Site icon InMarathi

एक चूक ज्यामुळे सुनिल शेट्टीला पोलिसांनी आतंकवादी म्हणून पकडलं होतं

sunil shetty 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट


व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादा सेलिब्रिटीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते, कॅमेरे लखलखतात, सेल्फी काढायला फॅन्स धडपडतात. मग एखादा सेलिब्रिटी अचानक रस्त्यात दिसला तर मग प्रेक्षकांना होणारा आनंद शब्दात सांगणंही कठीण आहे. प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी सेलिब्रिटीही अनेकदा घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतात.

मात्र याच सेलिब्रिटींची एखादी चूकही त्यांना किती महागात पडू शकते याचीही अनेक उदाहरणे सापडतात. अशीच एक चूक अभिनेता सुनिल शेट्टी याच्या हातून घडली आणि त्यानंतर त्याच्यावर थेट आंतकवादी असल्याचा शिक्का बसला,

 

 

खरं तर दिलदार मनाचा, आपल्या मेहनतीने केवळ अभिनय क्षेत्रच नव्हे तर उद्योग क्षेत्रातही आपला ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे सुनिल शेट्टी! रांगडं व्यक्तीमत्व असलेला हा अभिनेता खरंतर हळवा, संवेदशील, कुटुंबवत्सल असा आहे, मग अशा माणसाला आतंकवादी का म्हटलं गेलं असेल? हा प्रश्न पडलाय ना? मग जाणून घ्या हा किस्सा…

१९९२ साली बलवान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सुनिल शेट्टीने एकाहून एक दमदार चित्रपट दिले. बोलण्याची खास लकब, पिळदार शरीरयष्टी, अॅक्शन असं सारंकाही असणा-या या हिरोने अनेक चित्रपट गाजवले. मात्र २००२ साली प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सुनिल शेट्टीला एका भयावह प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.

काय घडलं होतं?

२००२ साली संजय गुप्ता दिग्दर्शित कांटे या चित्रपटाचं शुटिंग सुरु होतं. सुनिल शेट्टीसह अमिताब बच्चन, संजय दत्त, अक्षय खन्ना अशी तगजडी स्टारकास्ट होती. ही सगळी मंडळी शुटिंगसाठी अमेरिकेला दाखल झाली.

चित्रपटात अभिनेता सुनिल शेट्टी ‘अण्णा’ ही बाउन्सरची भुमिका निभावत होते. मुळातच फिटनेसची आवड असलेले सुनिल शेट्टी कोणत्याही परिस्थितीत व्यायम चुकवत नसल्याने शुटिंगचे वेळापत्रक सांभाळून ते अमेरिकेतील एका जिममध्ये नित्यनियमाने व्यायाम करत होते.

 

 

एकदा त्यांनी आपला व्यायाम पुर्ण करताना त्यांना वेळेचे भान उरले नाही. तेवढ्यात त्यांना शुटिंगच्या सेटवरून फोन आला. सुनिल शेट्टी यांची सगळेजण वाट पहात असल्याचे कळताच त्यांनी तातडीने आवरायला सुरुवात केली.

जीम हे प्रत्यक्ष शुटिंग सेटपेक्षा दूर असल्याने तिथे पोहोचल्यानंतर मेकअप करण्यात वेळ घालवल्यास उशीर होईल असा विचार करत त्यांनी जीममध्येच शुटिंगचा पोषाख परिधान केला. यावेळी गरजेनुसार मेकअप करत ते जीममधून निघाले.

मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी इतका महागात पडेल याची त्यांना कल्पनाही नव्हती.

शुटिंग सेट नव्हे थेट पोलिस स्टेशन

अमेरिकेतील रस्त्यावरून शुटिंग सेटकडे निघालेल्या सुनिल शेट्टी यांना परदेशी नागरिकांनी ओळखले नाही, मात्र जवळच असलेल्या पोलिसांनी त्यांचा हा ‘अवतार’ पाहिला आणि त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

काळे कपडे, हातात सोन्याचं ब्रेसलेट, वाढलेल्या दाढी-मिशा, डोळ्यावर काळा गॉगल आणि चालण्यात रुबाब… सुनिल शेट्टी यांंचा हा चित्रपटातील लूक अमेरिकी पोलिसांना काही पटेना. या विचित्र वेषात आतंकवादी वावरत असल्याचा त्यांना दाट संशय आल्याने त्यांनी सुनिल शेट्टी यांना ताब्यात घेतले.

 

 

कोणतीही कल्पना नसताना अचानक पोलिसांनी चौकशी सुरु केल्याने सुनिल शेट्टी गांगरले मात्र त्यांनी पोलिसांना आपली खरी ओळख पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पोलिस काही ऐकेना.

 

पोलिस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या परवानगीने सेटवरील इतर सहकलाकारांना फोन करून घडलेली हकीगत सांगितली. कलाकारांनी तातडीने पोलिस स्टेशनकडे धाव घेत पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तरिही पोलिसांचा विश्वास बसेना.

अमिताब बच्चन यांना यश

अभिनेते अमिताब बच्चन आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी अखेर पोलिसांना अनेक कागदपत्र दाखवले, सुनिल यांच्या खाजगी कागदपत्रांसह चित्रपटासंबंधीचे कागदपत्र, अनेक फोटो, शुटिंगच्या क्लिप्स दाखवल्या.

 

 

सुनिल हे आतंकवादी नसून ते प्रसिद्ध अभिनेते आहेत, आणि सध्या ते चित्रपटातील रोलसाठी अशा वेशभुषेत असल्याची पोलिसांची खात्री पटली आणि अखेर अनेक तासांच्या गोंधळानंतर सुनिल शेट्टी यांची सुटका झाली.

भारतात चाहत्यांच्या गर्दीत वावरणारे कलाकार परदेशात गेल्यानंतर मात्र त्यांना अशा अनेक अनुभवांना सामोरे जावे लागते.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल


इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version