' पुलं ‘अपूर्वाई’ लिहीत असताना आला भूकंप आणि पुढे घडलेला किस्सा झाला चेष्टेचा विषय – InMarathi

पुलं ‘अपूर्वाई’ लिहीत असताना आला भूकंप आणि पुढे घडलेला किस्सा झाला चेष्टेचा विषय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, म्हणजे आपले लाडके पुलं हे महाराष्ट्राचं दैवत. पुलंनी मराठी मनावर राज्य केलं, दुःखात हसणाऱ्यांना खळखळून हसवलं, क्षणभर लोकांना त्यांचे व्याप, ताण विसरायला भाग पाडलं. आपल्या विशेष शैलीत लोकांना भावुक सुद्धा केला.

तब्बल सहा दशक या प्रतिभावान कलावंताने मराठी मनाला रिझवलं, आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पुलं कायमचे वसले आहेत.

 

pula deshpande inmarathi
pula deshpande inmarathi

 

८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत पुलंचा जन्म झाला. ‘हा मुलगा मोठं नाव आणि कीर्ती मिळवणार’ असं भविष्य तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं, जे पुढे खरंही ठरलं.

नाटकाचे दौरे, पुस्तक प्रकाशन, साहित्य मेळावे यासाठी पुलं भारतात आणि भारताबाहेरही फिरले. या प्रत्येक प्रवासाचे अनेक किस्से आहेत. साठ साली पुलं कामानिमित्त दिल्लीला होते. ‘अपूर्वाई’चं लेखन तेव्हा चालू होतं.

यादरम्यान एक किस्सा घडला, आणि तो किस्सा पुढची अनेक वर्ष चेष्टेचा विषय बनला होता. हा किस्सा सुनीताबाईंनी त्यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात लिहिला आहे. काय होता हा किस्सा?

साठ सालची गोष्ट आहे, पुलं दिल्लीत होते. ऑफिसमधून घरी येऊन ते ‘अपूर्वाई’ या प्रवासवर्णनाचा पुढचा भाग लिहीत होते. सुनीताबाईदेखील एका प्रेसकॉपीच्या कामात होत्या.

 

pula inmarathi

 

अचानक गडगडाट सुरु झाला, चित्रविचित्र आवाज आले. अचानक सगळं थरथरायला लागलं. भूकंप आला होता. सुनीताबाई आणि पुलं दोघंही एकमेकांकडे पाहून ‘धरणीकंप’ असं म्हणत लगेचच जागेवरून उठले.

भूकंप झाला, की इमारती कोसळण्याची शक्यता असते, त्यात पुलं वरच्या मजल्यावर राहत होते. शक्य तितक्या लवकर इमारत सोडून मोकळ्या ठिकाणी जाणे गरजेचं होतं. त्यामुळे घराजवळच मैदान असल्याने पुलं धावत धावत मैदानात पोहोचले.

पुलंकडे तेव्हा एक मुलगा कामाला होता, भूकंपामुळे तोही घाबरून रडायला लागला. त्यालाही पुलं खाली घेऊन गेले. आजूबाजूची सगळी मंडळी धावत मैदानात गोळा झाली, पण सुनीताबाई मात्र वरच होत्या.

त्यांनी आधी घरातील दिवे आणि पंखा बंद केला. टेबलावरचे कागद उडू नयेत, म्हणून त्यावर पेपरवेट ठेवले. पुलंनी घाईघाईत पेन उघडेच ठेवले होते, ते त्यांनी बंद करून खणात ठेवले.

घराला कुललुप लावून त्या खाली उतरल्या, पण त्या खाली पोहोचेपर्यंत भूकंप थांबला होता. त्यांचं हे वागणं पुढची अनेक वर्ष मित्रांमध्ये चेष्टेचा विषय होता.

‘मृत्यूचा विचार म्हटला, की हा प्रसंग न चुकता डोळ्यांपुढे जसाच्या तसं लख्ख उभा राहतो’ असं सुनीताबाईंनी ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात म्हटले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?