नवाझुद्दीन म्हणतोय, OTT सारख्या ‘डम्पिंग ग्राउंड’वर मी यापुढे काम करणार नाही….
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘कभी कभी लगता हैं, अपून ही भगवान हैं’ हा डायलॉग आजही सगळ्यांना आठवत असेल; नुसताच आठवत नसेल तर आजही अनेकांच्या तोंडावर असेल. शो-शायनिंग म्हणून बरेचजण हा डायलॉग मित्रांच्या ग्रुपमध्ये वापरत सुद्धा असतील.
नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या सिरीजचा भाग असणारा नवाझुद्दीन प्रेक्षकांचा अधिक लाडका बनला होता. चित्रपटांमधून उत्तम अभिनयाचं प्रदर्शन करणारा नवाझ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा भाव खाऊन गेला. आता मात्र त्याने भलताच निर्णय घेतलेला दिसतोय.
यापुढे ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार नाही असं म्हणताना, त्याने ओटीटीचा उल्लेख चक्क ‘नकोशा कलाकृती टाकण्याचं डम्पिंग ग्राउंड’ असा केला आहे.
नवाझ नेमकं काय म्हणाला?
ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपण बघत असलेल्या बहुतांश सिरीज या बघू नये अशाच असतात, असं या कलाकाराचं म्हणणं आहे. एखाद्या शोचं कथानक हे फार वाढवण्यासारखं नसतं आणि तरीही अशा सिरीजचे सिक्वेल काढले जातात, असंही नवाझने म्हटलं आहे. एका मुलाखतीची त्याने ही मतं मांडली आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्म हा मोठमोठ्या सिनेनिर्मात्यांसाठी एक धंदा बनला असल्याचं स्पष्ट मत यावेळी त्याने व्यक्त केलं. अशा प्रोडक्शन हाऊसना कन्टेन्ट बनवत राहण्यासाठी बक्कळ पैसा मिळतो. त्यामुळेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यात राम नसल्याचं त्याने म्हटलंय.
सेक्रेड गेम्ससारखी सिरीज बनवताना काम करण्यात एक वेगळीच मजा आणि आव्हान होतं. तशी आव्हानं, तो उत्साह याचा अभाव आता तिथे काम करताना जाणवतो. अशा ठिकाणी काम करण्यात काहीही अर्थ नाही असं नवाझला वाटतं.
“ज्या सिरीज बघणं सुद्धा मला सहन होत नाही, अशा प्रकारच्या सिरीजचा भाग असणं मला कदापि शक्य नाही” असंही मत नवाझने मांडलं आहे.
–
- थिएटर तर सुरु होत आहेत मात्र घरातलं हक्काचं मनोरंजन होणार आणखीनच महाग!
- पडदा उघडतोय…यापैकी कोणता सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायला तुम्ही उत्सुक आहात?
–
स्टार्सचे नखरे इथेही सुरु…
एखाद्या कलाकाराला प्रेक्षकांनी उचलून धरलं, त्याला स्टारडम मिळालं, की त्यांचं वागणं बदलतं, काहीसा नखरेल स्वभाव पाहायला मिळतो. हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. या स्टारडमपायी सिनेसृष्टीचं नुकसान झालं असं मत मांडताना, नवाझने वापरलेलं वाक्य विचार करायला भाग पाडतं.
‘यह स्टार सिस्टिम बडे परदे को खा गया’ हे त्याचं वाक्य सध्याच्या ओटीटीच्या स्थितीचं गंभीर वास्तव दाखवतं.
हजारो थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट पाहणं हा एकमेव पर्याय असणारा एक काळ होता, आता तास काळ उरलेला नाही. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि त्यामुळे मिळणारे अनेक पर्याय हा प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. अशावेळी जर चांगला कन्टेन्ट पाहायला मिळणार नसेल, तर केवळ स्टार्ससाठी प्रेक्षक ओटीटीकडे आकर्षित होणार नाहीत हे त्यांनी समजून घ्यायला हवं.
चित्रपटामध्ये असणारा स्टारडम प्रेक्षकांना आकर्षित करत असला, तरी ओटीटी एका क्लिकवर असल्याने तिथे प्रेक्षकांची हुकूमत अधिक चालते… आता कन्टेन्टचा जमाना आलाय, स्टार्ससाठी कलाकृती पाहण्याचा काळ गेला, असं म्हणत नवाझने ओटीटीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय.
मागील काही काळात ओटीटीवर रिलीज करण्यात आलेले सडक, लक्ष्मीबॉम्ब, कुली चित्रपटाचा रिमेक, हंगामा २, बेलबॉटम अशी काही उदाहरणं पाहिली, तर ओटीटीवर चांगल्या कन्टेन्टकडे लक्ष न देता, केवळ स्टार्सना घेऊन एखादी कलाकृती तयार करण्याला प्राधान्य दिलं जातंय असं दिसून येतंय.
नवाझने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं याविषयी कमेंटमधून नक्की सांगा…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.