लग्नसराईसाठी मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सणवार आले, की आजही महिला वर्गाची मुख्य समस्या म्हणजे पाळी. पूजा, सण असताना पाळी येणं हा टॅबू आजही महिला वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. या टॅबूपायी पाळी अलिकडे आणण्यासाठी किंवा लांबविण्यासाठी सोपा उपाय म्हणून गोळ्या घेतल्या जातात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
पाळीची तारीख बदलत असली तरीही या गोळ्य़ांचे दुष्परिणाम मात्र लक्षात घेतले जात नाहीत. इथून पुढे पाळीसाठी गोळी घेताना या गोष्टींचा विचार जरूर करा.
लग्न, गौरी गणपती, नवरात्र, घरात असणार्या पूजा, दिवाळी, सुट्टीसाठी फिरायला जाणं किंवा अगदी लग्नाची तारिख ठरवणं असो बायकांच्या बाबतीत नेमहीच उदभवणारा प्रश्न म्हणजे पाळी. या पाळीच्या तारखा जर सणांच्या येत असतील महिला वर्ग कायम चिंतेत असतो.
या दिवसांत पाळी येऊ नये म्हणून मैत्रिणी, घरातल्या प्रौढ स्त्रिया यांच्या सल्ल्याने हर तर्हेचे प्रयत्न केले जातात. मग ते उष्णता वाढविणारे पपईसारखी फळं पदार्थ खाणं असो की डोक्यावरून अंघोळ करणं असो. यामुळे कधी पाळी येतेही मात्र बरेचदा हे प्रयत्न फसतात.
अशावेळेस काहीजणी होईल ते होईल म्हणून गप्प बसतात, तर काहीजणी मात्र मेडिकलमधे सहजी उपलब्ध असणाऱ्या गोळ्या घेतात. यामुळे पाळीची तारीख बदलता येणं “सहज शक्य” असल्यानं त्या घेतल्या जातात.
या औषधांना OTC औषधं म्हणलं जातं. वरवर बघता अगदी सोपा वाटणारा हा उपाय प्रत्यक्षात मात्र काही गंभीर परिणाम करणारा असतो. म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही पाळीसाठी गोळी घ्याल, तेव्हा एकदा नाही दहादा विचार करा आणि शक्यतो गोळी घेणं टाळा.
काहीजणी अशा प्रकारे पाळी लांबविण्यासाठी वारंवार गोळ्या घेतात आणि मग याचे दीर्घकालीन परिणाम दिसू लागतात. सगळ्यात आधी लक्षात घ्या, पाळी हा एक निसर्गचक्राचा भाग आहे.
—
- मासिक पाळीत काय करावे आणि काय टाळावे, प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाचे “५” मुद्दे!
- मासिक पाळी बंद होताना नेमकं काय होतं हे समजून घेतल्यास हा काळ सुसह्य होईल
—
विशिष्ट दिवसांनंतर होणारा रक्तस्त्राव हा अडचण नसून तुम्ही शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्याचं ते लक्षण आहे. प्रजनन क्रियेतील तो महत्वाचा भाग आहे. सुरळीत आणि अव्याहत चालणारं हे नैसर्गिक चक्र अनैसर्गिकरित्या मागे- पुढे केलं तर त्याचे दुष्पपरिणाम नक्कीच दिसणार.
ज्या महिलांना अद्याप गर्भधारणा झालेली नाही त्या जर वारंवार या गोळ्या घेत असतील, तर त्यांना गर्भधारणेत समस्या येऊ शकतात, कारण तुमचं शरीर गोंधळात पडलेलं असतं.
गोळ्या घेऊन तुम्ही त्याचं चक्र खंडित केल्यानं त्याचं तंत्र बिघडलेलं असतं. यातूनच पुढे व्यंधत्वासारख्या गंभीर समस्याही उदभवू शकतात.
मुलं झाल्यानंतर गोळ्या घ्यायला हरकत नाही असं जर तुम्ही समजत असाल तर तेही चुकच आहे. कारण मुलं झाली तरीही विशिष्ट वयापर्यंत हे चक्र नैसर्गिकरित्या ठरलेल्या क्रमानं चालू असतं आणि त्यात अडथळा आणणं म्हणजे आरोग्य समस्यांना आपणहोऊन आमंत्रण देणं आहे.
गोळ्यांच्या सेवनानं चक्र बिघडतं आणि मग पुढेही दीर्घ काळ पाळी अनियमित होण्याच्या शक्यता असतात. वारंवार अशाप्रकारे गोळ्यांचं सेवन केल्यानं DVT म्हणजेच डीप व्हेन थ्रॉम्बोसिसचा धोका निर्माअ होऊ शकतो.
यामधे रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. यातून मेंदू किंवा ह्रदयाला गंभीर इजा पोहोचून मृत्यू होण्याचीही शक्यता असते.
काहीजणींना नंतरच्या महिन्यांत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो आणि यानं अशक्तपणा येतो. कधी कधी या गोळ्यांच्या सेवनामुळे डायरिया, पोटात दुखणं अशा समस्या उदभवू शकतात. म्हणूनच पाळी लांबविण्याची गोळी घेणं खरंतर टाळायला हवं.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.