Site icon InMarathi

“…तर मी पद्मश्री परत करेन!” कंगनाच्या या वादग्रस्त स्टेटमेंटमागचं सत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकताच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मपुरस्कार वितरण सोहळा पार पडला, गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे सगळंच ठप्प असल्याने तेव्हा हा सोहळा आयोजित करता आला नसल्याने यावर्षी हा सोहळा आयोजित केला गेला.

करण जोहर, एकता कपूर पासून कंगना रनौतपर्यंत कित्येक मोठमोठ्या सेलिब्रिटीजची नावं तेव्हा पुढे आली. खरंतर गेल्या वर्षभरापासून कंगना ज्यापद्धतीने स्टेटमेंट करतीये ते पाहता तिला हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हासुद्धा कोणाला त्याचं नवल वाटलं नव्हतं.

यामागची कारणं वेगळी असतीलही पण एकंदरच कंगनाचे राजनैतिक विचार आणि बॉलिवूडमधल्या नेपोटीजमविरोधात तिने उठवलेला आवाज, शिवाय बंगाल निवडणुकांदरम्यान तिने केलेली वक्तव्यं यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे.

कंगनाला बहुतेक पुढच्या वर्षी निवडणुकीसाठी तिकीटसुद्धा मिळेल अशी चर्चासुद्धा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगतीये. पण नुकत्याच झालेल्या सोहळ्यात कंगना हा पुरस्कार स्वीकारताना दिसल्याने पुन्हा तिच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

 

 

यामागचं कारण म्हणजे सुशांत सिंह मृत्यू प्रकरण. सुशांतच्या मृत्यूमागचं गूढ अजूनही उलगडलेलं नाहीये, आणि जेव्हा हे प्रकरण मीडियाने उचलून धरलं होतं तेव्हा बॉलिवूडच्या बड्या बड्या लोकांनी यावर मौन बाळगलं होतं.

कंगना मात्र तेव्हा सुशांतच्या मृत्यूबाबत खुलेआम बोलत होती, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडच्या मोठमोठ्या लोकांबद्दल अनेक गौप्यस्फोट केले, एवढंच नाही तर बॉलिवूडमधल्या ड्रग्सच्या वापराबद्दलसुद्धा तेव्हा ती व्यक्त झाली होती.

नुकतंच हृतिक रोशनसोबत झालेल्या कॉंट्रोवर्सीमुळे कंगना चर्चेत होती, पण सुशांतच्या मृत्यूनंतर मात्र कंगना सतत बॉलिवूड माफियाबद्दल उघडपणे बोलत होती आणि फार गंभीर आरोप करत होती.

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली होती की “सुशांत प्रकरणाबाबत मी केलेले आरोप जर खोटे ठरले, तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन!”

 

 

सध्या सुशांत सिंह प्रकरण थंड पडलं असलं तरी त्याच्या मृत्यूमागचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही, आणि कंगनाने केलेले आरोप सिद्ध झालेले नसतानाही तिने पद्मश्री स्वीकारल्यामुळे तिची जुनी स्टेटमेंट पुन्हा व्हायरल होत आहेत.

तिने आता पद्मश्री स्वीकारला आहे खरा, पण जेव्हा केव्हा सुशांत प्रकरणात तिने केलेले आरोप खोटे ठरतील तेव्हा तिला तिने दिलेलं वचन पूर्ण करावंच लागेल, असं लोकांचं म्हणणं आहे.

कंगनाला मिळालेला पद्मश्री योग्य का अयोग्य हा मुद्दा वेगळा, पण जर सुशांत प्रकरणात काहीच तथ्य बाहेर आलं नाही तर ही गोष्ट कंगनाला चांगलीच महागात पडू शकते!

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version