Site icon InMarathi

फाळणीचा काळ, जातीय दंगे.. हर हर महादेवच्या घोषणा.. पुलंच्या पत्नीचा थरारक अनुभव

partition inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पुलं हे नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात वसणारं.. घरातल्या प्रत्येकाला हसवणारं. प्रेक्षकांना आपल्या ओघवत्या शैलीने मनमुराद हसवणं, त्यांना दुःख विसरायला भाग पाडणं यात पुलंची हातोटी होती.

 

काहींनी पुलंना प्रत्यक्ष पाहिलंय, अनुभवलंय, सध्याच्या तरुणाईला ती संधी मिळाली नसली तरी पुलंच्या प्रत्येक शब्दांतून, विनोदातून पुलं आपल्याला वारंवार भेटतात. हसवतात, संकटांवर मात करून जिद्दीने पुढे जाण्याची हिंमत देतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पुलंनी नाटकांसाठी, विविध कार्यक्रमांसाठी देशभर खूप दौरे केले, यामध्ये त्यांची पत्नी सुनीताबाई यांनीदेखील त्यांना खूप साथ दिली. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यादेखील भाईंसोबत अनेक ठिकाणी जात असतं.

सेहेचाळीस सालच्या ऑक्टोबर महिन्यातली ही गोष्ट आहे. दिल्लीच्या जामिया मिल्लिया इस्लामिया या संस्थेचं रौप्यमहोत्सवी वर्ष होतं. त्यानिमित्त प्रथम दिल्लीजवळ ओखल्याला आणि मग मीरतला काँग्रेसचे सेशन होणार होते.

सुनीताबाई आणि पुलं दोघेही या कार्यक्रमासाठी जाणार होते आणि येताना उत्तर भारतातील काही प्रसिद्ध स्थळे बघण्याचा त्यांचा विचार होता, पण सुट्टी न मिळाल्याने भाईंचा बेत रद्द झाला आणि सुनीताबाई एकट्याच कार्यक्रमासाठी गेल्या.

प्रो, आगा अश्रफ यांच्या घरी सुनीताबाईंच्या उतरण्याची व्यवस्था केली होती. पहिल्या दिवशी डोळ्यांचे पारणे फिटेल असा सुंदर समारंभ पार पडला. वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू असे अनेक राजकीय पुढारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रत्येकाची भाषणं झाली. सुनीताबाई भय्या म्हणजे मीर असगर अली यांच्यासोबत गेल्या होत्या. रात्री जेवणानंतर काही वेळ गप्पा मारून सगळे झोपायला गेले.

मध्यरात्री प्रचंड आरडाओरड ऐकू आली, घरातील सगळेजण दचकून जागे झाले. हा फाळणीपूर्व काळ होता, ठिकठिकाणी जातीय दंगले उसळत होते. त्या रात्री ओखल्याच्या शेजारील गावातून हिंदूंचा मोठा जमाव हातात पलिते घेऊन मुसलमानांचे जामिया मिल्लिया इस्लामिया हे विद्यापीठ जाळायला येत होता.

 

 

 

सुनीताबाई भेदरून गेल्या होत्या, आतून थरथरत होत्या. आजूबाजूने ‘हर हर महादेव’च्या घोषणा ऐकू येत होत्या. प्रो. अश्रफ त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले, की ‘ घाबरू नकोस, ते लोक फार दूर आहेत, इथे पोलिसांची गस्तदेखील आहे, काहीही होणार नाही.’

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version