आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दिवाळीत अनेक घरांत लक्ष्मी पूजनाच्या रात्री पत्ते खेळण्याची प्रथा आहे. या एका दिवशी अधिकृतरित्या घराघरात जुगार खेळला जातो. मात्र कधी हे पत्ते खेळताना तुम्ही निरखून पाहिलं असेल, तर पत्त्यांमधल्या बदाम राजाला मिशी नसते. इतर तीन राजांना लफ्फेदार मिशी असताना एकटा बदाम राजा बिनमिशीचा का बरं?
मिशा हे मर्दानी सौंदर्याचं प्रतिक मानलं जातं. हेच मर्दानी सौंदर्याचं प्रतिक पत्त्यांमधले राजेही दिमाखात मिरवताना दिसतात. ५२ पत्त्यांच्या एका संचाला डेक म्हणलं जातं. यात चार राजे असतात पैकी किलवर, चौकट, इस्पिक हे राजे मिशी असणारे तर एकटा बदाम राजा बिन मिशीचा क्लिन शेव्ह असणारा असल्याचं दिसतं. हा एकच राजा बिन मिशीचा का ठेवला असावा?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा
बदाम राजाला मिशी का नाही?
या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी पत्त्यांच्या इतिहासात थोडं डोकावून बघू. हा पत्त्यांचा खेळ खूप जुना आहे. १६ व्या शतकात या खेळाला सुर सुरुवात झाल्याच्या नोंदी आहेत. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात या डेकला रिडिझाईन केलं गेलं. मात्र गंमतीची गोष्ट अशी, की आधीही बदाम राजाला मिशी नव्हती आणि रिडिझाईन केल्यावरही नव्हती.
यात जी चिन्हं वापरली गेली आहेत, ज्यांना मराठीत बदाम, चौकट, इस्पिक आणि किलवर म्हटलं गेलंय, त्यांचा शोध एका फ्रेंच व्यक्तीने सर्वप्रथम लावला. यामुळेच राजा, राणी आणि जोकर किंवा गुलाम ही पत्त्यांतली चित्रं पाहिली तर लक्षात येईल, की यांची चेहरेपट्टी ट्यूडर राज्यकर्त्यांच्या वेषभूषेशी मेळ खाणारी आहे.
–
- टॅरो कार्ड्सची दुनिया आणि त्यातील महिलांच्या वर्चस्वाचं रंजक कारण..
- जगात सर्वांच्या बुद्धीचा कस लावणारं ‘बुद्धिबळ’ भारतात कसं जन्मलं याची रोचक कहाणी!
–
८ व्या शतकात पत्त्यांचं रिडिझाईन केलं गेलं मात्र हा तोंडावळा कायम ठेवला गेला. यातले सर्व राजे, राण्या आणि गुलाम हे विविध राजांवरून घेतले गेले आहेत. म्हणूनच वरवर बघता हा बैठ्या मनोरंजनाचा खेळ वाटला, तरीही तो राजकीय पट रंगविणारा खेळ आहे.
इस्पिक राजा (किंग ऑफ स्पेड्स) – प्राचीन इस्त्रायलचा किंग डेव्हिड
किल्वर राजा (किंग ऑफ क्लब) – मेसाडोनियाचा महान किंग सिकंदर
चौकट राजा (किंग ऑफ डायमंड) – रोमन राजा किंग सीजर ऑगस्टस
बदाम राजा (किंग ऑफ हार्ट) – फ्रान्सचा राजा किंग शारलेमेन, हा रोमन साम्राज्याचा पहिला राजा मानला जातो.
असं म्हटलं जातं, की जेव्हा पत्त्यांचं डिझाईन केलं गेलं तेव्हा चित्रकार चुकून बदाम राजाला मिशा काढायच्या विसरून गेला आणि नंतर तीच प्रथा पाळली गेली.
याविषयी सांगितली जाणारी दुसरी कथा मात्र अधिक रोचक आहे. या कथेनुसार बदाम राजा हा किंग शारलेमेनवरून चितारला गेला. हा राजा दिलदारपणासाठी आणि त्याच्या देखणेपणासाठी प्रसिध्द होता. इतरांहून आपण वेळे दिसायाला हवे या विचारातून या राजाने स्वत:च्या मिशा छाटून टाकल्या होत्या.
त्याकाळात बिनमिशीचा पुरुष अपवादाने असे. उलट दाढी मिशांचं जंगल असणारे पुरुषी चेहरे सर्वत्र दिसत. किंग शारलेमेननं मिशा काढून चेहरा स्वच्छ केला आणि त्याच्या देखणेपणात भर पडली. म्हणूनच या देखण्या आणि लोकप्रिय राजाच्या आठवणीत बदाम राजा बनविला गेला.
बदाम हे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं आणि अशा प्रेमरंगाचा राजा असणार्या शारलेमेनची आठवण बदाम राजाच्या रुपात चिरतरूण ठेवली गेली.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.