Site icon InMarathi

जगातील ७ विचित्र पण तितक्याच आकर्षक बिल्डींग्स; बघा स्थापत्यशास्त्राचा चमत्कार!

Ren building China IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हल्लीचं जग हे आश्चर्यांनी भरलेलं आहे. जगातील ७ आश्चर्य सोडली, तरी इतर अनेक आश्चर्य आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. या आश्चर्यांमध्ये स्थापत्य शास्त्रामधील उत्तम नमुने आणि कलाकारी यांचा समावेश होतो.

अशीच काही आश्चर्य जगात आहेत. काही अशा इमारती, ज्यांच्याकडे पाहिलं की सगळ्यात पहिल्यांदा हाच प्रश्न मनात यावा, की ही अशी इमारत नक्की कशी उभी असेल? नक्की कशी उभारली गेली असेल. अशाच काही इमारतींविषयी आज जाणून घेऊयात…

१. द दुबई फ्रेम

दुबई फ्रेम ही जगातील सगळ्यात मोठी फ्रेम मानली जाते. तब्बल १५० मित्र उंच आणि १०५ मीटर लांब असणारी ही फ्रेम दिसायला फारच छान आहे.

 

 

दुबई शहराचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य दाखवणाऱ्या वेगवेगळ्या स्मारकांना एकत्रितपणे दाखवण्याचं काम ही फ्रेम करते.

२. रेन बिल्डिंग, चायना

शांघाय हाच मुळात एक चर्चेचा विषय आहे. असं असताना तिथे असणारी एखादी नयनरम्य बिल्डिंग ही चर्चेचा विषय ठरली नसती, तरच नवल! या बिल्डिंगकडे पाहताना, असं वाटतं की दोन नागमोडी इमारती एकमेकांमध्ये गुंतल्यासारख्या दिसतात. खालच्या बाजूला पाण्यात दिसणारं प्रतिबिंब खूपच छान दिसतं.

 

 

३. नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड – हैदराबाद

फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डच्या बिल्डिंगचा आकारच थेट माशासारखा आहे. २०१२ साली बांधण्यात आलेली ही इमारत ही बार्सिलोनामधील एका इमारतीवरून प्रेरित आहे.

 

४. क्यूब हाऊस, नेदरलँड्स

आर्किटेक्ट Piet Blom याने ही वेगळ्या आकाराची इमारत डिझाईन केली आहे. या इमारतीमधील घरं चक्क ४५ अंशात कललेली आहेत. वाटलक की नाही आश्चर्य… पण मंडळी हे खरं आहे. हा फोटो बघा, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल.

 

 

५. बास्केट बिल्डिंग, अमेरिका

अमेरिकेसारख्या देशात नेमकं काय काय पाहायला मिळेल, खरंच सांगता येत नाही. एखाद्या इमारतीला बास्केटचा आकार कोण देईल? पण अमेरिकन मंडळींनी हे करून दाखवलंय.

 

 

आगळंवेगळं रूप असणारी ही बास्केटच्या आकाराची इमारत म्हणजे लॉन्जबर्जर बास्केट कंपनीचे मुख्यालय आहे. बास्केट कंपनीने बास्केटच्या आकारची इमारत उभी करणं ही अनोखी शक्कल म्हणायला हवी.

६. सायबरटेक्चर एग ऑफिस बिल्डिंग, भारत

भारतात उभी असणारी ही आकर्षक इमारत एका हॉंगकॉंगच्या कंपनीने डिझाईन केली आहे. अप्रतिम स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून पर्यटक ही इमारत पाहायला आवर्जून जातात.

 

 

७. ऍटोमियम बेल्जीयम

१९५८ साली एका युद्धाच्या वेळी या इमारतीची निर्मिती करण्यात आली. स्टेनलेस स्टीलने बनलेले ९ गोल असणारा आकार इथे पाहायला मिळतो. यातील ६ मजल्यांवर जाण्याची परवानगी सामन्यांना सुद्धा आहे.

मुळात ही इमारत केवळ ६ महिन्यांकरता बांधली जाणार होती. मात्र, आता ही इमारत म्युझियम म्हणून वापरली जाते.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version