Site icon InMarathi

आजारी असताना हॉस्पिटलला न जाता, बर्मनदाना रेकॉर्डिंगला जायचं होतं; पण…

s d burman and kishor kumar inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“दिल का भंवर करे पुकार”, “गाता रहे मेरा दिल” अशी सुपरहिट गाणी ऐकली, की आपसूकच आपल्याला दिग्गज संगीतकार सचिन देव बर्मन यांची आठवण येते.

एस.डी. बर्मन यांना हिंदी चित्रपट संगीतक्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान आहे. चित्रपट संगीत क्षेत्राचा पाया रचण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले. बाजी, सीआयडी, प्यासा, बंदिनी, गाईड यांसारख्या अनेक चित्रपटांसह एस. डी. बर्मन यांच्या रचना हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक मोठा भाग होत्या.

 

 

१९७५ मध्ये, एसडी बर्मन हृषिकेश मुखर्जींच्या मिलीसाठी गाणी रेकॉर्ड करत होते. अशाच एका दिवशी, ते त्यांच्या घरी गायक किशोर कुमार यांच्यासोबत “बडी सूनी सूनी है” गाण्याची तालीम करत होते. पण त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

किशोर कुमार यांनी ‘अमीन सयानी’ यांच्या रेडिओ कार्यक्रमात त्यांच्याच शब्दात ही घटना सांगितली आहे. या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंगसुद्धा ‘गीतमाला की छांओं में’ संग्रहात उपलब्ध आहे.

किशोर कुमार असे म्हणाले होते, की गाण्याची तालीम करत असताना सचिनदादा अचानक आजारी पडले. “माझी तालीम सुरु असताना मी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्याचे डोळे उदास दिसत होते. ते माझ्याकडे पाहत होते आणि शांतपणे माझे गाणे ऐकत होते.”

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

—-

तालीम संपल्यानंतर काही वेळातच किशोर घरातून निघून गेले आणि सुमारे २५ मिनिटांनीच एसडी बर्मन जमिनीवर कोसळले.

ताबडतोब डॉक्टरांना बोलावून बर्मन यांना रुग्णालयात नेण्याचे सुचवले, पण दादांनी जाण्यास नकार दिला. रुग्णालयात नेण्याचे ठरल्यावर दादा म्हणाले, होते की किशोर गाणे रेकॉर्ड करण्यासाठी येणार आहेत आणि त्यावेळेला ते तिथे असले पाहिजेत. याच कारणासाठी हॉस्पिटलमध्ये जात नसल्याचे ठामपणे सांगितले.

यानंतर “रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर तू मला पाहिजे तिथे नेऊ शकतोस.” असेही ते आपल्या मुलाला आरडी बर्मन यांना म्हणाले होते. असे म्हटले जाते. आरडी बर्मन ज्यांना आपण सगळे पंचम या नावाने ओळखतो. पंचम किशोरच्या घरी गेले आणि त्यांना सांगितले की तुम्ही वडिलांना विनंती करावी जेणेकरून ते हॉस्पिटलमध्ये जातील.

यावर पंचम असेही म्हणाले होते, की रेकॉर्डिंग उद्याही होऊ शकते आज हॉस्पिटलमध्ये जाणे महत्वाचे आहे. किशोरदा सचिन दादांच्या घरी पोहोचल्यावर, त्यांना लक्षात आले, की दादांना हॉस्पिटलमध्ये नेणे फार गरजेचे आहे.

 

 

यावर त्यांनी एक युक्ती करायचे ठरवले. दादांनी गाणे रेकॉर्ड करण्याचा आग्रह धरू नये म्हणून घसा दुखत असल्याचे नाटक केले. किशोर म्हणाले “दादा, माझा आवाज ऐका, तो आत्ता चांगला वाटत नाही. रेकॉर्डिंग काही दिवस पुढे ढकलूया. तुम्ही दवाखान्यात जा आणि परत येईपर्यंत माझा आवाज ठीक होईल, मग आपण रेकॉर्ड करू”.

एस डी बर्मन त्यावर म्हणाले होते की गाणे चांगलेच व्हायला हवे. किशोरदांचा आवाज सुधारेल तेव्हाच रेकॉर्डिंग होईल. “जर मी रेकॉर्डिंगला येऊ शकलो नाही, तर समजा की मी तुमच्या समोर उभा आहे. आणि मला जसं तू गाावंसं वाटतं तसं गा,” असे म्हणत त्यांनी किशोर कुमार यांच्यासमोर त्यांची इच्छा व्यक्त केली. बर्मन हे किती परफेक्शनिस्ट होते हे या स्थितीतून कळते.

सचिनदादा दवाखान्यात नेण्यात आले आणि त्यांच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे रेकॉर्डिंगसाठी ते येऊ शकले नाहीत. ते शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसले तरीही, किशोरदांनी गाताना, ते समोर आहेत असा विचार केला.

पंचमदांनी नंतर रेकॉर्डिंग टेप त्यांच्या वडिलांना ऐकवण्यासाठी रुग्णालयात नेली आणि ते गाणे ऐकून एसडींच्या डोळ्यांत अश्रू आले. गाणे ऐकून ते हळूच म्हणाले, “पंचम, मला माहित होतं किशोर असंच गाणार.”

 

 

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात कामावर फार प्रेम करतात, आपल्या समोर असणाऱ्या कामाचा आदर करतात. त्यामुळेच ते फार मोठी व्यक्ती बनतात आणि लोक त्यांच्यावर प्रेम करतात. एखाद्या कलाकारासाठी त्याची कला सादर करण्यासोबतच कामाप्रति आदरही महत्त्वाचा असतो, हे समजून घेण्यासाठी एस डी बर्मन यांचा हा किस्सा कायम लक्षात ठेवावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version