' माधुरीच्या मुलाने २ वर्षांनंतर कापले केस, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल – InMarathi

माधुरीच्या मुलाने २ वर्षांनंतर कापले केस, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘स्टारकीड्स’ हा शब्द उच्चारला तरी भुवया उंचावल्या जातात. नेपोटिझम, त्यामुळे इतरांच्या संधी हिरावणारे, केवळ पालकांच्या नावावर चित्रपटात काम मिळवणारे ते थेट बि टाऊनच्या पार्ट्यांमध्ये नशेत धुंद झालेले स्टारकिड्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. शाहरुख खानचा लेक आर्यनच्या प्रकरणानंतर तर स्टारकिड्सवर प्रेक्षकांनीही टिकेच्या फैरी उडवल्या.

 

aryan khan inmarathi

 

मात्र काही कलाकारांची मुलं आजही फारशी प्रकाशात नाहीत, किंबहूना या कलाकारांची मुलं कोण आहेत? ती काय करतात? याबाबत प्रेक्षकांना माहिती नाही. आर्यन ड्रग्स प्रकरणात पकडला गेल्यानंतर आर माधवनचा मुलगा चर्चेत आला तो त्याच्या यशामुळे! आर्यनच्याच वयाचा आर माधवनचा मुलगा, त्यावरील संस्कार, शिस्त यांचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं.

आता या यादीत धकधक गर्लच्या मुलाचीच भर पडली आहे.

देखणं रुप, मनमोहक अदा, अप्रतिम नृत्य असं वरदान लाभलेली माधुरी दिक्षीत न आवडणारा प्रेक्षक दुर्मिळच! मात्र डॉ श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून अमेरिकेला गेलेल्या माधुरीने अनेक वर्ष आपल्या कुटुंबाला चंदेरी दुनियेपासून दूर ठेवले.

 

madhuri dixit inmarathi

 

लॉकडाऊन पुर्वीच हे कुटुंब मायदेशी परतलं, मात्र तरिही माधुरीची दोन्ही मुलं कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिली. पण गेल्या दोन दिवसांपासून माधुरीचा मुलगा ‘रायन’ सोशल मिडीयावर कौतुकाचा विषय ठरला आहे. 

रायनचा ‘तो’ निर्णय कौतुकास्पद!

दोन दिवसांपुर्वी ‘वर्ल्ड कॅन्सर डे’ च्या निमित्ताने माधुरी दिक्षीतने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये रायन हा आपले  केस कापून घेत असल्याचे दिसत आहे.

वरकरणी हा साधा व्हिडिओ वाटत असला तरी त्यामागील रायनचा विचार नक्कीच कौतुकास्पद आहे.

कॅन्सर डे च्या निमित्ताने रायनने आपले सगळे केस हे कॅन्सरग्रस्तांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आणि तो तडीस नेला. पुर्ण विचारान्ती त्याने हे धाडस केल्याचे माधुरी दिक्षीतने कबूल केले.

 

ryan inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो कर

रायनच्या या निर्णयाबद्दल माधुरी म्हणते, सगळेच वीर ‘टोपी’ घालत नाहीत, पण माझ्या लेकाने आज टोपी घातली याचा अभिमान वाटतोय. अर्थात त्याने कॅन्सरग्रस्तांसाठी जो निर्णय घेतला त्यासाठी त्याने आपले सगळे केस दान केले आहेत.

रायने अनेक वर्षांपुर्वीच हा निर्णय पक्का केला होता. त्यासाठी तब्बल २ वर्ष तो केस वाढवून त्यांची काळजी घेत होता.

संवेदनशील रायनचे कौतुक

माधुरीने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासात सोशल मिडीयावर रायनवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

लहान वयात रायनमधील असलेली संवेदनशीलता, त्याने दाखवलेले धाडस याबाबत नेटक-यांनी त्याची पाठ थोपटली.

रायन गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरग्रस्तांसाठी काम करत आहे. कॅन्सरवर उपचार घेताना रुग्णांना कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागते. यामध्ये रुग्णांचे केसही जातात. पुढे त्यांना अनेक महिने नव्या केसांसाठी प्रतिक्षा करावी लागते अशावेळी अनेकजण कृत्रिम केसांचा आधार घेतात.

 

sonali inmarathi

 

अशा रुग्णांना कृत्रिम केसांची मोठ्या प्रमाणात गरज असल्याने समाजातील अनेकजण पुढे येतात. रायननेही असाच निर्णय घेतल असून त्याच्या संवेदनशीलतेबाबत त्याचे कौतुक होत आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?