' फक्त ‘टीप टीप बरसा पानी’ नव्हे तर या ६ गाण्यांचं रिमेक करून बॉलिवूडने त्यांची माती केली! – InMarathi

फक्त ‘टीप टीप बरसा पानी’ नव्हे तर या ६ गाण्यांचं रिमेक करून बॉलिवूडने त्यांची माती केली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या बॉलिवूडमध्ये चांगल्या कथेचा किंवा लेखकांचा जितका तुटवडा आह तितकाच संगीत क्षेत्रातसुद्धा जाणवतो. एक काळ असा होता जेव्हा गाण्यांमुळे चित्रपटाची कमाई व्हायची.

ठराविक गाणं बघायला लोकं शे दोनशेचं तिकीट काढून चित्रपट बघायचे, भले सिनेमा कितीही टुकार असो पण त्यातली गाणी आणि त्यांचं चित्रीकरण यासाठी लोकं ते टुकार चित्रपटसुद्धा हसत हसत सहन करायचे!

 

bollywood music inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतीय सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजेच त्यातलं संगीत हे आहे, जगातसुद्धा आपल्या भारतीय चित्रपट संगीताला एक मानाचं आणि वेगळं स्थान आहे. पण याच चित्रपट संगीत क्षेत्रात एवढी पोकळी निर्माण झालेली आहे की सध्याची गाणी एकदाही ऐकायच्या लायकीची नसतात.

ए आर रेहमान, शंकर एहसान लॉय, अमित त्रिवेदि असे काही गुणी कलाकार सोडले तर इतर सगळ्या लोकांची गाणी ही लोकांच्या आठवणीतसुद्धा नसतात, एकेकाळचे हिंदी चित्रपट संगीत म्हणजे दिग्गज गायक गायिका, संगीतकार, गीतकार यांचा मेळावा होता. पण आता त्या ताकदीचे कलाकार शोधूनसुद्धा सापडणार नाही.

यातच भर घातली आहे ती वेगवेगळ्या रिमेक आणि रीमिक्स गाण्यांनी. जुन्या सुपरहीट गाण्याला थोडं आजच्या काळात आणून नवीन गायकांकडून गाऊन घ्यायचं आणि एक आयटम नंबर म्हणून ते सादर करायचं, बास सध्याचं चित्रपट संगीत याच चौकटीत अडकलं आहे.

काही महारथी तर एवढी मेहनतसुद्धा घेत नाही, ओरिजनल गाण्यातच थोडा ठेका किंवा चाल स्लो करून तसंच्या तसं गाणं चित्रपटात सादर करतात जसं नुकत्याच रिलीज झालेल्या ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्याच्या बाबतीत घडलं आहे.

 

tip tip barsa pani inmarathi

 

९० च्या दशकात्या तरूणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची झोप उडवणाऱ्या या गाण्यातून रविनाने तिच्या मादक अदांनी कित्येकांना घायाळ केलं होतं.

जशी एक जनरेशन इम्रान हाशमीचं भिगे होंट तेरे बघत रातोरात तरुण झाली, तसंच ९० ची जनरेशन रविनाचं हे गाणं बघत मोठी झाली, आणि याच गाण्याला पुन्हा चाकचूक करून अक्षय कुमारने त्याच्याच सिनेमात वापरुन त्यावर रविनाऐवजी कतरिनाला नाचवून काय मिळवलं हे त्यालाच ठाऊक.

बॉलिवूडची ही काही पहिली वेळ नाही, याआधीही अशा काही जुन्या गाण्यांचे रिमेक किंवा रीमिक्स करून त्यांची माती करण्याचं पातक बॉलिवूडच्या हातून घडलेलं आहे, आजच्या लेखात आपण अशाच काही फसलेल्या रिमेक गाण्यांबद्दल जाणून घेणार आहोत!

१. तू चीज बडी है मस्त मस्त :

 

tu cheez badi hai mast mast inmarathi

 

मोहरा चित्रपटातल्या या गाण्यातसुद्धा अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्यातली सॉलिड केमिस्ट्रि आपल्याला बघायला मिळाली होती. सिनेमामधून अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या दोघांना अॅक्शन करताना बघायला मिळालं.

यातल्या या गाण्याचा रिमेक करण्याचा अट्टहास मशीन या सिनेमात केला गेला, हे गाणं म्हणजे आजवरचं सर्वात जास्त फसलेलं रिमेक म्हणून ओळखलं जातं, सध्या तरुणांची लाडकी बनलेली कियारा अडवाणी ही या गाण्यात होती तरी हे गाणं तरलं नाही!

२. एक दो तीन :

 

ek do teen inmarathi

 

ज्या गाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीला धक-धक गर्ल माधुरी दीक्षित मिळाली, शिवाय ज्या गाण्याने माधुरीला खरी ओळख मिळवून दिली अशा तेजाब सिनेमातल्या ‘एक दो तीन’ या गाण्याचा रिमेक करायचासुद्धा मोह बॉलिवूडला आवरता आला नाही.

टायगर श्रॉफच्या बागी सिनेमात आयटम नंबर म्हणून या गाण्याचं रिमेक करण्यात आलं ज्यावर जॅकलीन फर्नांडिस थीरकली. तिच्या परीने तिने चांगलंच काम केलं, पण लोकांच्या मनात घर करून बसलेल्या माधुरीची जागा जॅकलीनला घेता आली नाही.

३. ओये ओये :

 

oye oye inmarathi

 

ज्या गाण्यावर खुद्द नसीरुद्दीन शाहसारख्या समांतर सिनेमा करणाऱ्या अभिनेत्यालासुद्धा आपण थिरकताना पाहिलं, शिवाय माधुरी आणि संगीता बिजलानी यांनी ज्या गाण्याला चार चाँद लावले अशा त्रिदेव सिनेमातल्या ओये ओये या गाण्यालासुद्धा बॉलिवूडने सोडलेलं नाही.

अझरुद्दीनच्या बायोपिकमध्ये या गाण्याचं रिमेक करून प्रमोशनसाठी ते वापरण्यात आलं. मुळात या बायोपिकवर लोकांनी चांगलीच टीका केली, पण या गाण्याच्या रिमेकने तर आणखीनच त्यात भर घातली.

४. हम्मा हम्मा :

 

humma humma inmarathi

 

रोजासारख्या सिनेमातून भारतीय संगीतविश्वात क्रांति घडवणाऱ्या ए.आर.रेहमानच्या बॉम्बे या अल्बममधल्या या गाण्याने लोकांवर चांगलंच गारुड केलं आणि रहमानच्या वेगळ्या संगीताने रासिकांना मंत्रमुग्ध केलं होतं.

आपल्या याच गाण्याचं रिमेक करण्याचं रेहमानने का ठरवलं असेल, याचं उत्तर अजूनही मिळलेलं नाही. ओके जानु या हिंदी सिनेमात हम्मा हम्मा हे गाणं वेगळ्या ढंगात रॅपसोबत सादर करण्यात आलं.

श्रद्धा कपूर आणि आदित्य कपूरची केमिस्ट्रि जरी लोकांना आवडली असली तरी प्रेक्षकांनी रेहमानच्या जुन्याच गाण्याला पसंती दर्शवली.

५. ओ साकी साकी :

 

o saki saki inmarathi

 

अनिल कपूर, संजय दत्त यांच्या मुसाफीर या सिनेमाला जेवढी पसंती मिळाली नाही त्यापेक्षा जास्त पसंती त्यातल्या गाण्यांना मिळाली. याच सिनेमातलं संजय दत्त आणि कोयना मित्रावर चित्रित झालेल्या ‘ओ साकी’ या गाण्याचं सुद्धा रिमेक करण्यात आलं.

बाटला हाऊस या सिनेमात हे गाणं आयटम नंबर म्हणून वापरलं गेलं. नोरा फतेही हीच्या मादक अदा आणि सेक्सी लुक सोडला तर कुणालाच हे गाणं आवडलं नाही!

६. दम मारो दम :

 

dum maaro dum inmarathi

 

देव आनंदच्या हरे रामा हरे कृष्णा सिनेमातल्या हे गाणं त्या काळातलं सर्वात वादग्रस्त ठरलं होतं. पंचमदा यांचं संगीत आणि एकंदरच त्या सिनेमाची कथा हे सगळं जुळून आलं होतं, आशाताईंच्या आवाजाने या गाण्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं.

याच गाण्याच्या नावावर आलेल्या सिनेमात या गाण्याचं रिमेक केलं गेलं. दम मारो दम हा चित्रपट म्हणून बऱ्यापैकी यशस्वी झाला असला तरी या गाण्याला लोकांनी ठेंगाच दाखवला.

दीपिका पदूकोणच्या सेक्सी लुकने या गाण्यात थोडी जान आणायचा प्रयत्न केला पण तरी त्याचा काहीच फायदा झाला नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?