Site icon InMarathi

मुलींची पहिली मासिक पाळी येथे चक्क साजरी केली जाते…

woman periods inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आज भलेही स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असली, तरी तिला एकंदर सामाजिक परिप्रेक्ष्यात तिला दुय्यमच समजलं जातं. पण हे केवळ आपल्या देशातच नाही तर जवजवळ सगळीकडे आहे.

तिला दुय्यम मानायची अनेक कारणे आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे “she bleeds”…

महिलांना मासिक पाळी येते म्हणून त्या कमकुवत असतात त्यांच्यात पुरुषांएवढी ताकद नसते असे काही मूर्ख लोक मानतात.

पण आता त्याला काहीही अर्थ राहिलेला नाही. खरेतर महिला ह्या पुरुषांच्या बाबतीत कुठेही कमी नसतात हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आज आपल्याला जगात बघायला मिळतात.

असो, तर आपला आजचा विषय महिलांना येणाऱ्या मासिक पाळीशी संबंधित आहे. आपल्याकडे महिलांच्या मासिक पाळी बाबत अनेक अंधश्रद्धा आहेत.

 

 

महिला मासिक पाळीत असल्या, की त्यांच्यावर अनेक बंधन देखील लादण्यात येतात. जसेकाही मासिक पाळी येणे हा जणू गुन्हाच.

काहीजण असे देखील आहेत, जे ह्या सर्व चालीरुढींना धाब्यावर बसवत स्त्रीचे स्त्रीत्व मनमोकळे पणाने साजरे करतात.

जेव्हा कुठल्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते, तेव्हा ती एक स्त्री होण्याकडे वाटचाल करत असते आणि ह्यात तिला सर्वात जास्त गरज असते ती आपुलकी आणि काळजीची.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

एका मुलीची स्त्री होण्याची पहिली पायरी असते मासिक पाळी त्यामुळे हा प्रसंग तिच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो आणि तिचा हाच महत्वाचा प्रसंग काही ठिकाणी साजरा केला जातो.

जगात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारतातही काही अश्या चांगल्या प्रथा आहेत. ज्यात मुलींची पहिली मासिक पाळी साजरी केली जाते. आज आपण अशाच काही देशांतील मासिक पाळी संबंधित प्रथांबाबत जाणून घेणार आहोत.

 

१. दक्षिण भारत :

आपल्या भारत देशात भलेही पाळी विषयी अनेक गैरसमज आणि मान्यता असल्या तरी देखील, दक्षिण भारतात ह्यासंबंधी एक चांगली परंपरा बघायला मिळते. ज्यानुसार, जेव्हा मुलीला पहिली पाळी येते तेव्हा तिची पूजा केली जाते.

 

 

दक्षिण भारतात मुलीच्या पहिल्या मासिक पाळीवेळी तिला हळद लावून तिला अंघोळ घालण्यात येते. त्यानंतर तिला पौष्टिक आहार दिला जातो.

नातेवाईकांना बोलावून तिचे औक्षण केले जाते. तिला फळे, भेट वस्तू, गोड-धोड खायला दिले जाते. तिची पहिली पाळी साजरी केली जाते.

२. फिलिपिन्स :

 

 

फिलिपिन्समध्ये जेव्हा कुठल्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते,तेव्हा तिची आई तिची पाळीची पॅण्टी स्वतः धुते आणि त्यानंतर त्या पॅण्टीला मुलीच्या चेहऱ्यावर लावले जाते.

ह्यामागे त्यांची अशी मान्यता आहे की, ह्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर मुरूम येत नाही. तसेच मुलीला तीन पायऱ्यांवरून उडी देखील मारावी लागते. ह्याचा अर्थ असा, की तिला तीन दिवसांची पाळी राहील.

३. आईसलंड :

 

 

आईसलंड येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळीवेळी रेड केक खायला मिळतो. हा केक लाल आणि पांढरा असतो, जो तिची आई बनवते.

 

४. जपान :

 

 

जपान येथे मुलीच्या पहिल्या पाळीवेळी तिची आई ‘Sekihan’ नावाचा एक पारंपारिक पदार्थ बनवते. ह्या पदार्थात तांदूळ आणि बिन्स असतात.

ह्यावेळी संपूर्ण कुटुंब ह्या पदार्थाचा आस्वाद घेतात आणि मुलीची पहिली पाळी साजरी करतात.

 

५. ब्राझील :

 

 

ब्राझीलमध्ये तर ही एक ब्रेकिंग न्यूज असते. नातेवाईकांमध्ये ह्याची घोषणा केली जाते आणि ही बातमी साजरी केली जाते.

 

६. इटली :

 

 

इटली येथे पहिल्या पाळी नंतर मुलीला ‘Signorina’ (miss/young lady) असे म्हणून संबोधले जाते. येथे देखील सर्वांना ही बातमी सांगितली जाते. एवढच नाही तर लोकं मुलीचे अभिनंदन करण्यासाठी देखील येतात.

 

७. दक्षिण अफ्रीका :

 

 

दक्षिण आफ्रिका येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळी वेळी एक ग्रँड पार्टी दिली जाते. त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या जातात.

पाळी दरम्यान त्यांना तीन दिवस घरातून बाहेर जाण्यास मनाई असते, तसेच त्यांना पुरुष आणि लहान मुलांपासून देखील दूर राहण्यास सांगितले जाते.

 

८. इस्त्राईल :

 

 

इस्त्राइल येथे मुलीला पहिल्या पाळीच्या वेळी मध खाऊ घातलं जातं. ह्यामागे अशी मान्यता आहे, की ह्यामुळे तिला तिच्या पुढील मासिक पाळीत त्रास होणार नाही.

 

९. कॅनडा :

 

 

कॅनडा येथे मुलींच्या पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा आहे. येथे पहिली पाळी आल्यावर ती मुलगी एक वर्षांपर्यंत बेरी खाऊ शकत नाही. एका वर्षानंतर तिला जेवढ्या वाटेल तेवढ्या बेरी ती खाऊ शकते.

 

१०. तुर्की :

तुर्की येथे देखील पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा पाळली जाते. येथे मुलीला पहिली पाळी आल्यावर तिच्या कानशिलात लगावली जाते. असे इतरही काही देशात होते.

 

असे करण्यामागे दोन मान्यता आहेत, पहिली म्हणजे त्यांचे गाल नेहमी लाल असावेत आणि दुसरं म्हणजे त्यांना नेहमी त्यांच्या पाळीची लाज वाटावी म्हणून…

 

११. क्रोएशिया :

 

 

येथे मुलीला पहिली पाळी आली की, तिला रेड वाईन प्यायला मिळते. येथे देखील मुलीची पहिली पाळी साजरी केली जाते.

 

१२. मॅसेडोनिया :

मॅसेडोनिया येथे जेव्हा कुठल्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा, तिला ह्या रक्ताचे डाग स्वतःच स्वच्छ करण्यास सांगितले जाते. असं करण्याची तिथे परंपरा आहे.

 

 

मुलीने स्वतःचे रक्त स्वतः स्वच्छ करणे शुभ मानल्या जाते, हे मुलीसाठी गुड लक आणते असे ते मानतात.

१३. घाना :

 

जेव्हा घाना येथील कुठल्या मुलीला पहिली पाळी येते, तेव्हा तिला उकडलेलं एक अख्ख अंड खायला दिलं जाते. जे तिला न चावता गिळाव लागतं. अंडे चावणे म्हणजे आपल्या बाळांना मारणे असे ते मानतात.

मासिक पाळी ही स्त्रियांच्या शरीतात होणाऱ्या बदलांपैकी एक महत्वाची आणि तेवढीच नैसर्गिक क्रिया आहे. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात.

महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे.

मासिक पाळी ही तिच्या स्त्रीत्वाची ओळख आहे, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने तिचे हे स्त्रीत्व सेलिब्रेट नक्की करायला हवं…!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version