Site icon InMarathi

दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर देणारी भारी कंपनी…

scooter inmarathi2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दिवाळी म्हटली की नवीन कपडे, फटाके, शॉपिंग या सगळ्याची धूम चालू होते. ऑफिसला सुट्टी असते, घरच्यांना योग्य वेळ देता येतो. घरच्यांसोबत दिवाळी कशी साजरी करायची याचे प्लॅन्स आखले जातात.

तुम्ही सुद्धा यंदाची दिवाळी घरच्यांसोबत साजरी केली असेल. मागच्यावर्षी कोरोनामुळे सगळेजणंच घरी होते, ना कुठे जाता आलं, ना कोणाला भेटता आलं. यावर्षी बंधनं शिथिल झाल्यामुळे थोड्याप्रमाणात का होईना, सगळ्यांनी मज्जा केली.

दिवाळीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, ऑफिसकडून मिळणारा बोनस. या बोनसची सगळेजणं आतुरतेने वाट बघत असतात. काही कंपनीज आपल्या कर्मचाऱ्यांना पगारात वाढ देतात. काही कंपनीज मिठाई देतात, तर काही चक्क स्कुटर..

आता तुम्ही म्हणाल, की स्कुटर? मस्करी करताय का राव.. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. चक्क ३५ कर्मचाऱ्यांना या कंपनीने स्कुटर गिफ्ट केली आहे. आणि तीही साधीसुधी नव्हे, तर इलेक्ट्रिक स्कुटर.

 

 

दिवाळीला आपण जवळच्या लोकांना काही ना काही भेट देतो. आपण ज्या कंपनीत काम करतो, ती कंपनीसुद्धा आपल्या कामाचं कौतुक म्हणून आपल्याला काहीतरी भेट देत असते.

सुरतमधल्या एका कंपनीने मात्र मिठाई, पैसे न देता एक खास गिफ्ट आपल्या कर्मचाऱ्यांना दिलं आहे. आणि ते गिफ्ट म्हणजे इलेक्ट्रिक स्कुटर.

पेट्रोलच्या वाढत्या किंमती, वाढतं प्रदूषण.. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या कंपनीने कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कुटर गिफ्ट केली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ३५ कर्मचाऱ्यांना ही स्कुटर देण्यात आली आहे.

अलायन्स ग्रुप असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे सर्वेसर्वा सुभाष डावर म्हणाले, की ‘पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि इतर गोष्टी लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे पेट्रोलचे पैसे वाचतील आणि पर्यावरणाचं संवर्धन होईल’

 

 

‘पर्यावरणाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे’, असं सुभाष सांगतात. ‘पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी मी आणि आमची कंपनी नेहमीच तयार असते’, असेही ते म्हणतात.

सध्या सुभाष यांचे सुपुत्र, चिराग डावर म्हणाले, की ‘यंदा दिवाळीला आम्ही ३५ कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक बाईक गिफ्ट केली आहे.’

दिवाळीत कंपनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कुटर देण्यात आली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या गिफ्टने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे.

तुम्हाला कशी वाटली ही कल्पना? लगेच कमेंट करा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version