' भारतीय कलाकारांचा ट्विटर बहिष्कार?! अभिजितचं अकाऊंट बंद केल्यामुळे सोनू निगमने ट्विटर सोडलं! – InMarathi

भारतीय कलाकारांचा ट्विटर बहिष्कार?! अभिजितचं अकाऊंट बंद केल्यामुळे सोनू निगमने ट्विटर सोडलं!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतात सध्या सोशल मिडियावरून डावे आणि उजवे यांच्यामध्ये ट्रोलींग युद्ध बरंच रंगतंय. प्रश्न कधी सैन्याचा असतो, कधी काश्मीरचा तर कधी आणखी काही! फेसबुकवर वर ज्या प्राणप्रमाणे दोन्हीकडचे सैनिक आपआपली बाजू लढवत आहेत, त्याच प्राणपणाने ट्विटरवर या दोन्ही बाजूच्या सैनिकांचे प्रमुख पुढारी आपापली बाजू कधी मिश्कीलपणे, कधी दुसऱ्यांना टोमणे मारत, तर कधी सरळ सरळ आरोप प्रत्यारोप करून या युद्धाची रंगत अधिक वाढवत आहेत. म्हणजे दोन युद्धभूम्या सध्या शब्दांच्या माऱ्याने माखलेल्या आहेत, एक म्हणजे फेसबुक आणि दुसरी म्हणजे ट्विटर. फेसबुकवर तर सारे काही सध्या तरी सुरळीत आहे, पण ट्विटवर मात्र या ट्रोलींग युद्धाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या विचारांच्या लढाईमध्ये सहभागी झालेल्या काही भारतीय कलाकारांना आपले विचार ट्विटरवर मांडणे काहीसे महाग पडले आहे.

प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य तुम्हाला माहितच असतील, त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ट्रोलींग युद्धादरम्यान आपले विचार ठेवले आणि काल ट्विटरने थेट त्यांचं अकाऊंटचं सस्पेंड केलं. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या ट्वीट मध्ये काहीसा आक्षेपार्ह, महिलांचा अपमान करणारा सूर होता.

अभिजित भट्टाचार्य यांनी टार्गेट केलं होतं जेएनयुची विद्यार्थी आणि कार्यकर्ती सेहला रशीद हिला! कारण तिने हिंदुस्तान टाइम्स वर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या भाजपाच्या नेत्याचा संदर्भ देऊन भाजप सरकारवर आरोप केले होते.

तिला ट्रोल करताना अभिजित भट्टाचार्य यांनी सदर ट्वीट केलं

abhijeet tweet 01

 

आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी अजून एका महिला ट्विटर युजरला उत्तर देताना खालच्या दर्जाची भाषा वापरली, जेव्हा त्या महिला ट्विटर युजरने आक्षेपार्ह ट्वीट्स लिहिण्याबदल त्यांच्यावर टीका केली होती. तिला प्रत्युत्तर देताना अभिजित भट्टाचार्य यांनी हे ट्वीट केले होते की,

You Ms Pak. Tell me your cage no? Will reach there… Will do the favorite pose.

अभिजित हे कट्टर नरेंद्र मोदी समर्थक आणि देशभक्त म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळेच अश्या प्रकारच्या अनेक ट्वीट्स याआधीही त्यांच्या मार्फतअनेकदा केल्या गेल्या आहेत. तेव्हाही अभिजित भट्टाचार्य चर्चेत आले होते. पण यावेळेस मात्र सेहला रशीद हिच्यावर केलेल्या खालच्या दर्जाच्या ट्वीटमुळे ट्विटरने थेट अभिजित भट्टाचार्य यांचे ट्विटर अकाऊंटच सस्पेंड केले आहे.

ट्विटर अकाऊंटच सस्पेन्शनबद्दल अभिजित यांची प्रतिकिया अशी आहे की,

लेखिका अरुंधती रॉय आणि जेएनयु समर्थक गटाने कट करून माझं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करवलं आहे.

अभिजित भट्टाचार्य यांना सपोर्ट करण्यासाठी #IStandWithAbhijeet या नावाने त्यांच्या समर्थकांनी ट्विटर चळवळ उभी केली आणि काही तासातच हा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये आला होता.

केवळ अभिजित भट्टाचार्य हेच नाही तर त्यांच्याच उजचव्या गटाचे प्रसिद्ध अभिनेते परेश रावल हे देखील सध्या चर्चेत आहेत. लेखिका अरुंधती रॉय यांनी काश्मीरमधील भारतीय सैन्याच्या कारवाईविरोधात टिप्पणी केली होती. त्याला उत्तर म्हणून परेश रावल यांनी सदर ट्वीट केले होते.

paresh rawal tweet marathipizza

या ट्वीट विरोधात डाव्या गटाने मोहीम उघडली आणि परिणामी परेश रावल यांना आपले ट्वीट डिलीट करावे लागले.

परेश रावल यांना जबरदस्तीने ट्वीट डिलीट करण्यास भाग पाडल्यामुळे त्यांचे समर्थक आणि उजव्या गटाने याचा साफ निषेध केला आणि ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे म्हटले आहे.

या दोन्ही कारवायांविरोधात अजूनही ट्वीटरमार्फत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मध्यंतरी सोनू निगमने देखील अजान विरोधात ट्वीट केले होते. तेव्हा त्याला देखील प्रचंड मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता अभिजित भट्टाचार्य यांचे ट्वीटर अकाऊंट सस्पेन्ड झाल्याचे कळताच सोनू निगमने स्वत:हून शेवटचे २४ ट्वीट करून ट्वीटरला राम राम ठोकत असल्याची घोषणा केली आहे. असा निर्णय घेण्याचे कारण सांगताना तो म्हणतो की.

मी ना डाव्या गटातील आहे ना उजव्या गटातील आहे, मी सर्वांच्या मतांचा आदर करतो, पण ट्विटर मात्र हळूहळू बदलत चालले आहे. येथे राहायचे असल्यास तुम्हाला कोणत्या तरी एका गटाला फॉलो करावे लागते अन्यथा तुमचे इथे काही स्थान नाही.

sonu nigam tweets marathipizza

तर असा सगळा गदारोळ सुरु आहे ट्विटरवर! आता हे युद्ध लवकर थंड  होईल की याला अजून काही वेगळी कलाटणी मिळेल ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?