Site icon InMarathi

कारचा ब्रेक लावतांना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची गरज असते का? उत्तर वाचा!

break im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल “कार घेणं” ही बाब फार ‘स्पेशल’ राहिली नाहीये. पण तरी आपली कार कधीतरी घेऊ, आपण स्वतः चालवू…ही गोष्ट बहुतेकांसाठी अप्रूपच ठरते. चार चाकी गाडी चालवायला शिकणे – हा एक अद्भुत अनुभव असतो! खासकरून मध्यमवर्गात लहानाचा मोठा झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी!

कारण प्रत्येक मध्यमवर्गीय-टीनएजर ने कधीना कधी “आपली कर, आपणच चालवत, एका लॉन्ग रोड-ट्रीपवर जाऊ” हे स्वप्न बघितलेलं असतं… आणि ह्या स्वप्नाला पूर्ण करण्याची अविभाज्य पायरी म्हणजे – कार चालवायला शिकणे…!

 

 

 

कार चालवणे म्हणजे स्टीयरिंग व्हील-क्लच-ब्रेक-गियर्स ह्या सर्वांची सिस्टिमॅटिक मॅनेजमेन्ट…! त्यात स्पीड वाढवणे – कमी करणे – कंट्रोल करणे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे.

गाडी चालवताना आपल्यापैकी अनेकांना ही सवय असते की ते गाडीचा स्पीड कमी करताना जेव्हा ब्रेक दाबतात तेव्हा प्रत्येक वेळी सोबत क्लच देखील दाबतात. तुमच्यापैकी बरेच जण एखाद्या मोटार ट्रेनिंग स्कूल कडून गाडी चालवायला शिकले असतील, तेव्हा तुमच्या सोबत असणाऱ्या इन्स्ट्रक्टरने देखील तुम्हाला हेच सांगितले असेल की

‘प्रत्येकवेळी ब्रेक दाबताना क्लच देखील दाबायचा बरं का!”

आणि तुम्ही देखील त्याचं म्हणणं अगदी मनावर ठसवलं असेल. पण कधी विचार केलाय का –

“काय गरज आहे ब्रेक सोबत क्लच दाबण्याची? ब्रेक तर गाडी थांबवण्यासाठीच दिलेले असतात, मग त्यात क्लच दाबून अजून काय फरक पडतो?”

मुळात –

प्रत्येकवेळी” ब्रेक दाबताना क्लच दाबायलाच हवा का?”

 

चला तर जाणून घेऊया गाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे की नाही?

उत्तर आहे – दरवेळी गाडीचा ब्रेक दाबताना क्लच दाबण्याची गरज नाही.

जेव्हा तुम्ही फक्त ब्रेक दाबता तेव्हा गाडी अपेक्षेपेक्षा लवकर थांबते, पण जेव्हा तुम्ही ब्रेक पूर्वी क्लच देखील दाबता तेव्हा गाडी काहीशी उशिरा स्पीड कमी करते आणि मग थांबते कारण क्लच दाबल्याने RPM वाढते.

येथे सर्वप्रथम आपण गिअर्सचे बेसिक समजून घेऊ.

लोअर गिअर्स = जास्त RPM आणि कमी स्पीड
हायर गिअर्स = कमी RPM आणि जास्त स्पीड

तुमच्या कारनुसार प्रत्येक गिअरची एक स्पीड रेंज असते. म्हणजे,

१ ला गिअर- ताशी ०-१० किमी
२ रा गिअर- ताशी १०-२० किमी
३ रा गिअर- ताशी २०-३० किमी
४ था गिअर- तशी ३० कमी पेक्षा अधिक

जर तुमच्या कारचा स्पीड १ ला गिअर वगळता इतर कोणत्याही गिअरमध्ये ताशी १० किमी पेक्षा कमी असेल आणि जर तुम्ही क्लच न दाबता थेट ब्रेक दाबला तर गाडी अचानक जागेवरच थांबेल. हे १ ला गिअर वगळता इतर गिअर मध्ये गाडी असल्यावर होतं, कारण वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गिअरची एक स्पीड रेंज असते आणि जर त्या गिअरला गाडी ठराविक स्पीड रेंजला नसेल आणि तुम्ही क्लचशिवाय ब्रेक दाबला तर गाडी अचानक थांबेल.

 

 

 

तुम्ही क्लच कधी दाबले पाहिजे? खालील दोन सिच्युएशनच्या वेळी-

१) गिअर्स उतरवत असताना
२) गाडी पूर्ण थांबवत असताना

या दोन सिच्युएशन व्यतिरिक्त गाडीचे ब्रेक दाबताना क्लच दाबण्याची गरज बिलकुल नाही. क्लच हा ड्रायव्हर ट्रेनला इंजिनशी कनेक्ट करतो. जेव्हा तुम्ही गिअर्स बदलताना क्लच दाबता तेव्हा ड्रायव्हर ट्रेन इंजिनपासून डिसकनेक्ट होते.

त्यामुळे ड्रायव्हर सहज गिअर्स बदलू शकतो. पण जर ड्रायव्हने क्लच दाबल्याशिवाय गिअर्स बदलले तर मात्र गिअर्स टीथ निखळण्याची भीती असते.

मग नेमकं करावं तरी काय?

१) जेव्हा तुम्हाला गाडीचा स्पीड कमी करायचं असेल तेव्हा केवळ अॅक्सलरेटर/गॅस पॅडल थोडेसे रिलीज करा.

२) जर अॅक्सलरेटर/गॅस पॅडल सोडूनही गाडीचा वेग अपेक्षएवढा कमी झाला नाही तर हलक्या दाबाने ब्रेक पॅडल दाबण्यास सुरुवात करा.

३) क्लच पॅडल पूर्णपणे दाबा आणि तुमच्या गाडीची स्पीड जो असेल त्यानुसार गिअर उतरवा आणि तुम्ही ज्या गिअरवर आहात त्यानुसार हळूहळू क्लच वरचा दाब सोडा. १ ल्या गिअरमध्ये (रिव्हर्ससह) आणि २ ऱ्या गिअरमध्ये तुम्ही टीपीकली क्लच पॅडल हळूहळू सोडा आणि तर सर्व गिअर्समध्ये तुम्ही क्लच पॅडल झटकन सोडा.

४) जर तुमच्यासमोर अचानक कोणी आले किंवा इमर्जन्सी सिच्युएशन असेल तेव्हा ब्रेक दाबा, क्लच दाबा आणि गिअर उतरवत गाडी १ ल्या गिअरवर किंवा न्युट्रल मोड वर आणा. असे करणे तुमच्या गाडीसाठी नक्कीच चांगले नाही, पण इमर्जन्सी वेळी असं करावेच लागते.

 

 

सारांश :

गाडीची फक्त गती कमी करायची असेल तर एक्सलरेटर वरून पाय काढून घेऊन फक्त हलकासा ब्रेक दाबा. क्लच दाबायची गरज नाही.

पण –

गाडी एका जागी थांबवायची असेल, गाडीची गती अगदी शून्य करायची असेल किंवा असलेल्या गियर ला साजेशी नसलेली स्पीड होण्याची शक्यता असेल, तरच गाडी बंद पडू नये म्हणून क्लच दाबा.

गंमत अशी, की ही अत्यंत मूलभूत गोष्ट ड्रायव्हिंग स्कुलमधे शिकवत नाहीत…आणि त्यामुळे आपण गाडीचं नकळत नुकसान करत रहातो. पेट्रोलसुद्धा विनाकारण जाळत रहातो…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version