आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राजकीय मंडळी आणि बॉलीवूड कलाकारांची मैत्री ही आपण सर्वांनीच बघितली आहे. बॉलीवूड निर्माते सुद्धा आपल्या फायद्यासाठी राजकीय व्यक्तींच्या संपर्कात राहण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. आज ओटीटी सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने बॉलीवूड निर्मात्यांना आपला सिनेमा रिलीज होऊ देण्यासाठी राजकारणी लोकांची तितकी मनधरणी करावी लागत नाही.
एक काळ होता जेव्हा कोणत्याही वादग्रस्त विषयावर सिनेमा तयार करतांना निर्मात्यांना अदृश्य राजकीय प्रमाणपत्राची सुद्धा गरज पडायची आणि यातूनच काही मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हायचे.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
‘राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन’ यांची मैत्री मात्र अपवाद होती. कोणत्याही हेतूसाठी न झालेली ही एक निखळ मैत्री होती. गांधी परिवार आणि बच्चन परिवार हे दोन्ही अलाहाबादचे आहेत.
अमिताभ हे ४ वर्षाचे असतांना त्यांची त्यावेळी २ वर्षाचे असलेल्या राजीव गांधी यांच्यासोबत पहिल्यांदा भेट झाली होती असं बिग बी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
आपल्या मुलाखतीत बिग बी यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की, “राजीव गांधी यांना सुद्धा एका निर्मात्याने आपल्या सिनेमात काम करण्याची ‘ऑफर’ दिली होती.” कोण होता हा निर्माता ? हा प्रसंग कसा घडला होता ? जाणून घेऊयात.
१९७० च्या दशकात अमिताभ हे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी अलहाबादहून मुंबईला आले होते. राजीव गांधी यांनी त्यावेळी आपल्या मित्राची शक्य तितकी मदत केली होती. अमिताभ हे त्यावेळी प्रस्थापित अभिनेता ‘अन्वर’ आणि निर्माता ‘मेहमूद’ यांच्यासोबत एका फ्लॅटमध्ये ‘शेअरिंग’ करून रहायचे. अन्वर आणि मेहमूद हे एकमेकांचे भाऊ होते.
मेहमूद, अन्वर आणि अमिताभ यांची तेव्हा खुप घट्ट मैत्री झाली होती. पण, अमिताभ यांची अशी बिकट आर्थिक परिस्थिती असायची की, त्यांना फ्लॅटचं भाडं सुद्धा देणं शक्य व्हायचं नाही. राजीव गांधी हे त्यावेळी अमिताभ यांना भेटायला मुंबईला यायचे आणि अमिताभ यांना आर्थिक मदत करायचे आणि त्यांना धीर द्यायचे.
राजीव गांधी परदेशात शिकण्यासाठी गेलेले असतांना सुद्धा ते अमिताभ यांना तिथून पत्र लिहायचे आणि अमिताभ त्या पत्रांना न चुकता उत्तरही पाठवायचे. इंग्लंडहून येतांना एकदा राजीव गांधी यांनी अमिताभ यांच्यासाठी एक जीन्स पॅन्ट घेऊन आल्याचं सुद्धा सांगितलं जातं.
राजीव गांधी यांच्या एका मुंबई भेटीत अमिताभ त्यांना आपल्या फ्लॅटवर घेऊन गेले होते. अन्वर आणि मेहमूद हे तेव्हा मेहमूद निर्माता असलेल्या एका सिनेमाच्या कथेबद्दल चर्चा करत होते. अचानक आलेल्या अमिताभ आणि राजीव गांधी यांना बघून मेहमूद आपल्या जागेवरून ताडकन उठले.
आपल्या सिनेमासाठी ते राजीव गांधी यांच्यासारखा एक चेहरा हवा होता. अमिताभ यांच्यासोबत आलेले राजीव गांधी हे महेमुद यांना अजून एक मुंबईत संघर्ष करणारे कलाकार वाटले.
महेमुद यांनी राजीव गांधी यांना बघून आपल्या खिशातील ५ हजार रुपये त्यांच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, ” माझ्या पुढच्या सिनेमात काम करणार का ?” राजीव गांधी यांना बघून ते एक आंतरराष्ट्रीय कलाकार होऊ शकतील असाही अंदाज महेमुद यांनी बोलतांना व्यक्त केला.
अमिताभ हे राजीव गांधी यांची ‘तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा’ अशी ओळख करून देईपर्यंत महेमुद यांनी त्यांना सिनेमाची ऑफरही देऊन टाकली होती. हा सर्व प्रसंग बघून अमिताभ, राजीव गांधी यांना हसू अनावर झाले होते.
अन्वर आणि महेमुद यांना राजीव गांधी यांनी आपली खरी ओळख करून दिली आणि त्यांना दिलेली रक्कम परत केली. मेहमूद यांनी अमिताभ यांचं काहीच न ऐकून घेता केलेल्या या कृत्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. महेमुद यांनी हे सर्व वाक्य दारूच्या नशेत बोलल्याचं नंतर कबूल केलं होतं. राजीव गांधी यांनी सुद्धा या प्रसंगाचा आनंद घेऊन महेमुद आणि अन्वर यांचा मित्र होणे पसंत केलं होतं.
अमिताभ बच्चन यांनी ‘सुपरस्टार’ झाल्यावर राजीव गांधी यांचा अलाहाबादमध्ये प्रचार करून आपल्या मित्राच्या मदतीची परतफेड करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. राजीव गांधी ती निवडणूक जिंकले होते.
–
- या मंदिरात आजही गांधी परिवारापैकी कोणालाच प्रवेश मिळत नाही…!
- राजीव-सोनिया गांधी, अमिताभ-जया बच्चन जेव्हा INS विराटवरून सहलीस जातात…
–
राजीव गांधी यांच्या आग्रहानेच अमिताभ बच्चन यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. पण, बोफोर्स प्रकरण झालं आणि अमिताभ यांनी राजकारणापासून स्वतःला चार हात लांब केले.
राजीव गांधी यांच्या आकस्मिक मृत्यूने अमिताभ बच्चन यांना अतीव दुःख झालं होतं ज्याबद्दल त्यांनी कित्येक वेळेस बोलून दाखवलं होतं. या घटनेनंतर मात्र बच्चन परिवार आणि गांधी परिवार यांच्यातील मैत्रीसंबंध तितके घनिष्ठ राहिले नाहीत.
राजीव गांधी यांच्या अशाच कित्येक सुंदर आठवणी अमिताभ बच्चन यांनी आपल्या मनात जतन करून ठेवल्या आहेत. “मैत्रीला कोणतंही बंधन नसतं” हे या दोघांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून आपण नक्कीच म्हणू शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.