Site icon InMarathi

हिंदुत्व आणि ISIS ची तुलना : काँग्रेसच्या नेत्याने पुन्हा अकलेचे तारे तोडलेच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारणी आणि वाद हे समीकरण आता सामान्यांसाठी सुद्धा नवीन राहिलेलं नाही. राजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीला किमान एखाद्या विषयावरून तरी वादाला तोंड फोडता आलं नाही, तर तो फाऊल मानला जात असावा, अशा पद्धतीने ही राजकारणी मंडळी वागत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कधी बोलण्यातून, कधी वागण्यातून, तर कधी आपण लिहिलेल्या पुस्तकांमधून सुद्धा ही मंडळी वाद निर्माण होतील असे विचार मांडतात. असाच एक वाद काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकामुळे सुद्धा निर्माण झाला आहे.

पुस्तकाचं प्रकाशन

बुधवारी सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि पी चिदंबरम हेदेखील पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उपस्थित होते. ‘सनराईझ ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ असं या पुस्तकाचं नाव आहे.

सलमान खुर्शीद यांनी आपल्या या पुस्तकातून हिंदुत्वाची तुलना थेट ISIS आणि बोको हरामशी केली आहे.

 

 

या पुस्तकात खुर्शीद यांनी म्हटलं आहे, की हिंदुत्व हा केवळ राजकारणाचा मुद्दा झाला आहे. निव्वळ राजकारणासाठी याचा वापर करण्यात येतो. निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळीच हिंदुत्वाबद्दल सर्वाधिक बोललं जातं.

भाजप आयटी सेल प्रमुखांनी केली टीका

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला धारेवर धरलं आहे. या पुस्तकातून हिंदुत्वाची आयसीस आणि बोको हरामशी तुलना करणं हे काँग्रेसच्या नेत्याकडून अपेक्षितच आहे, असा त्यांच्या बोलण्याचा रोख दिसतो.

 

 

“जो पक्ष इस्लामिक जिहादला महत्त्व देण्यासाठी आणि मुस्लिम मतं मिळवण्यासाठी ‘भगवा आतंकवाद’ या शब्दाची निर्मिती करू शकतो, त्या पक्षाकडून अशाच वागण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.” असं मालवीय यांनी म्हटलं आहे.

चिदंबरम आणि दिग्विजय सिंग म्हणतात की…

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अयोध्या प्रकरणावर निशाणा साधला होता. ते म्हणाले, की “ज्याप्रमाणे जेसिकाची हत्या कुणीही केली नाही त्याचप्रमाणे बाबरी मशीद सुद्धा कुणीही पाडली नाही.”

६ डिसेंबर १९९२ साली घडलेली घटना फारच चुकीची होती, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, एपीजे अब्दुल कलाम यांच्या देशात, ‘बाबरी कुणीही पाडली नाही’ असं म्हणावं लागतं ही खेदजनक बाब असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.

 

 

दिग्विजय सिंग यांनी यावेळी हिंदू धर्माबद्दल भाष्य केलं. ५०० वर्ष मुघलांच्या आणि १५० वर्षं इंग्रजांच्या राज्यात हिंदू धर्माला कुठलाही धोका निर्माण झाला नाही, मग आताच हिंदू धर्माला धोका निर्माण झालाय, असं का म्हटलं जात आहे?

दिग्विजय सिंग यांनी सावरकरांच्या विचारसरणीवर भाष्य केलं. “सावरकर धार्मिक नव्हते. हिंदुत्व या शब्दाचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. गायीला ‘माता’ का म्हटलं जातं, असंही ते म्हणत असत. त्यांना गोमांस खाण्याबद्दलही कुठलाही आक्षेप नव्हता. हिंदूंची ओळख निर्माण करण्यासाठी ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण करण्यात आला, जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल.” असं वक्तव्य त्यांनी केलं.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version