' फळे आरोग्यासाठी हितकारकच, ती खाताना हे नियम पाळलेच पाहिजेत ! – InMarathi

फळे आरोग्यासाठी हितकारकच, ती खाताना हे नियम पाळलेच पाहिजेत !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या निसर्गाने आपल्याला अनेक प्रकारच्या फळांचा एक अनोखा नजराणा दिला आहे. विविध फळांमध्ये विविध प्रकारची उपयुक्त अशी पोषकतत्वे भरलेली आहेत. जर यांचे योग्य प्रमाणात आणि नियमितपणे सेवन केले, तर आरोग्यच नाही, तर सौंदर्यवर्धन होण्यास देखील मदत होते.

रोज फळे खाताना आवडणारी फळे तर खावीच तसेच एकाच प्रकारची फळे न खाता मोसमी देखील खावी. त्यामुळे प्रत्येकात असलेले वेगवेगळे पोषकतत्व आपल्याला मिळतात.

 

fruits-marathipizza02
doctorplusblog.wordpress.com

फळे खाण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे गरजेचे असते. आपल्याकडे प्रत्येक ऋतूमध्ये येणारी सगळी फळे आपण खायला हवीत.

तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण साधारणपणे दिवसातून तीन वेळा जेवण घेतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण. या व्यतिरिक्त मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत. पण मग ती कधी खावीत?

तर जेव्हा तुमचे पोट रिकामे असेल तेव्हा फलाहार घ्यायला हवा.

असेच काही आणखी महत्वाचे फळांसंबंधीचे नियम आपण आज जाणून घेणार आहोत. ज्यामुळे फलाहार कधी आणि कसा घ्यावा ह्याबाबत तुम्हाला माहिती होईल.

१. संत्री ही सकाळी किंवा रात्रीच्या वेळी खाऊ नये. जेवण करायच्या १ तासाधी किंवा नंतर संत्री खावी. जेवणाआधी संत्री खाल्ल्याने भूक वाढते तर जेवण झाल्यानंतर खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते.

orange juice inmarathi
healthline.com

२. मोसंबी ह्या फळाचे सेवन दुपारी करावे. उन्हात जायच्या काही वेळा आधी किंवा उन्हातून आल्यावर मोसंबीचा रस पिणे खूप फायद्याचे असते. ह्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही.

 

fruits-marathipizza01
india.com

३. द्राक्ष ह्या फळाचा रस देखील शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी उपयोगी ठरतो. याचे सेवन उन्हात जाण्याआधी किंवा उन्हातून आल्यावर करावे.

cancer-grapes-inmarathi
goodhousekeeping.com

पण द्राक्ष आणि जेवण ह्यात काही वेळाचा अवधी हा ठेवावाच.

४. नारळ पाणी हे तर कधीही पिले जाऊ शकते. ज्यांना पोटा संबंधी काही समस्या असतील जसे की, अॅसिडिटी किंवा अल्सर, त्यांच्यासाठी नारळपाणी अत्यंत लाभकारक असतं.

sara ali khan coconut water inmarathi
timesofindia.indiatimes.com

पण तरी नारळ पाणी हे रिकाम्या पोटात घेऊ नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

५. आंबा हा गरम असतो. त्यामुळे आंब्यासोबत दुधाचे सेवन करावे. जर तुम्ही आंबा कापून खात आहात तर आंब्याच्या कापांमध्ये थोडी साखर आणि दुध मिसळून पिणे फायद्याचं ठरेल.

 

 

फळांचा राजा आंबा असला तरी सर्व फळांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. फलाहार हा हलका आणि पोषक आहार आहे. त्याने सुदृढ आयुष्य लाभते.

फळे खाण्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल आणि आरोग्य उत्तम राहते. सगळ्या प्रकारची फळे खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असलेली साखर नैसर्गिक घटकांमधून मिळते.

सध्याच्या लाईफस्टाईलमुळे मधुमेह, हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी हलका आहार म्हणूनही आपण फलाहाराला प्राधान्य देऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?