बाहुबली मधील प्रत्येक पात्राच्या कपाळी असणाऱ्या ह्या गंधाचा अर्थ जाणून घ्या!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
बाहुबली चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग तर उत्तम होताच, पण दुसरा भाग देखील अगदी जबरदस्त निघाला. बाहुबली या नावाने अशी काही जादू करून ठेवलीये की त्याची क्रेझ अजूनही काही केल्या उतरत नाहीये. तुमच्यापैकी देखील बऱ्याच जणांनी चित्रपटाचे दोन्ही भाग डब्बल किंवा टीब्बल वेळा पाहिले असतील. तर अश्या या सर्व बाहुबली चाहत्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे, तुम्ही बाहुबलीच्या दोन्ही पार्टस मध्ये एक गोष्ट नोटीस केली का हो? तुम्हाला प्रत्येक मुख्य पात्राच्या कपाळावर एक ‘गंध’ दिसला का? दिसला होता? मग त्याचा अर्थ माहिती आहे की नाही? नाही माहित म्हणता? टेन्शन कशाला घेता आम्ही सांगतो तुम्हाला या गंधा मागचा अर्थ!
या प्रत्येक गंधामागे लपलंय त्या त्या पात्राचं खरं व्यक्तित्व!
महेंद्र बाहुबलीच्या कपाळावरील गंध पहा
लेखकाने बाहुबली हे पात्र मुळातच भगवान शंकरांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले आहे आणि पुढे दिग्दर्शकाने देखील त्याला तसेच प्रेक्षकांपुढे सादर केले. महेंद्र बाहुबलीच्या कपाळावर असणाऱ्या गंधामध्ये शिवलिंगाचे स्वरूप दिसते. जे त्याच्यावर असणाऱ्या भगवान शंकराच्या आशीर्वादाचे प्रतिक आहे. त्याने पहिल्या भागात उचलेले शिवलिंग आठवते का? ते याचं भगवान शंकरांच्या त्याच्यावर असणाऱ्या वरदहस्तामुळे!
अवंतिकाच्या कपाळावरील गंध पहा
अवंतिकाच्या कपाळावर बाणांच्या दोन टोकांची आकृती आहे. जी अवंतिका कडे असणारे धैर्य आणि सावधानता दर्शवते. देवसेनेच्या सुटकेसाठी सैनिकांसोबत लढाईला उतरण्याची तिची निडर वृत्ती हा गंध दर्शवतो.
शिवगामीच्या कपाळावरचा हा गंध पहा
शिवगामीच्या कपाळावरचा हा गंध लाल असून त्यावर सोनेरी चमक आहे. हा गंध शिवगामीचे अभिमान आणि भावनांनी भरलेले पात्र दर्शवतो, जसं की एखादा ज्वालामुखी, जो अभिमानाने उचंबळून फुटू शकतो किंवा भावनेच्या भरात फुटून वाहू शकतो. एक अहंकारी पण शूर स्त्री असा तिचा स्वभाव आहे. तिचा गंध तिचा हाच रागीट आणि प्रेम मिश्रित स्वभाव दर्शवतो.
अमरेंद्र बाहुबलीच्या कपाळावरील गंध पहा
अमरेंद्र बाहुबलीच्या कपाळावर असणारा अर्धचंद्राकृती गंध शांती, ऐक्य आणि दयाळूपाणाचे प्रतिक आहे आणि याचं गोष्टींसाठी पदोपदी अमरेंद्र बाहुबलीच्या पात्रामध्ये दिसून येतात.
देवसेनेच्या कपाळावरील गंध पहा
देवसेनेच्या कपाळावरील गंध नीट पाहिल्यावर लक्षात येते की तो एक उलटा बाण आहे. हा गंध स्त्री-पुरुष समानता दर्शवतो, देवसेना केवळ अमरेंद्र बाहुबलीची पत्नी नव्हतीच, तर उत्तम योद्धा देखील होती पतीसोबत प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती यातून प्रतीत होते.
बिज्ज्ल देवाच्या कपाळावरील गंध पहा
बिज्ज्ल देवाच्या कपाळावरील हा गंध म्हणजे त्रिशूळाची आकृती आहे. या त्रिशूळाची तीन टोके म्हणजे निर्मिती, सांभाळ आणि विनाश यांचे प्रतिक आहेत, जी बिज्ज्ल देवाच्या पात्राला अगदी चपलख शोभतात.
भल्लालदेवाच्या कपाळावरील गंध पहा
भल्लालदेवाच्या कपाळावर उगवत्या सूर्याची प्रतिमा आहे जी त्याच्या महत्त्वकांक्षी स्वभावाशी अगदी मिळतीजुळती आहे. तसेच महिष्मती साम्राज्याचे चिन्ह देखील उगवत्या सुर्याचेच आहे आणि हेच चिन्ह भल्लालदेवाच्या कपाळावर असणे हे दर्शवते की महिष्मती साम्राज्याचा सम्राट होणेच त्याचे अंतिम ध्येय आहे.
कटप्पाच्या कपाळावरील गंध पहा
कटप्पाच्या कपाळावरील गंध हा त्याच्या गुलामगिरीचे प्रतिक आहे. महिष्मती साम्राज्याशी तो बांधील आहे. त्यांच्या आज्ञेनुसार नुसार सांगितलेले कोणतेही काम प्रश्न न विचारता करणे त्याने अपेक्षित आहे.
आता कळला ना या प्रत्येक गंधामागचा अर्थ, अहो मग शेअर करा आणि इतरांनाही सांगा की!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.