' मोबाईलची बॅटरी लवकर संपल्यामुळे होणारी धांदल-गैरसोय-चीडचीड टाळा, या टिप्स वापरा! – InMarathi

मोबाईलची बॅटरी लवकर संपल्यामुळे होणारी धांदल-गैरसोय-चीडचीड टाळा, या टिप्स वापरा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोबाईलची बॅटरी संपणे ही दैनंदिन जीवनातील सगळ्यात मोठी समस्या मानायला हरकत नाही. कारण एकदा का बॅटरी संपली की त्या मोबाईलचा काडीचा उपयोग नसतो.

मग अश्या वेळेस आपली खरी धांदल उडते आणि गैरसोय होते. कधीकधी अतिशय अर्जंट काम असतं आणि तेवढ्यात मोबाईलची बॅटरी संपते. मग चीडचीड होणे वगैरे क्रिया सुरु होतात.

पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मोबाईल आपणचं वापरतो. त्यामुळे आपल्याच काही चुकांमुळे म्हणा किंवा दुर्लक्षामुळे म्हणा बॅटरी लवकर संपू शकते. त्यामुळे अश्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

आज आम्ही तुम्हाला मोबाईलची बॅटरी वाचवण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे.

 

mobile-battery-saving-marathipizza

स्रोत

स्मार्ट फोनमध्ये दोन प्रकारचे डिस्प्ले असतात. LCD आणि AMOLED. यामधील AMOLED अतिरिक्त बॅटरी वापरतो. जर आपल्या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले असेल(सॅमसंगच्या प्रत्येक एंड्रॉइड मध्ये राहतो) त्यावेळी आपल्या मोबाईलचा वालपेपर हा डार्क अथवा ब्लॅक वापरा. जेणेकरुन बॅटरी अधिक प्रमाणात वापरता येइल.

mobile-battery-saving-marathipizza01

स्रोत

१५ सेंकद ऐवढ्या टाईमवर मोबाईल स्क्रिन ऑफ होण्याची वेळ ठेवा. साधारण प्रत्येकाच्या मोबाइलची स्क्रिन ऑफचा टाईम हा ३० सेंकद किंव्हा त्यापेक्षा अधिक असतो.

 

mobile-battery-saving-marathipizza02

स्रोत

मोबईलमध्ये असणारे अॅप किती बॅटरी वापरतात हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे अनावश्यक अॅप काढून टाका. त्याचप्रमाणे Settings > Battery मध्ये पाहिल्यास कोणता अॅप किती बॅटरी वापरतो हे समजते. जो अॅप बॅटरी जास्त बापरतो त्या अॅपचा वापर कमी करा.

 

mobile-battery-saving-marathipizza03

स्रोत

महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मोबाईल व्हायब्रेट मोड वर असल्यास मोबईलची बॅटरी अधिक प्रमाणात वापरली जाते. मिटिंग मध्ये किंवा महत्त्वाच्या कामात असल्यास व्हायब्रेट मोड मोबाईल ठेवण्याऐवजी तो सायलंट करा.

Dial pad tones, Screen locking sounds, Touch sounds हे फिचर देखिल सायलंस ठेवा. यामुळे बॅटरी नक्कीच सेव्ह होण्यास मदत होइल.

mobile-battery-saving-marathipizza04

स्रोत

स्मार्ट फोनचा नेहमी ब्राइटनेस कमी ठेवा. जेणेकरुन त्याचा डोळ्याला त्रास होणार नाही आणि बॅटरी वाचण्यासही मदत होइल. (ब्राइटनेस कमी करण्यसाठी > Settings > Display > Brightness level) ऑटो ब्राइटनेस या फिचरला ऑफ करुन बॅटरी वाचवली जाईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

स्रोत

फोनची बॅटरी कमी होत असल्यास बॅटरी सेव्ह मोड ऑन करावा. काही स्मार्ट फोनमध्ये पावर सेव्ह हे फिचर असते ते ऑन कराव. एंड्रॉइडच्या लॉलीपॉप स्मार्टफोनमध्ये हे फिचर इनबिल्ट आहे. (Settings > Battery > Battery Saver)

 

mobile-battery-saving-marathipizza06

स्रोत

या टिप्स आतापासूनचं वापरायला सुरुवात करा म्हणजे मोबाईलची बॅटरी दिवसभर तुमची साथ देईल !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?