Site icon InMarathi

प्रत्येक बोल्ड सीन शूट करण्याआधी सनी लिओनीने ठेवली होती ‘एक’ वेगळीच अट

sunny leone inmarathi1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बॉलिवूड हे एक स्वतंत्र जग आहे. इथे काय घडेल. कोण कोणाला काय म्हणेल, कोणाचं सूत जुळेल, तर कोणाचं जुळलेलं फाटेल हे सांगता यायचं नाही. शिवाय इथे लॉबी प्रकरण ही भयंकर. एकूणच काय तर इथे प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच चालू असतं.

सनी लिओनी हेही बॉलीवूडमध्ये कायम चर्चेत असलेलं नाव. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, की बॉलीवूडमध्ये काम करण्याआधी सनी एक सुप्रसिद्ध पॉर्न स्टार होती. पॉर्न इंडस्ट्री सोडून हिंदी चित्रपटांमध्ये येण्यासाठी सनीने खूप मेहनत घेतली आहे.

 

 

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी सनीने मॉडेलिंग क्षेत्रात काम केले होते, पण तिची उंची कमी असल्याने त्या क्षेत्रात ती लक्षणीय कामगिरी करू शकली नाही. वयाच्या १९व्या वर्षीच तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली.

इतिहास काहीही असला, तरीही सनीकडे आज एक उत्तम अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं, ती निर्माती सुद्धा आहे. एकता कपूरचा ‘रागिणी एमएमएस २’, महेश भट्ट यांचा ‘जिस्म २’ या चित्रपटांमध्ये सनीने काही बोल्ड सीन्ससुद्धा दिले आहेत.

 

 

को- स्टार बरोबर लव्ह मेकिंग सीन्स काम करण्याआधी सनीने एक अट ठेवली होती, ज्याची जबरदस्त चर्चा त्यावेळेस सिनेसृष्टीत झाली होती. खरंतर बॉलीवूड कलाकार काम करण्याआधी अशा अनेक अटी ठेवत असतातच, त्यात काही वावगं नाही, पण सनीची अट मात्र काहीतरी वेगळीच होती.

ज्या कलाकारासोबत ‘बोल्ड सीन’ करायचा आहे, त्या कलाकाराच्या ‘एचआयव्ही टेस्ट’ रिपोर्टची मागणी तिने केली होती.

अशा अटी असणं ही हॉलीवूडमध्ये खूप सामान्य बाब आहे. तिथे कलाकार अशा अनेक अटी ठेवत असतात. कलाकारांसोबत निर्मातेही अनेक अटी ठेवतात. चित्रपट घेण्यापूर्वी अनेक अटींची पूर्तता करावी लागते. अनेक निर्माते अभिनेत्रींना ‘नो प्रेग्नन्सी’ची अट घालूनच चित्रपटाचं काम सुरु करतात.

‘कोणत्याही चित्रपटात बोल्ड सीन द्यायचा असेल, तर त्या कलाकाराच्या एचआयव्ही टेस्टचा रिपोर्ट मला दाखवावा, तरंच मी त्या चित्रपटात काम करेन’ अशी मागणी सनीने केली होती.

 

 

सनीने यापूर्वी ज्या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे, तिथे पॉर्न स्टार्सच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. अमेरिकेत तर प्रत्येक पॉर्नस्टारला दर ३० दिवसांनी एचआयव्ही टेस्ट करण्यास सांगितले जाते.

आता सनीने ज्या अभिनेत्यांसोबत काम केले, त्यांनी खरंच एचआयव्ही टेस्ट केली होती की नाही हे देवास ठाऊक.

 

सनीने खरंच ही अट घातली होती, की नाही याबाबत शंका आहे कारण तिच्या नवऱ्याने ही गोष्ट फेटाळली आहे. मात्र तेव्हा सिनेसृष्टीत ही चर्चा चांगलीच रंगली होती.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version