Site icon InMarathi

तुमची-आमची दिवाळी साजरी करायची पद्धत या ५ प्रकारात मोडते का? कमेंटमध्ये जरूर कळवा

diwali celebration inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यंदाची दिवाळी ही सगळ्यांसाठीच खास आहे, कारण कोरोना महामारीनंतर हा असा पहिला सण असेल जो देशभरात धूमधडाक्यात साजरा होणार आहे. गेल्या वर्षी कोणालाच कोणताही सण साजरा करायला न मिळाल्याने या वर्षी दुप्पट उत्साहाने आणि आनंदाने उत्सव साजरा होणार आहे.

त्यातून दिवाळी हा असा सण आहे ज्यात कोणतंही सामाजिक, जातीय अंतर नसतं. सरसकट सगळेच दिवाळी एकत्र येऊन धूमधडाक्यात साजरी करतात.

सगळीकडे झालेली रोषणाई, रांगोळी, आरास, फटाके, किल्ले, नवनव्या कपड्यांची उत्सुकता, फराळ, दिवाळी गिफ्ट्स किंवा बोनस अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी सगळेच खूप उत्सुक असतात.

 

 

तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी दिवाळी म्हणजे नेमकं काय? आणि आपण कोणत्या प्रकारे दिवाळी साजरी करणं पसंत करतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

१. फराळ – घरचा का विकत आणलेला?

दिवाळीमध्ये जसं फटाक्यांचं सगळ्यांनाच आकर्षण असतं, तसंच किंबहुना तितकंच आकर्षण फराळाचं असतं. फराळ बनवण्यात मदत असो किंवा नसो फराळ संपवण्यात सगळेच अग्रेसर असतात.

सध्या घरातली बरीच लोकं नोकरदार वर्गात मोडणारी असल्याने घरात सरसकट सगळा फराळ करणं शक्य नसतं, त्यामुळे थोडा फराळ घरी केला जातो आणि काही पदार्थ विकत आणणं जास्त सोयीचं पडतं.

 

यापैकी तुम्हाला कोणता फराळ सर्वाधिक आवडतो, घरगुती फराळ की बाहेरून पॅक करून आणलेला फराळ?

२. फटाके फोडता का?

लहान असो किंवा वृद्ध, दिवाळीत प्रत्येकालाच फटाके फोडण्याचा मोह होतो, साधी फुलबाजी तरी लावावी असं प्रत्येकाला वाटतंच. सध्या फटक्यांनी होणारे प्रदूषण यामुळे समाजात चांगलीच जागृती झाली असून त्यात बदलसुद्धा होत आहे.

तरी तुम्ही फटाके फोडणं पसंत करता का?

 

opindia.com

३. शॉपिंग कुठून करता?

कोरोना महामारीने सगळ्यांनाच स्वदेशीचा धडा दिला आणि या लॉकडाऊनमुळे स्थानिक उद्योगांना चांगलाच फटका बसला त्यामुळे यंदा सगळीकडेच लोकल दुकानातूनच खरेदी करा असा मेसेज दिला जातोय.

कारण स्थानिक उद्योग टिकले तरच भारताची अर्थव्यवस्था टिकून राहील, तर तुम्ही दिवाळीचं शॉपिंग कुठून केलं आहे, ब्रॅंडेड दुकानातून की स्थानिक दुकानातून?

 

४. किल्ला स्वतः करता का तयार मॉडेल आणता?

दिवाळीत सर्वात जास्त आकर्षण असते ते किल्ल्यांचे लहान तसेच मोठे मंडळी किल्ला करण्यासाठी कित्येक रात्रं जागतात, किल्ले बांधणी स्पर्धेत भाग घेतात.

तुम्ही किल्ला बनवताना स्वतः सगळं तयार करता की फक्त तयार मॉडेल आणून किल्ला बनवता?

 

५. सजावट घरीच करता का?

दिवाळीत सगळ्यांच्या घराबाहेर, बाल्कनीत किंवा खिडकीत तुम्हाला आकर्षक कंदील दिसतात, रंगीबेरंगी लाईट्सच्या माळा दिसतात, वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या दिसतात, एकंदरच सगळं वातावरण प्रसन्न असतं.

ही वातावरणनिर्मिती म्हणजे कंदील किंवा आरास तुम्ही घरी करता की सजावटीच्या वस्तु बाहेरून विकत आणून सजावट करता?

 

parenting.firstcry.com

 

६. सकाळी अभ्यंगस्नानासाठी लवकर उठता का?

लहानपणी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून ओवाळून, अंगाला सुवासिक तेल लावून, उटणं लावून आई आंघोळ घालायची आणि मगच फटाके फोडायला बाहेर जायला परवानगी असायची.

आताही तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान वगैरे करता की नेहमीसारखीच सुट्टीसारखं दिवाळीचा पहिला दिवस घालवता?

 

 

यापैकी कीती गोष्टी तुम्ही आधीसारख्या पारंपरिक पद्धतीने करता आणि कीती गोष्टींमध्ये फरक पडला आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा, आणि तुम्हा सगळ्यांना इनमराठी टीमतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version