आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मैत्री हा शब्द जरी नुसता उच्चरला तरी आपल्याला एकदम हायसे वाटते, सुखदुःख असो संकट असो आपल्या आयुष्यात हक्काचे नातेवाईक एकवेळ पाठ फिरवतील मात्र एकमेव व्यक्ती जी आपल्यासोबत कायम असते ती म्हणजे मित्र.
आज शाळा कॉलेजपासून ते अगदी सिनेस्टार, राजकारणी मंडळी असो, पडद्यावर किंवा राजकारणात एकमेकांचे कट्टर क्षत्रू असलेले खाजगी आयुष्यात मात्र कट्टर मित्र असतात. बॉलीवूडमधले दोन मित्र राजकारणात गेल्यावर मात्र एकमेकांचे कट्टर क्षत्रू बनले, कोण होते ते क्षत्रू चला तर मग जाणून घेऊयात…
बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा एकमेकांचे सच्चे मित्र होते. राजेश खन्ना यांनी तर मुलाखतीत सांगितले देखील होते की ‘शत्रुघ्न माझ्या लहान भावासारखा आहे. या दोघांनी एकत्र येऊन सात सिनेमात केले आहे. स्टार्समधली चढाओढ, नंबर वन बनण्यासाठीचा अट्टाहास यापैकी कोणतेच कारण त्यांच्या मैत्रीत आले नव्हते, ते कारण होते राजकारणाचे..
बॉलीवूडमधला आपला दबदबा कमी होऊ लागला की साहजिकच बॉलीवूडची मंडळी राजकारणाकडे वळतात. मग राजेश खन्ना असो किंवा गोविंदा असो प्रत्येकाने आपले नशीब राजकरणात आजमावले आहे. काही अभिनेते राजकारणी झाले तर काही अपयशी ठरले.
झालं असं इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी राजेश खन्ना यांना अनेक ठिकाणी प्रचारासाठी नेले होते. राजीव गांधी जसे अमिताभ बच्चन यांचे मित्र होते तसेच ते राजेश खन्नाचे मित्र होते. राजेश खन्ना राजकरणात येण्यामागे राजीव गांधी यांचा सहभाग होता. राजीव गांधींच्या म्हणण्यानुसार राजेश खन्ना राजकारणात तर आले मात्र आपल्या मित्राला मुकले.
–
- पहिल्या प्रेयसीला जळवण्यासाठी ‘काकाने’ आपल्या लग्नाची वरात तिच्या घराजवळून नेली!
- ५० वर्षांनंतरही “आनंद मरा नहीं है!”- आनंदने ५० वर्षांत आपल्याला काय काय दिलंय पहा
–
१९९१ लोकसभेच्या निवडणूका लागल्या राजेश खन्नाला दिल्ली विधानसभेतून उमेदवारी देण्याचे काँग्रेसने ठरवले, राजेश खन्नाचे विरोधक होते लाल कृष्ण अडवाणी. लाल कृष्ण अडवाणी यांनी दिल्लीतून आणि गुजरातच्या गांधीनगर भागातून उभे राहिले होते.
राजेश खन्नाने आपल्या लोकप्रियतेची संपूर्ण ताकद लावली होती, डिम्पल सोबतचे दुरावलेले संबंध या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जवळ आले होते, डिम्पलने देखील प्रचारामध्ये भाग घेतला होता, त्यांचं काळात भाजपने हिंदुत्वाची लाट आणून लोकांचे लक्ष वेधले होते. दोघे स्पर्धक तगडे असल्याने साहजिकच दोघांच्यात स्पर्धा होती, मात्र लाल कृष्ण अडवाणी काही फरकाने निवडणून आले, तसेच ते गांधीनगर मधून सुद्धा निवडून आले.
राजेश खन्नाच्या नशिबात हार कधीच नव्हती, कारण पुढच्याच वर्षी म्हणजे १९९२ मध्ये लाल कृष्ण अडवाणी यांनी दिल्लीतल्या सीटचा राजीनामा दिला, त्यामुळे साहजिकच पुन्हा निवडणूक लावण्यात आली. भाजपने राजकीय खेळी खेळात राजेश खन्ना समोर शत्रुघ्न सिन्हाला आणले..
शत्रुघ्न सिन्हा लाल कृष्ण अडवाणींच्या सांगण्यावरून दिल्लीतून राजेश खन्नाच्या विरोधात उभे राहिले होते. यावेळी मात्र राजेश खन्ना यांनी बाजी मारून शत्रुघ्न सिन्हाला हरवले. १९९२ ते ९६ काळात राजेश खन्ना संसदेत कार्यरत होते.
–
- …म्हणून तेव्हाच्या सर्वात मोठ्या दिग्दर्शकाने ‘सुपरस्टार काकाच्या’ कानाखाली लगावली!
- यशाच्या शिखरावर असूनही काळाच्या दुष्टचक्रासमोर ह्या दुर्दैवी कलाकारांचा निभाव लागला नाही!
–
शत्रुघ्न सिन्हा यांना वाईट वाटले मात्र त्यांचं दुःख हे होत की आपण आपल्या मित्राच्या विरोधात उभे राहिलो, अनेकदा शत्रुघ्न सिंह यांनी राजेश खन्ना यांची समजूत काढणायचा प्रयत्न केला मात्र राजेश खन्ना यांनी त्यांचे ऐकले नाही.
शत्रुघ्न सिन्हा याना राहवले नाही, त्यांनी राजेश खन्ना यांच्या अखेरच्या दिवसात त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन माफी मागणार त्याआधीच राजेश खन्ना हे जग सोडून गेले. आपण माफी आधीच मागायला हवी होती अशी हुरहूर शत्रुघ्न सिन्हा यां आयुष्यभर राहीलच, एका मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.