' घरी येऊनही आर्यन शॉकमध्येच! ‘काय’ झालीये अवस्था? जवळच्या मित्रांनी सांगितलं सत्य – InMarathi

घरी येऊनही आर्यन शॉकमध्येच! ‘काय’ झालीये अवस्था? जवळच्या मित्रांनी सांगितलं सत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडचा किंग खान, म्हणजेच शाहरुखच्या मुलाला, आर्यन खानला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स प्रकरणावरून अटक केली होती. तब्बल २६ दिवसांनी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

आर्यनला अटक झाल्यानंतर काही दिवस त्या गोष्टीची चर्चा होती, ते प्रकरण बाजूला पडून नंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातच वेगळं द्वंद्वयुद्ध सुरु झालं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या प्रकरणाची सगळीकडेच खूप चर्चा होती. या प्रकरणातून नंतर अनेक नावं समोर आली, राजकीय वर्तुळापासून कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांना या प्रकरणात गुंफले गेले. सोशल मीडियावर तर सतत याच विषयावर बोलण्यात येत होतं.

आर्यनला बेल मिळेल की नाही, त्याला किती दिवस अजून तुरुंगातच राहावं लागेल या सगळ्याविषयीच संदिग्धता होती, त्याला बेल मिळाली आणि मन्नतच्या बाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी जल्लोषच केला, पण घरी आल्यानंतर आर्यनची अवस्था भलतीच झालीये.

तुरुंगातून घरी आल्यानंतर आर्यन शांत शांत राहतोय, त्याच्या जवळच्या मित्रांनी या गोष्टीचा खुलासा केला. एवढे दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्या मानसिक धक्क्यातून सावरणं त्याला कठीण जातंय.

 

aryan khan inmarathi

 

तुरुंगातील दिवसांमध्ये आर्यनने जे काही सहन केलंय, त्यातून सावरायला त्याला बराच वेळ लागणार आहे, असं एकंदरीत त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीवरून जाणवतंय.

‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, ‘तो फार काही बोलत नाही, एकटा एकटाच राहतो. दिवसातला बराचसा वेळ तो त्याच्या खोलीतच असतो. मित्रांना वगैरे भेटण्यासाठीही तो बाहेर पडत नाही. आर्यन आधीपासून शांत होता, मात्र आता तो अजूनच अबोल झाला आहे. जामीन मिळूनही त्याला आज आठवडा झाला, पण अजूनही तो त्या धक्क्यातच आहे. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला स्वतःची वेळ देण्याचं ठरवलंय.’ असं त्याच्या एका फॅमिली फ्रेंडने सांगितलं.

आता अजून एक प्रश्न म्हणजे ‘बॉडीगार्ड’चा. इतक्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर आर्यन बाहेर पडताना त्याच्यासोबत बॉडीगार्ड असेल की नाही या प्रश्नावर देखील ‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टने प्रकाश टाकला आहे.

आर्यनसाठी सध्या वेगळा बॉडीगार्ड ठेवण्याचा कोणताही प्लॅन नाहीये. शाहरुख सध्या २४ तास त्याच्या मुलासोबतच राहणार आहे. शाहरुखने त्याची सगळी शुटिंग्स पुढे ढकलली आहेत. सध्या आर्यनला शाहरुखची गरज आहे आणि स्वतःच्या मुलासाठी शाहरुख कायम त्याच्यासोबतच राहणार आहे.’ असे सूत्रांनी सांगितलेल्या माहितीवरून कळते.

 

aryan khan inmarathi

 

खरं पाहता एवढ्या मोठ्या स्टारचा मुलगा, ऐषो आरामाची सवय असणारा मुलगा जेव्हा २६ दिवस तुरुंगात घालवतो, तेव्हा त्याला मानसिक धक्का बसणं साहजिकच आहे. त्यात आजूबाजूला झालेल्या गदारोळाची आणखीनच भर पडली आहे. हळूहळू आर्यन या धक्क्यातून सावरेल असं त्याच्या कुटुंबीयांचं मत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?