Site icon InMarathi

हिंदूंना फुकटात राममंदिराचे दर्शन तर मुस्लिमांना अजमेर : AAP ची नवी धार्मिक खेळी

aap inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बंगाल निवडणुकांचा धुराळा उडाला, तृणमूल पक्षाने मोठ्या प्रमाणावर जरी विजय मिळवला असला तरी जिथे भाजपचे उमेदवार निवडून हि येत नसायचे तिथे भाजपने ८० पर्यंत मजल मारली. तृणमूल पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जीना देखील चांगलंच धक्का बसला होता.

आज हाच तृणमुल पक्ष गोव्याच्या निवडणुकांमध्ये उतरत आहे, आधीच सत्तेत असलेल्या भाजपला आव्हान देण्यासाठी आणि येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी तृणमूल पक्ष बळकट होण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

तृणमुलने आपले हातपाय पसरवायला आधीच सुरवात केली आहे त्यातच आता अरविंद केरजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने या निवडणुकांमध्ये उडी घेतली आहे. अरविंद केरजिरवाल यांनी गोवेकरांसाठी निवडणुकींच्या निमित्ताने काही आश्वासने दिली आहेत. अरविंद यांनी दिलेली आश्वासनांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत ..नेमकं काय म्हणले म्हणाले

 

 

गोव्यात पत्रकारांशी बोलताना अरविंद केजरीवाल असं म्हणाले की, आप जर सत्तेत आले तर आम्ही हिंदूंसाठी अयोध्या दर्शन आयोजित करून देऊ तेही फुकटात तसेच मुस्लिम बांधवांसाठी अजमेर तर ख्रिश्चन बांधवांसाठी वेलकानी येथे नेणार. तसेच जे लोक साईभक्त आहेत त्यांच्यासाठी मोफत शिर्डी दर्शन आयोजित करू. यासाठी लागणारा निधी  कमी पडणार नाही असेही आश्वासन दिले आहे.

 

धार्मिक मुद्द्याला जसा त्यांनी हात घातला तसेच बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ, तसेच नागरिकांची विजेची मागणी पुरी करू अशी आश्वसनें देखील दिली आहेत.  भ्रष्टाचाऱ्याचा मुद्दयांवर बोलताना ते असे म्हणाले की, सत्यपाल मलिक यांनी मला गोव्यातील सरकारमध्ये असलेल्या भ्रष्टाचारबद्दल सांगितले आहे.

 

 

आता अशी आश्वासने दिल्यावर अनेकांना धक्का बसू शकतो कारण जो पक्ष धर्मनिरेपक्ष, भ्रष्टाचारमुक्त अशा विचारसरणींचा आहे त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अशी आश्वासने देणे म्हणजे धार्मिक मुद्द्याला हात घालण्यासारखे आहे. २०१७ च्या निवडुकांमध्ये आप पक्षाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांच्या पक्षाचे डिपॉजीस्ट जप्त झाले होते.

 

telegraph.com

आज २०२४ च्या निडवणुकांसाठी सगळेच पक्ष आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ममता दीदींनी देखील गोव्यात आल्या आल्या मंगेशीचे दर्शन घेतले होते. इकडे भाजपने देवेन्द्र फडणवीस यांच्यावर निवडणुकांची जबाबदारी दिली आहे. अमित शहा, देवेन्द्र फडणवीस यांनी गोव्यात येऊन जोरदार भाषण केले होते.

काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली ज्यात त्यांनी एक कार्यकर्त्याच्या बाईकवरून प्रवास करून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे झाले मोठ्या पक्षांचे, गोमंतक पार्टी, गोवा सुरक्षा मंच, गोवा प्रजा पार्टी सारखे प्रादेशिक पक्ष देखील या निवडणुकांच्या रणधुमाळीत आहेतच.

 

उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात काँग्रेस आपले हातपाय पसरत आहे तर बाकीचे सगळे पक्ष गोव्याच्या निवडणुकांसाठी आपली जय्यत तयारी करत आहेत. येत्या काही दिवसात आणखीन काही राजकीय घडामोडी घडतीलच, सर्वसामान्य गोवेकर मात्र कोणाला बहुमत देतील हे निवडणुकांनंतर कळेलच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version