Site icon InMarathi

कुपोषणाने मुलं मरत आहेत तर मी काय करू? भाजप मंत्र्यांचे विधान आणि सद्यपरिस्थिती

mal final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच आरटीआयने देशातील कुपोषित बालकांच्या संख्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. जाहीर केलेली आकडेवारी अत्यंत धक्कादयला आहे. या आकडेवारीत सर्वात जास्त कुपोषित असलेली राज्य म्हणजे महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात. एकूण देशात ३३ लाख इतके कुपोषित बालक आहेत ज्यात अर्ध्याहून अधिक बालक गंभीर स्वरूपाची आहेत.

 

देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास ७५ हुन अधिक वर्ष झाली तरीसुद्धा काही समस्या आजही सोडवल्या गेल्या नाहीत. पोलिओ सारखा आजार भारतातून कायमचा गेला मात्र त्यासाठी अनेक वर्ष जावी लागली.

कुपोषण म्हणजे काय तर पुरेसा आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणची परिस्थिती निर्माण होते त्याला कुपोषण असे म्हणतात. प्रामुख्याने हा आजर आदिवासी भागातील मुलांमध्ये आढळून येतो. लहानपणी मुलांना पुरेसा आहार, जीवनसत्वे, शरीराची योग्य वाढ न झाल्याने हा आजरा उदभवतो. तसेच ज्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असते अशा कुटुंबात देखील हा आजरा दिसून येतो.

 

कुपोषणसारखा गंभीर आजरावर सरकार मात्र वर्षनुवर्षं काम करत आहे तरीदेखील कुपोषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. या गंभीर आजाराची दाखल अनेक समाजसेवा करणाऱ्या संस्थांनी घेतला आहे मात्र सरकारमधील मंत्री महोदयांना याचा विसर पडला असावा.

झालं असं की २०१४ ते १९ च्या दरम्यान महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती. २०१६ साली कुपोषित बालकांच्या मृत्यूची संख्या ६०० पर्यंत गेली होती जी २०१३-१४, २०१४-१५ च्या आकडण्यांपेक्षा जास्त होती. पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरात कुपोषणाने बालकांचा मृत्यू झाला होता.

 

 

साहजिकच अशी घटना घडल्यावर तत्कालीन आदिवासी मंत्र्यांनी त्या परिसरात जाऊन पाहणी केली. पीडित कुटुंबांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या समस्या देखील ऐकल्या मात्र एका मातेने मुलाच्या विरहाने टाहो फोडला होता, तिने थेट मंत्र्यांना पुढे आपली गाऱ्हाणी ऐकवली त्यावर मंत्री महोदयांनी त्या मातेला उत्तर दिले की, मुलांचे कुपोषणाने मृत्यू होतात तर मी काय करू?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

 

मंत्री महोदयांच्या या बेताल वक्तव्यवरुन त्यावेळी चांगलाच गदारोळ झाला होता, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मंत्री महोदयांनी माफी देखील मागितली होती, मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे त्या मातेला नक्कीच दुःख झाले असणार.

 

 

आज महिला बाल विकास मंत्रालयाने कुपोषणावर चिंता व्यक्त केली आहे. कोव्हीडच्या महामारीने जसे अनेकांचे कंबरडे मोडले आहे तसेच त्याचा फटका गरिबांना देखील मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कुटुंबाच्या पालन पोषणाचा प्रश्न त्यांच्या समोर आहे.

आज भारतात जवळपास प्रत्येक राज्यात कुपोषित बालक आहेत मात्र महाराष्ट्र यात सर्वात आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एकूण ६.१६ लाख एवढी संख्या आहे तर बिहार मध्ये ४.५७ लाख इतकी आहे तर लगेच खालोखाल असलेलं राज्य म्हणजे गुजरात, तिथे ३.२० लाख इतकी आहे.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

महाराष्ट्रातील वाढती कुपोषणाची संख्या ही खरोखरच गंभीर स्वरूपाची बाब आहे. आज आदिवासी जमातींसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवताना दिसून येतात मात्र त्या कितपत यशस्वी होतात हा एक वेगळाच मुद्दा आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version