Site icon InMarathi

जेव्हा कमल हसन म्हणाले…”नथुराम गोडसे हाच स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू अतिरेकी!”

kamal haasan featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदी चित्रपटसृष्टी मधली खूप कमी लोकं आहेत जी राजकारणात सक्रिय सहभाग घेतात, पण दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीत मात्र अगदी उलट चित्र आपल्याला बघायला मिळतं. फक्त अभिनेतेच नव्हे तर कित्येक अभिनेत्रीसुद्धा तिथल्या राजकारणात मनापासून भाग घेतात.

त्यांची विचारसरणी बहुसंख्य लोकांना पटणारी नसली तरी ते स्वतःची मतं ठामपणे मांडतात, काही अभिनेते सोयीस्कररित्या राजकीय बाजू बदलतात खरे पण राजकारणातली त्यांची रुची आणि समाजकारणाप्रती त्यांची तळमळ खरीच कौतुकास्पद आहे.

 

 

बॉलिवूडमध्ये असं कोणत्या अभिनेत्याने केलं तर त्याला अमूक अमुक पार्टीचा प्रवक्ता म्हणून टॅग लागतो आणि मग त्याची विचारसणी एका विशिष्ट पक्षाशी कशी सुसंगत आहे हे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतो, त्यामुळे काही हातावर मोजण्याइतपत लोकं सोडली तर सगळेच बॉलिवूडकर नेहमीच पोलिटिक स्टँड घ्यायला घाबरतात.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधले बरेचसे अभिनेते मात्र याउलट वागतात. जयललिता, एम. जी. रामचंद्रन, चिरंजीवी रजनीकांत, प्रकाश राज पासून विजयसारख्या कित्येक सुपरस्टारनी राजकारणात मोलाचं योगदान दिलं आहे. यांची काही वक्तव्यं, पॉलिटिकल स्टँड लोकांना खटकत असले तरी आपलं मत परखडपणे ते सतत मांडत असतात.

यापैकी एक खूप मोठं आणि सतत चर्चेत असणारं नाव म्हणजे कमल हसन. साऊथच नव्हे तर साऱ्या जगावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे कमल हसन हे असं व्यक्तिमत्व आहे जे प्रत्येकाला ठाऊक आहे.

कमल हसन हे साऊथ इंडस्ट्रीमधले मोठे स्टार जरी असले तरी हिंदी चित्रपटसृष्टीतसुद्धा त्यांचं तितकंच मोलाचं योगदान आहे. कमल हसन हे एक सुपरस्टार म्हणून ओळखले जातातच पण त्याहीपलीकडे ते एक राजकारणातलं सक्रिय व्यक्तिमत्वसुद्धा आहे.

 

२०१८ साली कमल यांनी Makkal Needhi Maiam (MNM) नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. नुकत्याच झालेल्या २०२१ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये कमल यांच्या पक्षाला चांगलीच हार पत्करावी लागली.

२०१९ च्या निवडणुकांमध्येसुद्धा त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. याच निवडणुकीदरम्यान कमल हसन यांनी केलेल्या एका स्टेटमेंटमुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होती.

२०१९ मध्ये अरवाकुरूची या ठिकाणी कमल हसन आपल्या उमेद्वाराचा प्रचार करण्यासाठी गेलेले असताना कमल यांनी नथुराम गोडसेबाबत एक वादग्रस्त विधान केलं ज्यामुळे त्यांची खूप आलोचना झाली.

कमल म्हणाले की “इथे बरेच मुस्लिम एकत्र जमा झाले आहेत म्हणून मी हे बोलत नाहीये, मी ही गोष्ट महात्मा गांधी यांच्या शिल्पासमोर सांगितली आहे की स्वातंत्र्य भारताचा पहिला अतिरेकी (Extremist) हा हिंदू होता, आणि त्याचं नाव होतं नथुराम विनायक गोडसे!”

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कमल हसन यांच्या या वक्तव्यावर तेव्हा बरंच वादळ उठलं होतं. बऱ्याच स्तरातून यावर टीका व्हायला सुरुवात झाली. विवेक ओबेरॉयनेसुद्धा यावर ट्विट करत यामागे मुस्लिम लोकांची वोटबँक हेच कारण आहे का अशी विचारणा कमल हसन यांच्याकडे केली.

तामिळनाडूमधील भाजपाच्या नेत्यांनी कमल हसनच्या विरोधात पोलिस तक्रारसुद्धा नोंदवली. कमल हसनवर सगळीकडे टीका झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरणसुद्धा दिलं की “extremist या शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना समजलेला नाही, माझ्या व्यक्तव्याशी छेडछाड करून ते मीडियामधून सादर करण्यात आलं आहे, मी हिंदूंच्या भावना दुखावल्या असा माझ्यावर आरोप केला जातो, पण माझ्या कुटुंबातले बरेच लोक हे हिंदू धर्मीय असून ते तो धर्म फॉलो करतात!”

या सगळ्या गदारोळानंतर कमल हसन यांच्या पार्टीने या वक्तव्यासंदर्भात स्टेटमेंट जाहीर केलं की “कमल यांचं वक्तव्य हे out of context वापरलं गेलं असून त्यांची प्रतिमा मुद्दाम हिंदूविरोधी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे!”

 

 

याविरोधात बीजेपी नेते अश्विन कुमार उपाध्याय यांनी दिल्ली हाय कोर्टात दाखल केलेल्या याचिकेलासुद्धा न्यायालयाने केराची टोपली दाखवली.

खरंतर कमल हसन यांची विचारसरणी बऱ्याच मुलाखतीमधून समोर आलेली आहे. सिस्टिमवरचा त्यांचा राग त्यांनी बऱ्याचदा व्यक्त केला आहे. राजनैतिक स्टँडमुळे कमल यांच्या सिनेमातसुद्धा बरेच अडथळे निर्माण झाले, ज्याचा कधी फायदा झाला तर कधी त्रास झाला.

कमल हसन असो किंवा आणखीन कुणी अभिनेता त्यांनी केलेलं स्टेटमेंट काही अंशी चुकलं असलं तरी ते चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर सादर केलं गेलं हेदेखील चुकीचं आहे, आणि भारतासारख्या देशात तर ही गोष्ट अगदी सर्रास होते!.

कदाचित या सगळ्यामुळे बरेच कलाकार त्यांच्या वैयक्तिक राजकीय मतांबद्दल उघडपणे बोलत नसतील!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version