आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
माहिती व तंत्रज्ञान हे सर्वच क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलायचं तर, मागच्या काही वर्षात शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासणे, रक्तातील साखरेचं प्रमाण तपासणे हे आता आधीपेक्षा खूप सहज झालं आहे.
आता हे तंत्रज्ञान अजूनही सोपं होणार, ‘ई-नोज्’ येणार आहे अशी एक बातमी सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे.
कोरोना काळात लोकांना सर्वात जास्त त्रास वाटायचा तो विविध तपासणी करायचा. नाकातून ‘स्वॅब’ देणे, रक्त तपासणी करणे, रिपोर्टसाठी वाट बघणे हे प्रत्येकासाठी एक जिकिरीचं काम होतं, पण इथून पुढे कॅन्सर, कोरोना, दमा यासारख्या सर्व आजारांचं निदान करणं हे अगदीच सहज होणार आहे असे संकेत इंग्लंडच्या ‘आऊलस्टोन मेडिकल’ या कंपनीने दिले आहेत.
‘ई-नोज्’ हे कसं आपला आणि डॉक्टरांचा त्रास कमी करेल, वेळ वाचवेल? हे जाणून घेऊयात.
आपण सध्या वापरत असलेल्या ‘मास्क’ सारखं हे एक कृत्रिम प्रकारचं नाक असेल ज्यामध्ये सेन्सर असतील जे की काही क्षणात तुमच्या शरीरातील आजारांचं निदान करेल असा संशोधकांना विश्वास आहे.
‘ई-नोज्’ हे तुमच्या श्वसन नलिकेची कार्यप्रणाली तपासेल आणि तुमच्या शरीराची सद्यस्थिती ही काही क्षणात काही आकड्यांच्या स्वरूपात डॉक्टरांना कळेल असा दावा ‘ई-नोज्’च्या निर्मात्यांनी केला आहे.
कॅन्सरचं निदान हे कमीतकमी वेळात लागावं असा उद्देश ठेवून कॅम्ब्रिज विद्यापीठ आणि एनएचएस यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या ४००० रुग्णांची तपासणी सध्या ‘ई-नोज्’ मार्फत केली जात आहे.
काय आहे तंत्रज्ञान?
आपण जेव्हा श्वासाद्वारे कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडतो तेव्हा त्यामध्ये ३५०० पेक्षा अधिक विओसी म्हणजेच ‘वोलाटाईल ऑर्गनिक कंपाऊंड’ असतात. शरीरातील गॅसचे छोटे कण (‘मायक्रोस्कोपीक ड्रॉपलेट्स’) हे सुद्धा आपण श्वासाद्वारे बाहेर सोडत असतो.
‘ई-नोज्’ हे या सर्व कंपाउंडस् बद्दल माहिती देते आणि त्यावरून डॉक्टरांना कमी वेळात कोणते उपचार करावेत याचा अंदाज येतो.
पुढील पाच वर्षात ‘ई-नोज्’ हे जगात सर्वत्र उपलब्ध असेल आणि त्याद्वारे केलेली तपासणी ही वैध मानली जाईल यासाठी त्याचे संशोधक प्रयत्न करत आहेत.
कोरोना नंतर आरोग्य क्षेत्रात बरेच बदल होणं हे अपेक्षित आहे. दमा ते कॅन्सर अशा कोणत्याही आजार हे केवळ श्वासाद्वारे तपासता यावेत या दृष्टीने डॉक्टरांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
‘ई-नोज्’ ही संकल्पना काही वर्षांपूर्वी एखाद्या ‘साय-फाय’ सिनेमासारखी वाटली असती, पण आज हे शक्य आहे हे सर्व संबंधित लोक मान्य करत आहेत.
‘ई-नोज्’ चा अजून एक फायदा हा असणार आहे की, रुग्णाला सुरू असलेली औषधं त्याला किती लागू पडत आहेत हेसुद्धा डॉक्टरांना लक्षात येणार आहे.
—
- अनेक विकारांवर गुणकारी अशा तुळशीच्या बियांचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
- फक्त दूधच नाही, तर दुधावरची साय सुद्धा आहे त्वचेसाठी वरदान…
—
फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान करतांना श्वसनाची गती तपासली जाते. ही तपासणी करण्यासाठी ‘ई-नोज्’ मध्ये ‘सिलिकॉन’चं आवरण असलेला कॅमेरा बसवण्यात आलेला आहे.
शरीरातून बाहेर पडणाऱ्या केमिकल्सद्वारे तब्येतीची माहिती देणं हे नव्याने विकसित झालेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ मुळे शक्य होणार आहे.
तुमच्या श्वासांमध्ये जर अमोनियाचं प्रमाण अधिक असेल तर तुम्हाला लिव्हर- किडनीचे त्रास असू शकतात असे निदान या तंत्रज्ञानामुळे कमी वेळात समोर येणार आहेत.
जर्मनीच्या ‘एअरसेन्स’ या संस्थेने ‘पेन३’ या ‘ई-नोज्’ ची निर्मिती करून हे दाखवून दिलं आहे, की कोरोना आहे की नाही हे बघण्यासाठी काही दिवसांनी पीसीआर तपासणीची गरज नसेल.
जर्मनीत झालेल्या एका सर्वेक्षणात हे समोर आलं आहे की, ‘ई-नोज्’ मुळे रुग्णांचं कोरोना निदान हे केवळ ८० सेकंदात शक्य झालं ज्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार करणं हे सहज शक्य झालं होतं.
जर्मनीच्या संशोधकांना हा पूर्ण विश्वास आहे की, ‘ई- नोज्’ मुळे गर्दीच्या ठिकाणी सुद्धा काही क्षणात कोरोनाचं निदान करणं सहज शक्य होणार आहे.
सर्व नव्या गोष्टींचं, तंत्रज्ञानाचं स्वागत करणाऱ्या भारत देशात ‘ई-नोज्’चं सुद्धा स्वागतच होईल हे नक्की. आपण सर्वांनी मात्र एक काळजी घ्यायची आहे की, सध्या डुप्लिकेट ‘ई-नोज्’ तयार करणाऱ्या कित्येक टोळ्या सुद्धा सक्रिय झाल्या असाव्यात, त्यांच्याकडून अशी कोणतीही खरेदी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.