लॉकडाऊन इफेक्ट : रातोरात स्टार झालेली राणू मंडल पुन्हा झाली कंगाल…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपलं नशीब कधी केव्हा चमकेल सांगू शकत नाही, त्यात बॉलीवूडमध्ये जर तुम्हाला नशीब आजमावायचे असेल, तर तुमच्या मागे गॉडफादर हवा अन्यथा तुमचे नशीब चांगले असावे लागते. बॉलीवूडच्या मायाजालात काम मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तुम्ही स्टार बनलात तरी संघर्ष काही चुकत नसतो.
दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांना देखील संघर्ष चुकला नव्हता, आपल्या सोबतच्या स्टार्सना मागे टाकत बच्चनजीनी आपल्या अभिनयनाने लोकांची मन जिंकली होती एकेकाळी पडद्यावर गुंडाशी दोन हात करणारे बच्चनजी उतरत्या काळात गोविंदा सोबत सिनेमा करावा लागला होता. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी भरारी घेतली आणि कौन बनेगा करोडपती सारख्या कार्यक्रम करून पुन्हा एकदा आपली दमदार एंट्री घेतली.
भल्या भल्या लोकांची नशीब या बॉलीवूडमध्ये दावणीला लागलेली असतात तिथे उभरत्या कलाकारांचं तर आणखीनच कठीण, त्यात जर तुम्ही बाहेरचे असाल तर मग तुमच्यासमोर मोठी परीक्षा असते, स्टार किड्सचे समोर सुद्धा एक आव्हान असतेच, एकदा सिनेमा हिट झाला म्हणजे दुसरा होईलच असे नाही, त्यामुळे त्यांना ही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो.
नवाझ, पंकज त्रिपाठी सारखे कलाकार वर्षानुवर्षे मेहनत करून आज बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवले आहे, सगळेच नवाझसारखे कलाकार नसतात काहीजण थोडी वर्ष मेहनत घेतात आपला जम बसत नाही, हे लक्षात आल्यावर ते बॉलीवूडमधून आपला गाशा गुंडाळतात.
राणू मंडल हे त्यातलेच एक नाव, रातोरात स्टार बनलेली राणू मंडल आज एकाएकी गायब झालेली आहे, मध्यंतरी एका youtuber ने तिच्या मूळच्या घरी जाऊन तिची भेट घेतली होती. चला तर मग जाणून घेऊयात तिचा प्रवास…
नाना पाटेकरांचा वेलकम आपण सगळ्यांनीच बघितला असेल सिनेमात जेव्हा एक खोटा दिग्दर्शक बोलता बोलता बोलून जातो की सडक से उठाके स्टार बनाउंगा असाच काहीसा किस्सा राणू मंडल हीच्याबाबतीत घडला आहे. राणाघाट नावाचे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगाल राज्यात आहे.
–
- शाहरुख असं काही वागला, की या गायकाने त्याच्यासाठी आवाज देणं कायमचं थांबवलं
- रिमिक्स-रिमेकचा ट्रेंड सुरु होण्याआधी आलेल्या या ८ गाण्यांनी सर्वांना लावलं होतं वेड
–
या स्टेशनवर राणू मंडल गाणं गाऊन पैसे मागत असे, तिला राणाघाटची लता मंगेशकर अशी ही पदवी देण्यात आली होती. संगीतकार हिमेश रेशमिया यांच्या नजरेत राणू आणि तिचे स्वर आले, त्याने लगेचच तिला बोलवून घेतले आणि तिच्याकडून तीन गाणी गाऊन घेतली.
राणूने आपल्या आवाजतून प्रेक्षकांची मन जिंकायला सुरवात केली. सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला होता. सगळीकडे तिचीच चर्चा होती मात्र एक घटना घडली आणि ती प्रेक्षकांच्या मनातून उतरली, ती म्हणजे तिने एका चाहत्याला सेल्फी देण्यासाठी नकार दिलाच वर त्या फॅनशी उद्धटपणे बोलली होती.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा फिरला अवघ्यां काही दिवसात प्रसिद्धी मिळालेल्या राणूवर प्रेक्षक नाराज झाले. प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली आहे असा सूर प्रेक्षकांमध्ये होता.
प्रसिद्धी मिळाल्यानंतर राणूने आपले राहते घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली मात्र लॉकडाऊन लागल्याने ती पुन्हा जुन्या घरी परतली. बॉलीवूडमध्ये सुद्धा काम मिळाले नाही, सूत्रांच्या माहितीनुसर सध्या तिची परिस्थिती हलाखीची आहे.
कोरोनासारख्या साथीच्या आजाराने खरं तर सगळ्यांचेच कंबरडे मोडले आहे, कोरोनाचा फटका सर्वाधिक कोणत्या क्षेत्राला बसला असेल तर तो म्हणजे मनोरंजन क्षेत्र, आज कित्येक मोठ्या कलाकारांकडे काम नाही, मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे सर्व काही सुरळीत होईल अशी आशा आपण नक्की करूयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.