' नासाच्या इंटर्नने फक्त ३ दिवसात शोधला नवीन ग्रह जो आहे पृथ्वीपेक्षा सातपट मोठा… – InMarathi

नासाच्या इंटर्नने फक्त ३ दिवसात शोधला नवीन ग्रह जो आहे पृथ्वीपेक्षा सातपट मोठा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नासा या संस्थेबरोबर काम करायला विज्ञान प्रेमी आणि अंतराळ प्रेमी लोकांना नक्कीच आवडेल. नासाने आखलेल्या मोहिमेमुळे कित्येकांना अंतराळाबद्दल कुतूहल निर्माण झाले.

माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळ ग्रहावर रोव्हर नेला. अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी हबल दुर्बीण सोडली. आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही एक प्रोब सध्या अवकाशात आहे.

अंतराळातल्या कितीतरी गूढ गोष्टी नासामुळे लोकांना माहीत होत आहेत, कित्येक अवघड कोडी उलगडत आहेत. अजून आपल्यासाठी कितीतरी अज्ञात गोष्टी, अज्ञात ग्रह, आकाश गंगा, ब्लॅक होल्स अवकाशात आहेत.

तिथपर्यंत माणसाची झेप अजून गेली नाही. पण तरीही माणूस अशा सगळ्या गोष्टींचा मागोवा घेत असतो आणि म्हणूनच अंतराळविज्ञान हा आता एक अभ्यासातील महत्त्वाचा विषय ठरतो आहे.

 

space-myths-inmarathi
relativelyinteresting.com

 

नासा देखील ज्यांना अंतराळामध्ये आवड आहे किंवा काही करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असते.अशा विद्यार्थ्यांना नासामध्ये अभ्यास करायला मिळतो.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

नासाबरोबर काम नाही करता येत, परंतु उपग्रहाने पाठवलेल्या डेटा अॅनालिसीस करण्याचे काम हे विद्यार्थी करू शकतात.

नासाच्या काही निवडक चाचण्यानंतर नासा निवडक विद्यार्थ्यांना इंटरर्नशिप वर दोन महिन्यांकरिता बोलवत असते. इंटर्नस् म्हणून काम करायलाही विद्यार्थ्यांना फार आवडतं.

 

nasa interns inmarathi
bluff country news

 

कारण नासा मधल्या शास्त्रज्ञांशी चर्चा करता येते, बोलता येतं, हा अनुभव ही खूप वेगळा असतो. त्यामुळे अशा शास्त्रज्ञांना कॉफी देणे, बॅगल्स देणे ही कामे देखील हे विद्यार्थी आनंदाने करतात.

या विद्यार्थ्यांना आपल्या दोन महिन्याच्या कालखंडात एखाद्या घटनेने आपण जगाचे लक्ष वेधून घेऊ अशी अपेक्षाही नसते.

पण १७ वर्षीय इंटर्न, ‘वूल्फ कुकीयर’ च्या बाबतीत हे घडलं. त्याने लावलेल्या शोधामुळे तो जगातल्या हेडलाईन न्यूज मध्ये आला.

दोन महिन्यांकरिता इंटर्नशिप करण्यासाठी त्याची निवड झाली आणि इंटर्नशिपच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी त्याने एका नवीन ग्रहाचा शोध लावला.

आता त्या ग्रहाचे नामकरण “TOI 1338 b” असे करण्यात आले आहे. जो पृथ्वीपेक्षा सातपट मोठा आहे आणि दोन ताऱ्यांभोवती फिरत आहे. म्हणजे या ग्रहाला दोन सूर्य आहेत.

 

nasa intern inmarathi
daily mail

 

त्यापैकी एक सूर्य आपल्या सूर्यापेक्षा दहा पट मोठा आहे तर दुसरा सूर्य आपल्या सूर्यापेक्षा तीन पट लहान आहे, आणि त्याची प्रखरता ही कमी आहे. आणि हे दोन तारे देखील एकमेकांभोवती फिरतात.

आणि प्रत्येकाला कक्षा पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवस लागतात. नासाने शोधलेला हा एक वर्तुळाकार ग्रह आहे. पृथ्वीपासून हा ग्रह १३०० प्रकाशवर्ष दूर आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर हे सात किंवा नऊ प्रकाश मिनिटे इतकं आहे.

म्हणजे हा TOI 1338 b किती दूर आहे याची आपल्याला कल्पना येईल. वूल्फ कुकियर ला ‘स्टार वॉर्स’ च्या सिनेमांची आवड आहे आणि जेव्हा त्याने हा ग्रह शोधला आणि त्याचे दोन सूर्य पाहिले तेव्हा त्याने त्याची तुलना स्टार वॉर्स मधल्या टॅटूशी केली.

 

new planet inmarathi
nasa

 

त्यालाही दोन सूर्य होते. TOI 1338 b वर दोन सूर्यास्त होतात. उल्फ च्या घरात त्याच्या बेडरूममध्ये स्टार वॉर चे पोस्टर्स लागलेले आहेत आणि त्याच्या बेडरूममध्ये आकाश निरीक्षणासाठी एक दुर्बीण देखील आहे.

नासाच्या TESS (Transiting Exoplanet Survey Satellite) कार्यक्रमांतर्गत वूल्फ ने हे काम केले आहे. वूल्फ कुकियर हा न्यूयॉर्कच्या स्कार्सडेल हायस्कूलचा विद्यार्थी असून त्याच्या जूनियर वर्षात तो शिकत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन महिन्यांसाठी त्याची नासाच्या इंटरर्नशिप साठी निवड झाली. २०१९ च्या उन्हाळ्यात तो ग्रीनबेल्ट हून नासाच्या गोदार्द स्पेस फ्लाईट सेंटर कडे अाला.

 

nasa intern inmarathi 2
BBC

 

तिथे त्याने ‘नागरिक प्लॅनेट हंटर्स’ प्रकल्पात भाग घेतला. तिथे त्याचे कार्य होते की, आधीच्या स्वयंसेवकांनी मार्क करून ठेवलेला data होता, त्याचं निरीक्षण करणे. त्याचं काम होतं की ताऱ्यांची प्रखरता मोजणे.

आधीच्या स्वयंसेवकांनी त्याचं नामकरण, ‘eclips binary’ असे केले होते. वूल्फ कुकीयरने जेव्हा निरीक्षण केले तेव्हा दोन तारे एकमेकांभोवती फिरताना प्रत्येक कक्षेदरम्यान एक ग्रहण व्हायचे.

तीन दिवसांच्या निरीक्षणात त्याला काहीतरी वेगळं दिसलं. त्याने ही गोष्ट त्याचे मेन्टोर वेसलीन कॉत्सव्ह यांचा निदर्शनास आणली. त्याने त्याचं नीट निरीक्षण केलं आणि तिकडे एखादा ग्रह असावा म्हणून अजून data तपासून पाहिला.

आणि त्याचा कयास खरा ठरला. व्हॅसलीन कॉत्सव्ह यांच्या म्हणण्यानुसार, आजपर्यंत कोणत्याही हायस्कूल इंटर्नने एखाद्या ग्रहाचा शोध लावला नव्हता.

 

new planet inmarathi 1
washington post

 

वुल्फने शोधलेला हा ग्रह म्हणजे TESS प्रोग्राम साठी एक सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे अजून अज्ञात असलेले काही ग्रह शोधण्यासाठी अनेकांना प्रेरणा मिळेल आणि अज्ञात अवकाशा बद्दल आणखी थोडी माहिती मानवास मिळेल.

नासाने दोन-तीन महिने वूल्फने केलेलं निरीक्षण आणि शोधलेला ग्रह हे तपासून पाहिले, आणि त्यानंतरच त्याच्या संशोधनाला दुजोरा दिला.

नासाने या महिन्याच्या सुरुवातीला वूल्फने केलेलं निरीक्षण आणि शोधलेला ग्रह याबाबतची माहिती त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केली आहे. नासाने यासंबंधीचे पेपर्स, जे वूल्फ कुकियरने लिहले, ते सायंटिफिक रिव्ह्यू साठी सब्मिट केले आहेत.

TESS ने शोधलेला हा पहिलाच ग्रह आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, असे ग्रह शोधताना सॉफ्टवेअरचा देखील गोंधळ उडतो. कारण ग्रहणाची स्थिती वगैरेचे निरीक्षण करताना सॉफ्टवेअर कन्फ्युज होतात.

त्यासाठी म्हणूनच मानवी डोळे कामाला येतात. त्यासाठीच वूल्फ कुकीयर सारख्या इन्टर्नने केलेलं निरीक्षण आणि नवीन ग्रह शोधण्यात दिलेले योगदान महत्त्वाचं आहे.

 

nasa intern inmarathi 3
la repubblica

 

वूल्फ कुकियरने तीन दिवसात एक ग्रह शोधून नवीन इतिहास घडवला आहे.

त्याचं हायस्कूलचं सिनियर वर्ष संपल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी काय करायचंय याचे प्लान्स तयार आहेत.

त्याला पुढे प्रिन्स्टन, एमआयटी आणि स्टॅनफोर्ड या युनिव्हर्सिटीतील ॲस्ट्रोफिजिक्स आणि फिजिक्समध्ये करिअर करायचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?