आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला, की त्यातून वाचण्यासाठी डॉक्टरांच्या उपचारासोबत मनाची तयारी आणि आत्मविश्वासही लागतो. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी कॅन्सरवर आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने मात केली आहे.
मनिषा कोईराला ही सुद्धा बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री. २०१२ साली मनिषाला कॅन्सर झाला होता. अमेरिकेतही ती काही महिने उपचार घेत होती. अनेक संघर्ष करून, अडचणींवर मात करून ती कॅन्सरमुक्त झाली.
काल, ७ नोव्हेंबर म्हणजेच राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस. कॅन्सरबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी तिने काल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. कॅन्सरवर मात करण्याचा तिचा संघर्ष तिने लिहिला आहे.
—
—
कॅन्सरवर इलाज चालू असताना हॉस्पिटलमधील काही फोटोजदेखील तिने शेअर केले आहेत. ‘आज राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस. कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या सगळ्यांना माझ्याकडून खूप प्रेम आणि या उपचारांमध्ये तुम्हाला यश लाभो ही सदिच्छा.
मला माहित आहे, की हा प्रवास खूप कठीण आहे, पण तुम्ही त्यापेक्षा खंबीर आहात, हे कायम लक्षात ठेवा. ज्या लोकांनी कॅन्सरमुळे आपला जीव गमावला, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे यातून बाहेर पडले आहेत, त्यांना खूप प्रेम.
या रोगाविषयी आपणच जागरूकता पसरवायला हवी. ज्या लोकांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने कॅन्सरवर मात केली, त्यांच्या गोष्टी आपण एकमेकांना सांगायला हव्यात. यानेच प्रेरणा मिळेल. मी प्रत्येकाला सुंदर आरोग्य मिळावं अशी प्रार्थना करेन.’ असं तिने म्हटलं आहे.
खरंतर कॅन्सर सारखा आजार झालाय हे कळल्यावरच माणसाचं मानसिक खच्चीकरण होतं. उपचार सुरु असले, तरीही मानसिकरीत्या खंबीर राहणं यात महत्त्वाचं असतं.
सोनाली बेंद्रे, राकेश रोशन अशा बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी कॅन्सरला यशस्वी झुंज दिली आहे. त्यांच्या संघर्षाची कथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.