' जगात “भारताचं” नाव गाजवणाऱ्या या ८ ‘मर्दानी’ आपल्याच देशात फारश्या प्रसिद्ध नाहीत… – InMarathi

जगात “भारताचं” नाव गाजवणाऱ्या या ८ ‘मर्दानी’ आपल्याच देशात फारश्या प्रसिद्ध नाहीत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉडी बिल्डींग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात पिळदार शरीरयष्टी असलेले पुरुष, त्यांचे बलदंड बाहू, मेहनतीने कमवालेलं शरीर आणि कोणालाही आकर्षित करेल असं व्यक्तिमत्त्व!

पण कधी महिलांना तुम्ही अश्या रुपात पाहिलं आहे का हो? तुमच्यापैकी फारच कमी जणांना महिला बॉडीबिल्डर्सबद्दल माहिती असेल, त्याचं कारण म्हणजे आजही आपल्या समाजात महिला बॉडीबिल्डर्सकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. त्यांना समाजात म्हणावा तसा मान दिला जात नाही.

पुरुषी अहंकार असलेली मंडळी त्यांचे कर्तुत्व न पाहता त्यांनी पुरुषी खेळ आपलासा केला म्हणून त्यांच्या नावाने शंख फुंकतात.

 

या महिला बॉडीबिल्डर्स काही एका क्षणात अश्या झालेल्या नाहीत, त्यांनी देखील पुरुष बॉडीबिल्डर्स इतकीच किंवा त्यांच्यापैकी जास्त मेहनत घेऊन शरीर कामावलेलं असतं.

पण पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेमूळे त्यांची मेहनत आणि कामगिरी काही केल्या आपल्यासमोर येत नाही.

असो, आज आम्ही तुमची भारताच्या ८ महिला बॉडीबिल्डर्सशी भेट घडवून आणणार आहोत, ज्यांनी ‘स्त्रिया देखील पुरुषांपेक्षा कमी नाही’ हे दाखवून दिले आहे.

यास्मिन चौहान

यास्मिन चौहानला जिम करण्याची भयंकर आवड, पुढे यातच तिने स्वत:चं करियर घडवायचं ठरवलं. आज तिची स्वत:ची जिम आहे. Gladrags Mrs. India २००५ मधील बेस्ट बॉडी अवॉर्ड तिलाच मिळाला होता.

yashmeen-chauhan InMarathi

 

श्वेता राठोड

श्वेता राठोड यांना जेव्हा व्यायामाची आवड लागली तेव्हा त्या लपून छपून वर्कआउट करायच्या, कारण त्यांच्या वडिलांना आपल्या मुलीने व्यायाम वगैरे करावा हे बिलकुल पसंत नव्हते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पण २०१४ साली WBPF वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये मेडल जिंकून याचं श्वेता राठोडने या स्पर्धेमध्ये मेडल जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेचा मान मिळवला आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले.

 

shweta rathore InMarathi

 

करूणा वाघमारे

एखादी मराठमोळी तरुणी या यादीमध्ये पाहायला मिळेल याची अनेकांनी कल्पना देखील केली नसेल. Miss India Fitness Physique २०१२ या पुरस्कार पटकावणारी करूणा वाघमारे एक योगा एक्सपर्ट आणि जिमनॅस्ट देखील आहे. गेल्या १७ वर्षांपासून त्या ट्रेनिंग करतायत.

karuna waghmare InMarathi

 

दीपिका चौधरी

Battle Of The Beach हा प्रतिष्ठीत पुरस्कार जिंकून दीपिका चौधरी यांनी देशाचे नाव जगभरात उज्ज्वल केले होते. इतकेच नाही तर त्या एक Virologist देखील आहेत.

 

deepika chowdhury InMarathi

 

 

किरण देंबला

किरण देंबला या प्रसिद्ध बॉलीवूड फिटनेस ट्रेनर आहेत. अनुष्का शर्मा पासून तमन्ना भाटीया पर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना त्यांनी ट्रेनिंग दिलेले आहे.

 

kiran-dembla-InMarathi

 

युरोपा भौमिक

नाव जरी विदेशी वाटत असलं तरी त्या भारतीय आहेत बरं का! Mr. & Miss India २०१६ मध्ये ब्रोन्झ मेडल जिंकून त्यांनी आपले कर्तुत्व सिद्ध करून दाखवले आहे. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे वय अवघे १८ वर्षे आहे.

 

europa bhowmik InMarathi

 

अश्विनी वास्कर

अश्विनी वास्कर यांनी वजन कमी करण्याच्या उद्देशाने जिम सुरु केली आणी पुढे त्याच जिमने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.

अश्विनी वास्कर या भारताच्या पहिल्या Competitive बॉडीबिल्डर आहेत.

 

ashwini waskar InMarathi

 

 

बानी जे

यांना तुम्ही एमटीव्ही रोडीज वर बऱ्याच वेळा पाहिलं असेल. त्यांच खरं नाव आहे गुर्बानी जज. पण त्यांनी स्वत:ला बानी जे हे खास नाव दिलं आहे. एमटीव्ही रोडीजच्या चौथ्या सीजनच्या विनर होत्या. बानी जे एक अभिनेत्री, अँकर आणि प्रोफेशनल बॉडीबिल्डर आहेत.

bani j InMarathi

 

 

नारीचे शक्तीचे आणि सामर्थ्याचे रूप म्हणजे या आठजणी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?