Site icon InMarathi

दुसऱ्याला चुना लावायला शिकवणारे हे ७ भन्नाट सिनेमे आजही आवडीने बघितले जातात!

con movies inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिरोने कायम हिरोगिरीच केली पाहिजे आणि सज्जन असलं पाहिजे या नियमाला फाटा देत नायकही फसवणूक करु शकतो अशा कथानकांवर बेतलेले अनेक हीट सिनेमे आजवर बनले आहेत.

बंटी और बबलीचा दुसरा भाग येऊ घातला आहे. यानिमित्तानं बॉलिवुडमधल्या कॉनगिरीवर अर्थात फसवणुकीच्या भन्नाट चित्रपटांवर एक दृष्टीक्षेप टाकुयात.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हिरो/ हिरोईन म्हंटलं की ते सर्वगुणसंपन्न आणि स्वभावानं सालसच असले पाहिजेत या प्रतिमेला छेद देत कॉन चित्रपट बनवले गेले. अशा चलाख नायक नायिकांना प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतलं.

कोरोनाच्या विळख्यातून मोकळ्या झालेल्या थिएटरमधे लवकरच प्रेक्षकांना फसवायला बंटी बबली येणार आहेत. तोवर आजवर बनलेल्या काही कॉन मुव्हिजबद्दल या लेखातून जाणून घेऊयात!

१. खोसला का घोसला –

 

 

सामान्य माणूस, आम आदमी कायम पिळवणूक करवून घेणारा आणि पिचलेला असतो. त्याला थोडी फार पॉवर असणाराही सहज फसवू शकतो आणि हा सामान्य माणूस चरफड करण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही.

खोसला का घोसला मधल्या खोसलानं मात्र अशा फसवणूक करणार्‍याला तोडीस तोड फसवणूक करून कसा धडा शिकवतो हे दाखविलं आहे. जमिनीवरची आक्रमणं हा विषय काही नविन नाही. वास्तवात अगदी गल्लीछाप राजकीय कार्यकर्ते, गुंड पुंड येता जाता आक्रमण करत जागा बळकावत असतात.

खोसलांच्या भूखंडावरही असं आक्रमण होतं आणि खोसला सुरवातीची चरफ़ड संपल्यावर या अतिक्रमण करणार्‍यालाच फसवतो. सामान्य जनतेच्या वतीनं पडद्यावर खोसला जो बदला घेतो तो अर्थातच थिएटरमधे बसलेल्या पब्लिकला आवडला होता.

२. धूम –

 

 

हिरो जर हातोहात चोरी करणारा अट्टल चोर असेल तर? देखणा, पिळदार शरीरयष्टीचा नायक चक्क चोरी करतो, पोलिसांच्या हातावर तुरी देत त्यांना उल्लू बनवत पळून जातो आणि प्रेक्षकांना हे आवडू शकतं हे धूम चित्रपट मालिकांच्यानिमित्तानं सिध्द झालं.

जॉन इब्राहिम, ह्रतिक रोषन आणि तात्पुरत्या सिक्स पॅकचा तत्कालिन ब्रॅण्ड अम्बॅसिटर अमिर खान यांनी सर्व भागातील अभिषेक बच्चनला चुना लावत आपली कॉनगिरी चालूच ठेवली आहे.

३. बदमाश कंपनी –

 

चार तरूण श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात एक मोठा प्लॅन आखतात आणि चपलांसारख्या ब्रॅण्डेड फॅशनेबल गोष्टींची तस्करी करतात. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट स्लीपर हिट मानला जातो. हा चित्रपट याच्या उत्कृष्ट पटकथेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

४. स्पेशल २६ –

 

 

कॉनगिरीतला सर्वोत्कृष्ट असा स्पेशल २६ हा एका वास्तव घटनेचा आधार घेत बांधलेला आहे. सीबीआय एजंट असल्याचं भासवून एका टोळीनं हातोहात फसवणं यावर हे कथानक आधारीत होतं.

अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज बाजपेयीपासून आपल्या मराठमोळ्या किशोर कदमसारख्या अभिनेत्यांनी यात उत्तम अभिनय केला आहे!

५. रॉकेट सिंग –

 

 

कॉर्पोरेट विश्वात टीकायचं असेल तर तुम्हाला बरंच काही शिकावं लागतं आणि याचंच एक प्रात्यक्षिक देणारा सिनेमा म्हणजे रणबीर कपूरचा रॉकेट सिंग!

एका सामान्य मात्र चलाख सेल्समनवर हा चित्रपट आधारलेला आहे. हा सेल्समन चक्क एक समांतर कंपनी चालवत असतो. रणबीर कपूरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात याचा समावेश होतो.

६. लेडिज वर्सेस रिकी बहल –

 

 

कॉनगिरीत हिरोच पुढे आहेत असं नाही नायिकांनीही आपलं कौशल्य पुरेपूर दाखविलं आहे. असाच एक चित्रपट म्हणजे लेडिज वर्सेस रिकी बहल.

प्रेमात पाडून तरूण मुलींना फसवणाऱ्या एका लखोबाच्या विरोधात त्यानं फसविलेल्या तिघीजणी एकत्र येतात आणि चौथीच्या मदतीनं त्याच्याकडून पैसे तर वसूल करतातच मात्र त्यालाही अद्दल घडवितात.

७. द वेडिंग गेस्ट –

 

 

लंडनमधून भर लग्नातून एक तरुणी पळून थेट भारत गाठते. तिचं ज्याच्यावर प्रेम आहे अशा हिरे व्यापार्‍याने भाडोत्री किडनॅपर बोलवून तिला किडनॅप केलेलं असतं.

पुढे घटना अशा घडत जातात की लग्नातला आलेला हा आगंतूक पाहुणा या भलत्या खेळात अडकत जातो. राधिका आपटेच्या वेगळ्या भूमिकांपैकी हा एक आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version