' डिंपलने सांगितलंय तिच्या सुंदर, घनदाट, चमकदार केसांचे रहस्य… – InMarathi

डिंपलने सांगितलंय तिच्या सुंदर, घनदाट, चमकदार केसांचे रहस्य…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हल्ली सगळ्या मुलींना भेडसावरणारी समस्या म्हणजे केसगळती. आजकाल कोणत्याही तरुण मुलीला केसांबद्दल विचारलंत, तर ती एकच गोष्ट सांगेल, ‘हल्ली केस एवढे गळतायत,की टक्कल व्हायची वेळ आलीये’

केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे या समस्या आजकाल अगदी कॉमन झाल्या आहेत. फक्त मुलींना नाही, तर मुलांना देखील या समस्या भेडसावत आहेत. केसगळती थांबवण्यासाठी मग अनेक उपाय केले जातात. औषधं, शॅम्पू यावर खर्च केला जातो, मात्र केसगळती काही थांबत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आताच एवढे केस गळतात, तर काही वर्षांनी काय होईल? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच, पण काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक खास उपाय. डिंपल कपाडिया सांगतेय तिच्या लांब केसांचं रहस्य… काय आहे हा सिक्रेट फॉर्म्युला? लगेच वाचा.

 

dimpal kapadiya inmarathi

 

वयाच्या ६४व्या वर्षीदेखील डिंपलचे केस सुंदर, चमकदार आणि लांबसडक आहेत. नुकतंच तिने या केसांमागचं सिक्रेट सांगितलंय.

वॉग मॅगझीनशी बोलताना डिंपल म्हणाली, की ‘माझे केस लहानपणापासूनच लांब होते. वयाच्या १३ व्या वर्षीच मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. त्यामुळे केसांवर प्रयोग करायला कधी वेळच नाही मिळाला. मध्ये एक- दोन वेळा मी केस कापले होते, पण मला ते कधीच आवडले नाहीत.

एकदा मी माझे लांब केस कापले होते, पण तो लूक अगदीच वाईट दिसत होता. ‘जांबाज’ या चित्रपटात माझा तोच लूक आहे. ४०व्य वर्षी मी पुन्हा एकदा छोटे केस कापण्याचा निर्णय घेतला, न्यूयॉर्कच्या एका फॅन्सी सॅलोनमध्ये जाऊन मी हौसेने केस कापून घेतले, पण नंतर मी अगदी बकरीसारखी दिसत होते.

माझ्या केसांचं स्वतःचं वेगळंच म्हणणं असतं. मी त्यांच्यावर काहीही प्रयोग केले, तर त्यांना आवडत नाही.’ असं डिंपल म्हणाली.

 

dimpal kapadiya inmarathi1

 

हल्ली केस ‘ऑईली’ दिसतात, म्हणून मुलं- मुली तेल लावत नाहीत, पण डिंपल म्हणाली, की ‘लहानपणी मी शाळेत जाताना केसांना तेल लावून, वेण्या बांधून जात असे. लहानपणापासूनच मला केसांना तेल लावण्याची सवय होती. माझे केस खूप जाड, घनदाट आणि कोरडे आहेत, म्हणूनच तेलाचा मला खूप फायदा होतो.

‘मी लंडनमध्ये होते आणि अचानक ‘सागर’च्या शूटिंगसाठी मला मुंबईत यावं लागलं. उष्णतेमुळे माझे केस अगदीच विचित्र दिसत होते. बियर एक उत्तम कंडिशनर आहे. त्यामुळे मी केसांना बियर लावली होती.

‘तेरा नाम लिया’ या गाण्यातही मी केसांना कंडिशनिंगसाठी बियरच लावली होती. हे गाणं तर सुपरहिट झालंच, पण माझ्या केसांची पण खूप चर्चा झाली.

 

dimpal kapadiya inmarathi2

 

 

डिंपलच्या केसांची चर्चा अजूनही आहेच. योग्य वेळी तेल लावणं हेच तिच्या घनदाट केसांचं रहस्य असू शकतं. तुमचाही असा काही सिक्रेट फॉर्म्युला आहे का? आम्हाला लगेच कमेंट करून सांगा.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?