‘तुम्ही पंतप्रधान झालात तर सर्वात पहिला कायदा कोणता असणार’? उत्तर राहुल गांधींचं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नुकतेच काही पोटनिवडणुकांचे निकाल लागले, हे निकाल काँग्रेससाठी नक्कीच आशावादी आहेत मात्र भाजपसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. कारण बऱ्याच ठिकाणी भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. दादरा नगर हवेलीसारख्या ठिकाणी जिथे शिवसेनेने आपला झेंडा रोवला आहे.
कोरोनाची परिस्थिती, लसीकरणाचा घोळ, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलची भाववाढ यावरून जनमानसांत मोदी सरकार विषयी कमालीची नाराजी आहे, त्यातच ऐन दिवाळी तोंडावर असताना पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
पोटनिवडणूका तर झाल्या आता गोवा, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गोव्यात नुकतेच आम आदमी पार्टीने आपले पाय पसरायला सुरवात केली आहे, सेक्युलर विचारसरणी असलेला पक्ष आता धार्मिक मुद्द्यांना हात घालत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा
—
गोव्यात धार्मिक मुद्दे घेतले जात आहे तर तिकडे यूपीमध्ये प्रियांका गांधी यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. निवडणुकीत ४०% स्त्री उमेदवार असणार, स्त्रियांना टू व्हीलर देणार अशी आश्वासने काँग्रेसकडून देण्यात आली आहेत. बहिणीच्या खांद्याला खांदा लावून आता भाऊ देखील पक्षाच्या कामासाठी उतरला आहे.
–
- हिंदूंना फुकटात राममंदिराचे दर्शन तर मुस्लिमांना अजमेर : AAP ची नवी धार्मिक खेळी
- मूर्ती पूजेच्या विरोधाखातर मुस्लिमांनी विरोध केलेल्या गांधींच्या पुतळ्याचे अखेर अनावरण
–
एकीकडे आपले पंतप्रधान भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपली दिवाळी कन्याकुमारी येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरी केली. या निमित्ताने राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी संवांद साधला,
संवाद साधताना एका महिलेने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की तुम्ही पंतप्रधान झाल्यास सर्वात पहिले कोणते काम कराल? यावर क्षणाचा ही विलंब न करता राहुल गांधी यांनी उत्तर दिले की महिलांसाठी आरक्षण, जर कोणी मला विचारले की तुम्ही तुमच्या मुलाला कोणती गोष्टी शिकवाल? तर मी म्हणेन नम्रता, कारण नम्रतेने समजूतदार बनतो.
निवडणुकींच्या तोंडावर महिला आरक्षण हा मुद्दा काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर अधोरेखित केला जात आहे. अनुसूचित जाती जमाती यांच्या हक्कांसाठी काँग्रेस कायम आहे हा मुद्दा वर्षानुवर्षे केल्याने आपला मोर्चा आता महिला आरक्षणाकडे वळवलेला दिसून येत आहे.
ज्या शाळेत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याच शाळेला तामिनाडूच्या निवडणुकांपूर्वी भेट दिली होती. आज पुन्हा एकदा निवडणुकांच्यानंतर राहुल गांधींनी भेट दिली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा
—
महिला आरक्षणाचा मुद्दा इतिहास बघता हे विधयेक १९९८,९९ आणि २००८ साली सादर केले गेले होते मात्र चारही वेळा सरकारचे विसर्जन झाल्याने ते रद्द करण्यात आले होते. आज जगभरातील १९३ देशांमध्ये स्त्री आरक्षणामध्ये भारताचा १४८ नंबर लागतो.
आज स्त्रियांचे आरक्षण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, एकीकडे महिला सबलीकरणाचे अनेक उदाहरणं आपण रोज वाचत असतो. तर दुसरीकडे स्त्रियांना कामाच्या ठिकाणी, घरात मोठ्या प्रमाणावर त्यांचे शोषण होताना दिसून येते. पूर्वी महिला अशा समस्या उघडपणे सांगत नव्हत्या मात्र आजकाल महिला पुढे येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना दिसून येत आहे.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.