' फक्त दूधच नाही, तर दुधावरची साय सुद्धा आहे त्वचेसाठी वरदान… – InMarathi

फक्त दूधच नाही, तर दुधावरची साय सुद्धा आहे त्वचेसाठी वरदान…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दूध हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त, तसेच गरजेचे आहे. दूध हे पूर्ण अन्न मानले जाते. पण फक्त दूधच नाही तर दुधापासून तयार झालेले सर्वच पदार्थ अतिशय चवदार आणि उपयुक्त ठरणारे आहेत.

साय, दही, ताक, लोणी असे सगळे दुधापासून तयार होणारे पदार्थ आहेत, जे प्रत्येकालाच आवडतात आणि फायदेशीर ठरतात.

दूध गरम केल्यानंतर दुधावर येणारा जाडसर, मऊ आणि पांढराशुभ्र पदार्थ म्हणजे साय. यालाच बरेच जण मलई असंही म्हणतात. खूप लोकांना साय आवडत असूनही वजन वाढण्याचा भीतीपोटी साय खाणे टाळले जाते.

 

milk inmarathi

 

साय ही सुंदरता वाढण्यास मदत करते, ते ही घरगुती वस्तूंचा वापर करून असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही नक्कीच सायीचा वापर कराल.

सुंदर दिसायला कोणाला आवडणार नाही? आजकाल स्त्रियाच नाही तर पुरुष सुद्धा आपल्या सौंदर्याची काळजी घेताना, जागरूक होताना दिसून येत आहेत.

साय नैसर्गिक असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर होत नाहीत. अनेक प्रकारच्या ब्युटी टिप्समध्ये सायीचा वापर आवर्जून करायला सांगितला जातो.

फक्त साय आपल्या चेहऱ्यावर लावली तरी त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात, तसेच आपण लिंबाचा रस, मध, गुलाब पाणी, हळद, दालचिनी घालूनही त्याचा वापर करू शकतो.

 

lemon juice inmarathi

 

१. सुरकुत्या कमी करण्यासाठी

रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, त्यामुळे आपले सौंदर्य कमी होते अशा वेळी सायीचा वापर आपण फेसपॅक किंवा स्क्रब म्हणून करू शकतो.

सायीमध्ये प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने आणि व्हिटॅमिनचा समावेश असतो, जे आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या रोखतात.

 

milk cream facepack inmarathi

 

२. काळे डाग दूर करण्यासाठी

ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात अशा लोकांसाठी साय एक वरदानच म्हणायला हवे. साईमधे असणारे लॅक्टिक असिड काळे डाग दूर करण्यास मदत करते.

साय आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन पेशी सक्रिय होतात ज्यामुळे काळे डाग निघून जाण्यास मदत होते.

 

milk cream and lemon juice inmarathi

 

३. त्वचेचा रंग उजळतो

सायीमध्ये अनेक पोषक घटक असतात व्हिटॅमिन, प्रथिने, लॅक्टिक अॅसिड जे आपल्या चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होते.

 

glowing skin inmarathi

 

४. उत्तम मॉइश्चरायझर

वाढत्या उन्हामुळे, प्रदूषणामुळे चेहऱ्यावर आलेला कोरडेपणा कमी करण्यास साय मदत करते. साय ही त्वचेला नैसर्गिक रीतीने मऊ आणि चमकदार बनवते.

मॉइश्चरायझर म्हणजे त्वचेवरील कोरडेपणा कमी करण्यासाठी वापरले जाणारे क्रीम… सायीचा वापरही मॉइश्चरायझर म्हणून करता येतो, अत्यंत साध्या पद्धतीने.

एक चमचा ताजी साय वाटीत घेऊन चमच्याने किंवा हाताने त्याची मऊ पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर हळुवार लावून, थोड्या वेळाने थंड पाण्याने धुवून टाका, त्यामुळे चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी होईल.

 

dry skin inmarathi

 

५. नैसर्गिक चमक (ग्लो)

साय अत्यंत गुणकारी आहे,त्यामध्ये थोडा मध टाकून चेहऱ्यावर लावल्याने वेगळीच चमक येते. याचा लेप आठवड्यातून २-३ वेळा तरी लावावा.

तर अशा प्रकारे साय खाण्याचेच नाही तर चेहऱ्यावर लावण्याचे खूप फायदे आहेत. साय ही आपल्यासाठी ब्युटी प्रोडक्ट आहे, असं म्हणायला हरकत नाही.

 

milk cream facepack inmarathi

 

ज्यांना पार्लरचा खर्च परवडत नाही अशा लोकांसाठी साय हे सुंदर दिसण्यासाठी वरदानच ठरले आहे. नेहमीच सगळ्यांच्या घरात असलेल्या पदार्थांचा वापर करून आपण खूप सुंदर दिसू शकतो. हो ना? चला तर मग सुंदर दिसुया.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?