' नेट झीरो – कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोदींनी आखलेली योजना! – InMarathi

नेट झीरो – कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोदींनी आखलेली योजना!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागच्या वर्षीपासून जगाला एक समस्येने ग्रासले होते ते म्हणजे कोरोना, जगभरात या साथीच्या आजाराने थैमान घातले होते. आज पुन्हा एकदा जगावर तिसऱ्या लाटेचे सावट आहे. ज्या देशातून हा आजार पसरला त्या चीनमध्ये सुद्धा पुन्हा एकदा लॉकडाऊन लागले आहे.

कोरोनाच संकट तर आहेच मात्र गेल्या काही वर्षांपासून जगाला एक समस्या उद्भवत आहे ती म्हणजे प्रदूषण, आज प्रत्येक देशात वाढते आद्योगिकरण, वाढती जंगलतोड यामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन इतर घटक विषारी वायूंचे प्रमाण वाढत आहे.

 

pollution inmarathi

 

नुकतंच मोदींनी संयुक्त राष्ट्र जलवायू परिवर्तन संमेलन ज्याला COP 26 (UNFCC) असेही म्हणतात या संमेलनात ते म्हणाले की भारताचं २०७० पर्यंत नेट झिरो करण्याचे लक्ष आहे. या संमेलनात जगभरातील अनेक नेते मंडळी सामील होतात. या संमेलनात मुख्य मुद्दा असतो तो म्हणजे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करावे.

 

cop 27 inmarathi

 

याच जलवायू आंदोलनातील कार्यकर्त्यांची मागणी आहे की येत्या २०३०, २०५०  पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो करावे अशी मागणी केली जात आहे, मात्र विकसनशील देशांनी आपले लक्ष २०६०,७० पर्यंत केले आहे. आता ही नेमकी नेट झिरोची भानगड आहे तरी काय? चला तर मग जाणून घेऊयात…

नेमकं आहे काय नेट झिरो?

नेट झेरॉ म्हणजे थोडक्यात हवेतील कार्बनचे उत्सर्जन कमी करून ते शून्यावर आणण, देशाने उत्पादित केलेले कार्बन डायॉक्साईड, हरितवायू प्रगत तंत्रज्ञानाच्या आधार शोषले जाऊ शकतात. कार्बन डायऑक्सिइड हा असा एकमेव वायू जो वातावरणातून सहज काढला जाऊ शकतो.

 

net zero 2 inmarathi

 

आज प्रत्येक देशाची ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी कार्बन डायऑक्सिइडचे, हरित गृह वायूंचे प्रमाण कमी करून पृथिवीवरील वाढत्या तापमान करावे.

नेट झिरो इतके महत्वाचे का?

कुठले ही निष्कर्ष काढले जातात तेव्हा त्यामागे अभ्यासकांचा, शास्त्रज्ञाच्या अभ्यास असतो. शास्त्रज्ञांच्या मते जगातील कार्बन उत्सर्जन हे २०३० निम्मे होणे आणि २०५० पर्यंत संपूर्णपणे नेट झिरो होणे आवश्यक आहे, बहुतांश देशांनी २०५० पर्यंत आपले लक्ष केले आहे तर चीन भारत सारख्या विकसनशील देशांनी २०७० आपले लक्ष ठेवले आहे.

 

cop 26 inmarathi
city wire selector

 

तज्ञांच्या मते, नेट झिरोचे लक्ष साध्य करणे गरजेचे आहे कारण ग्लोबल वार्मिंग सारखी मोठी समस्या यासाठी कमी करणे हे महत्वाचे आहे.

नेट झिरोचे लक्ष साध्य करता येईल?

साहजिकच शास्त्रज्ञानांनी जसे यावर संशोधन केले आहे तर नक्कीच यावर उपाययोजना देखील सांगितल्या असणार, नेट झिरो साध्य करायचे असेल तर त्यासाठी दोन मूलभूत पायऱ्या आहेत :

 

net zero inmarathi

 

१. औद्योगिक प्रक्रिया, वीज निर्मिती, वाहतूक, यासारख्या गोष्टींमधून आपण जे वातावरणात कार्बनचे प्रमाण उत्सर्जित करत आहोत, ते प्रमाण आपण तातडीने कमी केले पाहिजे.

२. वातावरणातून हरित गृह वायूचे प्रमाण कमी करणे, उदा. एखाद्या औद्योगिक वसाहतीतून जर मोठ्या प्रमाणावर कार्बनचे मोठ्या उत्सर्जित होत असेल तर त्यावर प्रक्रिया करावी किंवा वसाहतीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडे लावावीत.

ग्लोबल नेट झिरो म्हणजे काय?

 

global inmarathi
informa markets

 

ग्लोबल नेट झिरो ही संकल्पना यांच वर्षी मांडण्यात आली आहे. याची संकल्पना अशी आहे की, विकसित देशांनी भूतकाळात जी काही प्रगती केली आहे म्हणून त्यांना आज विकसित देश म्हणून ओळखले जातात, तर अशा देशांनी विकसनशील देशांपेक्षा कार्बन उत्सर्जित कमी करण्याचा भार जास्त उचलला पाहिजे.

नेट झिरोचे लक्ष विकसित देश तर नक्कीच साध्य करतीलच मात्र आपल्यासारखे विकसनशील देश देखील २०५० पर्यंत नेट झिरोचे लक्ष साध्य करतील अशी आशा नक्कीच करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?