पतीचं निधन, कर्जाचा डोंगर या सगळ्यावर मात करून महिलेने लावला डिशवॉशरचा शोध
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
घरी पाहुणे आले किंवा मोठे कुटुंब असेल, तर इतर कामांसोबत आणखी एक काम घरातल्या गृहिणीला करावेच लागते ते म्हणजे भांडी घासणे. या भांडी घासण्याच्या कामाने अनेक किस्से कहाण्यांना जन्माला घातले आहे.
आजकाल घरी येऊन भांडी घासणार्या मावशींमुळे काही प्रमाणात हा प्रॉब्लेम निकालात निघाला असला, तरी माणसाच्या स्वभावाप्रमाणे यातील नाजुक काचेची भांडी किंवा कप बशा, चीनी मातीची भांडी घासताना हातातून निसटून फुटू शकतात. यावरही आता उपाय सापडला आहे.
बाजारात मिळणार्या डिश-वॉशर्सचा. पण तुम्हाला हे वाचून गंमत वाटेल की भांडी घासण्याच्या त्रासाला कंटाळलेल्या एका स्त्रीनेच या डिश-वॉशर्सं चा शोध लावला आहे. कसा ते आपण पाहूया.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोप-अमेरिकेत अनेक गोष्टींचे शोध लावले जात होते. तिथे समाजक्रांती बरोबरच वैज्ञानिक क्रांती ही होवू घातली होती. त्याच दरम्यान आपण लावलेल्या शोधाचे पेटंट घेण्याची जागरुकताही अनेक जण दाखवत होते.
‘स्टीमबोट’ या शोधाचे पेटंट घेणारे जॉन फीच त्यापैकीच एक! त्यांची संशोधक वृत्ती त्यांच्या नातीमध्ये म्हणजे मुलीच्या मुलीमध्ये आली होती. ही मुलगी नाविन्याच्या शोधासाठी सदैव उत्सुक असायची. जॉन गैरीस आणि आयरीन फीच गैरीस यांची ही मुलगी ‘जोसेफिन कोचरन-क्रोकेन’ जीने डिश-वॉशर चा शोध लावला.
जोसेफिन लहान असल्यापासूनच स्वतंत्र बाण्याची आणि विचारांची मुलगी होती. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर ती आपल्या बहीणीकडे राहावयास गेली. तिथे भेटलेल्या विल्यम कोचरान, जो एक व्यापारी आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता होता,त्याच्याशी लग्न केले. तिला दोन मुले झाली.
–
- शेवटी बायकोला होणारा त्रास समजला नवऱ्याला, आणि त्याने लावला हा शोध…
- भारताच्या शोधात निघालेला कोलंबस अमेरिकेत कसा पोहोचला? रंजक कथा
–
मुलगा हॅली कोचरन जो वयाच्या दुसऱ्या वर्षी मरण पावला आणि एक मुलगी कॅथरीन कोचरन. पण त्याआधी १८५० मध्ये जोएल होंटन याने हाताने फिरवायच्या चाकासह असणार्या लाकडी मशीनचे पेटंट घेतले होते. त्यानंतर एल ए आलेक्झांडर याने या मशीन मध्ये बदल करून थोडे वापरला सोपे असे मशीन बनवले.
ही दोन्ही मशीन्स तेवढी प्रभावी नव्हती. तेव्हा या भांडी घासण्याच्या कामणे स्त्रीयांचे होणारे कष्ट पाहून१८८६ मध्ये कोचरन ने घोषणा केली,” जर इतर कोणीही डिश वॉशिंग मशीन शोधणार नसेल तर मी स्वत: ते तयार करेन.” आणि बोलल्याप्रमाणे तिने ते केले.
कोचरनने प्रथम व्यावहारिक डिशवॉशर चा शोध लावला. तिने शेल्बीविले, इलिनॉय येथील तिच्या घरामागील शेडमध्ये पहिले मॉडेल डिझाइन केले. त्याच दरम्यान अति मद्यपानाच्या सवयीमुळे कोचरान हिच्या पतीचा मृत्यू झाला होता. आणि त्याने मागे ठेवलेली काही किरकोळ रक्कम आणि कर्जाचा डोंगर इतकीच संपत्ती जोसेफीनला मिळाली होती. तेव्हा सगळी कर्जे फेडून जगण्यासाठी धडपड करणे गरजेचे होते. एके रात्री झालेल्या मेजवानी नंतर खराब झालेली भांडी नोकर टाकून देत असताना जोसेफीन हिने पाहिले आणि तिला ही डिश-वॉशर ची कल्पना सुचली.
१८९३ च्या जागतिक कोलंबियन प्रदर्शन मेळ्यात तिने अनावरण केलेल्या या डिश-वॉशर चे लोक स्वागत करतील अशी कोचरनची अपेक्षा होती परंतु केवळ हॉटेल्स आणि मोठी रेस्टॉरंट्स तिचे डिश-वॉशर विकत घेत होत्या. १९५० च्या दशकापर्यंत डिशवॉशर्स सामान्य लोकांपर्यंत पोहोचले नव्हते.
तिने फेअरमध्ये “सर्वोत्कृष्ट यांत्रिक बांधकाम, टिकाऊपणा आणि कामाच्या पद्धतीशी जुळवून घेणे” यासाठी सर्वोच्च पारितोषिक जिंकले. कोक्रेनने तिच्या डिशवॉशरचे पहिले मॉडेल शेल्बीव्हिल, इलिनॉय येथील तिच्या घरामागील शेडमध्ये डिझाइन केले.
जॉर्ज बटर्स हा एक मेकॅनिक होता ज्याने तिला डिशवॉशर तयार करण्यास मदत केली; तो पहिल्या डिशवॉशर कारखान्यातील कर्मचारी होता. मशीन तयार करण्यासाठी, तिने प्रथम डिशेस मोजले आणि वायरचे कंपार्टमेंट तयार केले, प्रत्येक विशेषत: प्लेट्स, कप किंवा सॉसर फिट करण्यासाठी डिझाइन केले.
तांब्याच्या बॉयलरच्या आत सपाट असलेल्या चाकाच्या आत कंपार्टमेंट ठेवण्यात आले होते. गरम साबणयुक्त पाणी बॉयलरच्या तळापासून वर आले आणि भांड्यांवर पाऊस पडत असताना एका मोटरने चाक फिरवले. तिचा डिशवॉशर मशिनमधील भांडी स्वच्छ करण्यासाठी स्क्रबर्सऐवजी पाण्याचा दाब वापरणारा पहिला डिश-वॉशर होता. तिला २८ डिसेंबर १८८६ रोजी पेटंट मिळाले.
तिच्या मैत्रिणींना तिचा हा शोध आवडला आणि तिने त्यांच्यासाठी डिशवॉशिंग मशीन्स बनवल्या. त्यांना ‘क्रोकेन डिशवॉशर्स’ असे नाव दिले. या मशीन्स विकून तिने पैसे कमावले. त्यानंतर ‘गैरीस-क्रोकेन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची’ स्थापना केली. खूप कमी कालावधीत गॅरिस-कोक्रॅन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किचन एडचा भाग बनली आणि १९४९ मध्ये, कोचरनच्या डिझाइनवर आधारित पहिले किचनएड डिशवॉशर सादर केले गेले. १९५० च्या दशकात अतिरिक्त गरम पाण्याची सुविधा देण्यात येवू लागल्यानंतर अनेक घरांमध्ये डिशवॉशर ही एक सामान्य घरगुती वस्तु बनली.
तर मित्रांनो ही होती डिशवॉशर आणि ते बनवणार्या जोसेफीन कोचरान हिची कहाणी.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.