' जाणून घ्या ब्लाइंड क्रिकेट सामान्य क्रिकेटपेक्षा किती वेगळं आहे! – InMarathi

जाणून घ्या ब्लाइंड क्रिकेट सामान्य क्रिकेटपेक्षा किती वेगळं आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेट हा भारतातील खूप लोकप्रिय खेळ आहे, यात तर काही शंकाच नाही.

क्रिकेटला सर्व वयातील लोक पसंत करतात. भारतातील खूप लोकांच्या या खेळाशी भावना जोडलेल्या आहेत. सचिन असो वा धोनी, कोहली असो वा युवराज सगळ्यांचे चाहते भारतात असतात, तसेच क्रिकेट जसे पुरुष खेळतात तश्या महिलाही खेळतात आणि दृष्टी नसलेले सुद्धा खेळतात.

दृष्टी नसलेल्या लोकांना खेळताना बघणे हे खूप रोमांचकारी असते. दृष्टी नसून सुद्धा हे खेळाडू ज्या पद्धतीने खेळतात ते खूप कुतूहलाच असते. त्यांचे ते खेळणे बघून ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

 

blind-cricket-marathipizza01
allindiaroundup.com

 

दृष्टी नसलेल्या लोकांच्या क्रिकेटचे नियम सामान्य क्रिकेटपेक्षा वेगळे असतात. लोक नेहमी विचार करतात की, दृष्टी नसलेले लोक कसे काय क्रिकेट खेळू शकतात. म्हणून आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत ब्लाइंड क्रिकेटचे नियम आणि त्याचाशी निगडीत माहिती!

तीन श्रेणी मध्ये विभागले जातात हे खेळाडू

ब्लाइंड क्रिकेट मध्येही सामान्य क्रिकेट सारखे ११ खेळाडू असतात. त्या खेळाडूंना तीन श्रेण्यांमध्ये विभागले जाते.

पहिली श्रेणी B1 मध्ये असे खेळाडू येतात जे पूर्णतः अंधत्व असेलेले असतात. दुसरी श्रेणी ही B2 असते, त्यात ३ असे खेळाडू असतात ज्यांना थोडया प्रमाणात अंधत्व असते.

तिसरी श्रेणी असते B3, या श्रेणीत असे खेळाडू येतात जे थोडया प्रमाणात अंधत्व असलेल्या खेळाडूंपेक्षा थोडे चांगले बघू शकतात.

सीमारेषा, पिच आणि बॅटची लांबी

सीमारेषेची लांबी जवळपास सामान्य क्रिकेटमध्ये असते तेवढीच असते. जास्तकरून ती अंदाजे  ४५ ते ५० मीटर एवढी असते. पिच, स्टम्प आणि बॅटचा आकार देखील सामान्य क्रिकेट सारखाच असतो.

 

blind-cricket-marathipizza02
yahoo.com

हे आहेत बॅटींग आणि रन बनवायचे नियम

फलंदाजीचे नियम वेगळे आहेत. पूर्णपणे अंधत्व असलेल्या खेळाडूंनी बनवलेल्या धावा डबल केल्या जातात, म्हणजे एखाद्या पूर्ण अंधत्व असलेल्या खेळाडूने एक धाव बनवली तर त्या दोन धावा मानल्या जातात.

ह्याच्या व्यतिरिक्त धावा काढण्याचे बाकीचे नियम सामान्य क्रिकेट सारखेच आहेत. नो बॉल झाल्यावर फ्री हिट दिली जाते. बाकीचे आऊट- नॉट आऊट नियम सगळे रोजच्या क्रिकेट सारखेच आहेत.

ह्या क्रिकेट मध्ये बेरिंगवाला चेंडू वापरला जातो

ब्लाइंड क्रिकेट मध्ये लेदरऐवजी प्लास्टिकचा चेंडू वापरण्यात येतो. ह्या चेंडूच्या आतमध्ये बेरिंग टाकली जाते. जिच्यातून आवाज निघतो. ज्यामुळे त्या बेरिंगच्या आवाजाने फलंदाज टाकलेल्या चेंडूचा अंदाज लावून त्या दिशेने फटका मारतो.

गोलंदाजीचे नियम

ब्लाइंड क्रिकेट मध्ये अंडरआर्म गोलंदाजी केली जाते, म्हणजे पूर्ण हात फिरवून गोलंदाजी करायची नसते. जेणेकरून बॉऊंसर टाकला जात नाही आणि कोणताही फलंदाज जखमी होत नाही.

ह्या व्यतिरिक्त फुलटॉस आणि यॉर्कर टाकण्यास पण मनाई केली जाते. पिचवर एक रेखा काढलेली असते, त्याच्या पुढेच चेंडूचा टप्पा ठेवावा लागतो. त्याचा आधी टप्पा टाकल्यास नोबॉल दिला जातो.

 

blind-cricket-marathipizza03
bordermail.com.au

क्षेत्ररक्षण

क्षेत्ररक्षण करताना सगळ्या खेळाडूंची सामन्य क्रिकेटमध्ये लावतात तशीच फिल्ड लावली जाते. क्षेत्ररक्षणातही पूर्णतः अंधत्व असलेल्या खेळाडूंना विशेष सूट दिली जाते. जर पूर्णतः अंधत्व असलेल्या खेळाडूने जर एक टप्पा पडून झेल घेतला तरीही फलंदाजाला आऊट दिले जाते.

अशाप्रकारच्या नियम आणि अडचणीवर मात करून दृष्टीहीन क्रिकेटर आपल्या मेहनतीने आणि विश्वासाने चांगले प्रदर्शन करून सगळ्यांची मनं जिंकतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?