यांचा उल्लेख करून लाल किल्ल्यावरून भाषणाला सुरवात केली होती.

 

ibgnews.com

 

महात्मा गांधींच्या प्रेरणेने ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. १९४७ मध्ये काँग्रेस सेवादलाच्या सदस्यांना सैनिकांप्रमाणे प्रशिक्षण आणि शिस्त देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. जनरल शाहनवाज यांना काँग्रेस सेवा दलाचे सेवापती पद बहाल करण्यात आले.

आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ते काँग्रेस सेवादलाशी निगडीत होते. १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मेरठमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. यानंतर १९५७, १९६२ आणि १९७२ मध्येही त्यांनी मेरठमधून लोकसभा निवडणूक जिंकली.

जनरल शाहनवाज २३ वर्षे केंद्रात मंत्री होते. त्यांनी रेल्वेशिवाय कृषी, कामगार आणि पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली.

दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी मेरठसारख्या संवेदनशील शहराचे प्रतिनिधित्व केले, त्या काळात शहरात कधीही मोठा हिंसाचार किंवा जातीय तणाव झाला नाही.

तुम्ही कल्पना करू शकता की मेरठमध्ये चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेली व्यक्ती, जी दीर्घकाळ केंद्रीय मंत्री होती, त्या व्यक्तीचा मुलगा १९६५ साली पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पाकिस्तान लष्कराचा मोठा अधिकारी होता. दरम्यान देशात ही बातमी पसरली आणि सगळीकडे गदारोळ उठला.

 

 

शाहनवाज यांच्याकडून राजीनाम्याची मागणी होवू लागली. पण त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी त्यांचा बचाव तर केलाच पण राजीनामा स्वीकारण्यासही नकार दिला होता.

मित्रांनो लाल किल्ल्यावर युनियन जॅक काढून तिथे तिरंगा फडकवणारे आझाद हिंद सेनेचे शाहनवाज खान यांची ही कहाणी आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version