आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू अटळ आहे. विज्ञान मृत्यूची व्याख्या वेगळी सांगतो, तर अध्यात्मच्या दृष्टीने मानवाच्या शरीरातून आत्मा निघून गेला, की मृत्यू होतो. आपल्या डॉक्टर मंडळींच्या मते हृदयाने काम करणे थांबवले, की माणसाचा मृत्यू होतो.
डॉक्टर मंडळी पुढे असं म्हणतात ‘मृत्यूपूर्वी किंवा गंभीर आजार होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला सूचना देत असते. या सूचना आपल्याला वेळीच लक्षात आल्या तर आपण नक्कीच माणसाचा जीव वाचवू शकतो’. अपघाती मृत्यू हा तर कोणाच्या ध्यानीमनी नसताना येतो.
मृत्यूपूर्वी येणाऱ्या सूचना सामान्य व्यक्तींना जशा येतात तशा सूचना आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुद्धा आल्या होत्या. कालच म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांना आपल्या मृत्यूची सूचना आदल्या दिवशीच झाली होती, नेमकी काय होती सूचना चला तर मग जाणून घेऊयात…
काय घडलं होत नेमकं त्यादिवशी?
ब्लू स्टार ऑपरेशन केल्यामुळे साहजिकच इंदिरा गांधी यांच्याबद्दल शीख समुदायात नाराजी पसरली होती. १९८४ चा काळात काही राज्यांच्या निवडणूक तोंडावर असल्याने इंदिरा गांधी प्रचारासाठी फिरत होत्या.
ओडिसा राज्याच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी त्या भुवनेश्वर येथे दि. ३० ऑक्टोबर १९८४ रोजी गेल्या होत्या. आता निवडणूका तोंडावर आल्या असताना साहजिकच प्रचाराच्या भाषणांमध्ये प्रतिस्पर्धी पक्षांचे वाभाडे काढले जाणार हे त्यावेळी सभेतल्या लोकांना देखील ठाऊक होते.
–
- ९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…
- इंदिरा गांधींच्या एका अत्यंत विश्वासू माणसाने त्यांच्याकडून नमाज पठण करवून घेतलं होतं!
–
जेव्हा भाषणाची वेळी आली तेव्हा इंदिरा गांधींचा सूर मात्र काहीसा वेगळा लागला होता. ज्या इंदिरा गांधी आपल्या तडफदार भाषणासाठी ओळखल्या जात होत्या, त्याच इंदिरा गांधी सभेतल्या भाषणात स्वतःशीच संवाद संवाद साधत आहेत असे वाटत होते. त्यांचे असे शब्द होते की,
मी आज आहे उद्या कदाचित नसेन, मी असेन नसेन यांची चिंता मला नाही. माझं आयुष्य मोठं आहे आणि मला याचा अभिमान आहे की, मी माझं संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी खर्च केले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी हेच करणार आहे. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशाला बळकटी देण्यासाठी वापरला जाईल.
३१ ऑक्टोबरचा दिवस :
भुवनेश्वरचा प्रचार संपवून इंदिरा गांधी ३० ऑक्टोबरलाच संध्याकाळी दिल्लीत परतल्या होत्या. ३१ ऑक्टोबरच्या सकाळीच ९ च्या दरम्यान इंदिराजी अकबर रोडकडे निघाल्या होत्या. स्वतःच्या गाडीने न जाता त्यांनी पायी जाण्याचे ठरवले.
गेटपर्यंत पोहचल्यानंतर गेटपाशी असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने त्यांना वंदन केले. बेहन्त सिंग असे त्या सुरक्षारक्षकाचे नाव होते, वंदन करून त्याने लगेचच आपल्या रिव्हॉल्वरने इंदिरा गांधींना दोन गोळ्या मारल्या, इंदिरा गांधी जमिनीवर कोसळताच संतरी बूथवर असणारा सुरक्षारक्षक तिथे आला आणि त्याने इंदिरा गांधींवर तब्बल ३० गोळ्या झाडल्या.
–
- असं काय घडलं…? की इंदिरा गांधींनी या सिनेमावर थेट बंदी घातली!
- इंदिरा गांधींना कोर्टापासून निवडणुकीपर्यंत हरवत नेणारा “राजकारणातील विदूषक”
–
एसपी दिनेश चंद्र भट हे त्याच भागात तैनात होते त्यांनी लगेचच या दोघांना अटक केली, अटक केल्यानंतर त्या दोन सुरक्षा रक्षकांनी सांगितले की ‘आम्हाला जे करायचे होते ते आम्ही केले आता तुम्हाला जे करायचे आहे ते करा’.
या घटनेचे पडसाद उमटायला वेळ लागली नाही. पुढच्या चार दिवसातच हजारो शिखांच्या कत्तली केल्या गेल्या होत्या. दोन्ही सुरक्षा रक्षकांना फाशी सुनावण्यात आली होती.
नुकतंच प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या प्रचारासाठी गेल्या असताना भाषणात त्यांनी आपल्या आजीचा म्हणजे इंदिरा गांधींचा उल्लेख केला, प्रियांका गांधी भाषणात असं म्हणाल्या, की ‘आमची आजीन आम्हाला रोज भेटायची आणि सांगायची, की जर माझा मृत्यू झाला तर रडत बसू नका. माझ्या आजीला माहित होते तिचा मृत्यू होणार आहे’.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.